Gut health tips: आपण जे काही खातो ते पचवण्याचे काम आतडे करतात. आतडे हे पाचन तंत्राचा एक महत्त्वाचा भाग आहेत, ज्यांचे कार्य खाल्लेले अन्न पचवणे आणि शरीरात पोषक तत्वे शोषून घेणे हे आहे. आपण जे काही खातो ते अन्न प्रथम आपल्या पोटात जाते. पाचक एन्झाईम्स आणि ॲसिड्स अन्नाचे विघटन करतात. यानंतर हे अन्न लहान आतड्यात येते, जेथे आतड्यांमध्ये असलेले पाचक एन्झाईम्स आणि रस या अन्नाचे लहान तुकडे करतात, जे शरीराद्वारे सहजपणे शोषले जातात आणि शरीराला हे आवश्यक पोषक रक्तप्रवाहातून मिळतात.

मोठ्या आतड्याचे सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे पोषक तत्त्व शोषल्यानंतर शरीरातील उर्वरित कचरा काढून टाकणे. आतडे पचन प्रक्रियेत खूप महत्त्वाची भूमिका बजावतात आणि त्याचे योग्य कार्य आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.

जेव्हा आपले आतडे नीट काम करत नाहीत, तेव्हा आपले अन्न पचत नाही आणि ते सडू लागते. जेव्हा शरीरात अन्न पचत नाही तेव्हा अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू लागतात. अन्न सडण्याची प्रक्रिया सामान्यतः पचनक्रियेतील अडथळ्यामुळे होते, त्यामुळे शरीरात दिसणाऱ्या ‘या’ पाच लक्षणांवरून जाणून घ्या की तुम्ही जे अन्न खाता ते शरीरात पचतंय की सडतं आहे? आम्ही तुम्हाला अशी पाच लक्षणे सांगत आहोत, ज्याद्वारे तुम्ही समजू शकता की तुमचे अन्न व्यवस्थित पचत आहे की सडत आहे.

पोटात गोळा येणे हे अन्न सडण्याचे लक्षण आहे.

जर तुम्हाला अनेकदा तुमच्या पोटात जडपणा जाणवत असेल आणि पोट फुगल्यासारखे वाटत असेल तर तुमची पचनक्रिया नीट होत नसल्याची स्पष्ट चिन्हे आहेत. पचनक्रिया नीट झाली नाही तर पचन होत नाही उलट ते कुजायला लागते.

गॅस सोडणे आणि ढेकर देणे

तुम्हाला वारंवार ठेकर येत असतील तर पचनक्रिया बिघडत आहे हे स्पष्टपणे समजून घ्यावे. पोटातून गॅस बाहेर पडणे हे स्पष्टपणे सूचित करते की अन्न पचण्यात अडचण येत आहे, त्यामुळे शरीरात असंतुलन निर्माण होते आणि अन्न पचण्याऐवजी सडू लागते.

पोटात जळजळ आणि ॲसिडिटी

काहीही खाल्ल्यानंतर तासनतास पोटात जळजळ होत असेल आणि तोंडातून आंबट ढेकर येत असेल तर समजून घ्या की तुमची पचनक्रिया बिघडत आहे. ही स्थिती म्हणजे शरीरात ॲसिड तयार होत असून अन्न पोटात सडत असल्याने पचनसंस्था बिघडत असल्याचे स्पष्ट संकेत आहे.

जुलाब, घट्ट मल

जर तुम्हाला जुलाब, घट्ट मल होत असेल तर हे स्पष्ट आहे की तुमच्या पचनामध्ये काहीतरी चूक होत आहे. ही लक्षणे अन्न सडल्यामुळे असू शकतात, ज्यामुळे शरीरात विषारी पदार्थ जमा होऊ शकतात.

चेहऱ्यावर पिंपल्स आणि जिभेवर पांढरा लेप

जर तुमच्या चेहऱ्यावर पुरळ दिसत असेल आणि तुमच्या जिभेवर पांढरा थर तयार होत असेल, तर ही तुमची पचनक्रिया बिघडत असल्याची स्पष्ट चिन्हे आहेत. खराब पचनामुळे शरीरात विषारी पदार्थ जमा होतात, ज्याचा त्वचेवर परिणाम होतो. जर अशी काही लक्षणे तुमच्या शरीरात दिसत असतील तर तुम्ही तुमची जीवनशैली आणि आहार बदलला पाहिजे.