Personality Development: असे म्हणतात की, तुम्ही स्वत:बरोब कशा प्रकारे संवाद साधता हे खूप मह्त्वाचे ठरते. इतर कोणतेही व्यक्ती तुमचा आत्मविश्वास कमी करण्याचा किंवा वाढवण्याचे काम करेल त्याआधीच तुम्हाला आत्मविश्वास नियंत्रित केला पाहिजे. काही वाईट सवयी असतात ज्या व्यक्तीचा आत्मविश्वास कमी करता. या सवयी स्वत:बरोबर साधत असलेल्या संवादाशी संबधीत असू शकते, एखाद्याला स्वत:ची ओळख करून देण्यासंबधीत असू शकते किंवा कोणत्याही स्थितीसाठी तयार राहण्यासंबधीत असू शकते. चला जाणून घेऊ या सवयींबाबत ज्या नकळतपणे आपला आत्मविश्वास कमी करू शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्वत:चा आत्मविश्वास कमी करणाऱ्या सवयी

नेहमी स्वत:ला दोष देणे
अनेकांना प्रत्येक गोष्टीसाठी स्वत:लाच दोष देण्याची सवय असते. त्यांना कोणीही काही बोलले नाही तर त्यांना वाटते की, प्रत्येक कामामध्ये फार वाईट आहेत आणि योग्य निवड करू शकत नाही. त्यामुळे तुमचा आत्माविश्वास वाढण्याऐवजी कमी होऊ शकतो.

हेही वाचा – World Mental Health Day 2023: तुम्ही किंवा तुमच्या जवळची व्यक्ती नैराश्यात आहे हे कसे ओळखावे?

आपल्या नकारात्मकतेकडे जास्त लक्ष देणे
कित्येक परिस्थितीमध्ये व्यक्ती आपल्या चांगल्या गुणांकडे लक्ष देण्याऐवजी फक्त आपल्या नकारात्मक गोष्टींकडे लक्ष देतात. ते काय करू शकतात यापेक्षा जास्त विचार ते काय करू शकत नाही याचा करतात. एखाद्यामध्ये काय चांगले आहे यापेक्षा जास्त, आपल्यामध्ये वाईट काय आहे याची विचार अशा व्यक्तीला सतावत असतो. कित्येकदा आपल्या सकारात्मकतेवर लक्ष दिले पाहिजे आणि नकारात्मकतेकडे जास्त लक्ष देऊ नका.

स्वत:ची खिल्ली उडवणे
कित्येकांना सवय असते की, इतर कोणी त्यांना काही बोलेल त्याआधी ते स्वत:चीच खिल्ली उडवतात. त:चीच खिल्ली उडवण्याची ही सवय आत्मसन्मान कमी असल्याचे लक्षण आहे. ही सवय आत्मविश्वास कमी करणारी असते.

हेही वाचा – Mental Health Special: मुलांना सांगा या १० महत्वाच्या टिप्स!

कौतुक स्वीकार न करणे
जर कोणी तुम्हाला म्हटले की, तुम्ही सुंदर दिसता तेव्हा ‘नाही तू खोटे सांगत आहे’ असे किंवा ‘नाही मी कुठे संदर दिसते’असे म्हणून कौतूक नाकारण्याऐवजी तुम्ही आभार व्यक्त करून ते कौतूक स्विकारले पाहिजे. कारण तुम्ही स्वत:च तुमचा आत्मविश्वास कमी करता आहात पण दुसऱ्या व्यक्तीने कौतूक केल्यावर तुम्ही स्वत:चा आत्मविश्वास वाढवण्याची संधी देत नाही. असे करू नका. कोणीही तुमचे कौतूक केल्यास आनंदाने स्विकारा.

संकटाचा सामना करण्यापूर्वीच हार स्वीकारणे
कित्येकदा आपल्या आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपल्या संकटांचा सामना करण्याची आवश्यकता असते. हरण्याच्या भितीमुळे जिंकण्याचे स्वप्न न पाहणे चुकीचे आहे. तुम्हाला प्रयत्न केला पाहिजे. आयुष्यात जस-जसे तुम्ही संकटाचा सामना करता तस तसे तुमचा आत्मविश्वास वाढत जातो. त्यामुळे उलट जेव्हा तुम्ही संकटापासून दूर पळता तेव्हा तुमची ही सवय तुमचा आत्मविश्वास कमी करते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Habits that make you unconfident or under confident how to gain confidence and how to become more confident snk
Show comments