Hair Care: जेव्हा केस चिकट आणि तेलकट असतात, तेव्हा ते तुटण्याची शक्यता देखील वाढते. केस लवकर तेलकट होण्याचे कारण म्हणजे आपल्या टाळूवर होणारं ऑइल प्रोडक्शन. यामुळे केस चिकटलेले दिसतात आणि स्पर्श केल्यावर चिकट वाटतात. अशा परिस्थितीत केस रोज धुणे हा उपाय नाही. कारण जास्त शॅम्पू केल्याने केस कमकुवत आणि कोरडे होतात. केसांना तेलकट होण्यापासून रोखण्यासाठी काही घरगुती टिप्स तुमच्या उपयोगाचे ठरू शकतात.
अॅपल सायडर व्हिनेगर: जर तुमच्या टाळूवर जास्त तेल जमा होत असेल तर ते थांबवण्यासाठी अॅपल सायडर व्हिनेगर खूप प्रभावी ठरतं यामध्ये असलेले अॅसिटिक अॅसिड स्कॅल्पची पीएच पातळी संतुलित करते, ज्यामुळे केस लवकर तेलकट होत नाहीत. तुम्ही एक कप पाण्यात दोन ते तीन चमचे अॅपल सायडर व्हिनेगर मिसळा आणि शॅम्पू केल्यानंतर केसांना लावा. साधारण अर्ध्या तासानंतर केस स्वच्छ पाण्याने धुवा. आठवड्यातून दोनदा असे केल्याने तेलकट केसांची समस्या दूर होते.
मुलतानी माती- मुलतानी माती लावल्याने आपल्या डोक्यातील रक्ताभिसरण योग्य प्रकारे होते, ज्यामुळे केसही मजबूत होतात. मुलतानी मातीमध्ये असलेले गुणधर्म देखील टाळूचे पीएच संतुलन सुधारतात, ज्यामुळे केस तेलकट आणि चिकट होत नाहीत. यासाठी तुम्ही तीन चमचे मुलतानी माती थोड्या प्रमाणात पाण्यात घेऊन त्याची हलकी जाड पेस्ट बनवा. आता ही पेस्ट केसांच्या मुळांवर लावा आणि सुमारे २० मिनिटे राहू द्या. केस धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करा. आठवड्यातून एकदा हा उपाय करा.
पुदिन्याची पाने- आपल्या टाळूमध्ये तेल जमा होण्यापासून रोखण्यासाठी पुदिना प्रभावी असल्याचे मानले जाते. यासाठी तुम्ही दोन ग्लास पाण्यात सुमारे २० पुदिन्याची पाने टाका आणि २० मिनिटे उकळा. त्यानंतर त्या पाण्यात शॅम्पू मिसळा आणि त्या पाण्याने केस धुवा.
कंडिशनरचाही होतो फायदा- केस लवकर तेलकट होत असतील तर यासाठी केसांमध्ये कंडिशनर वापरायला विसरू नका. प्रत्येक वेळी शॅम्पू करताना केसांना कंडिशनर वापरा. यामुळे केस तुटत नाही आणि त्यांना चमक देते. केस लवकर तेलकट होत नाहीत.