केसांची काळजी घेण्यासाठी बहुतेक लोक काही आवश्यक उत्पादने वापरतात. त्याच वेळी, शॅम्पूनंतर केसांना कंडिशनर लावणे हा प्रत्येकाच्या हेअर केअर रुटीनचा एक महत्त्वाचा भाग आहे. तथापि, बाजारात उपलब्ध असलेले बहुतेक कंडिशनर केमिकलयुक्त असतात. अशा परिस्थितीत जर तुम्हाला मार्केट बेस्ड कंडिशनर वापरायचे नसेल तर काही गोष्टींच्या मदतीने तुम्ही घरी सहज कंडिशनर तयार करू शकता.
कंडिशनर वापरल्याने केस मऊ आणि चमकदार राहतात. केमिकल बेस्ड कंडिशनर केसांवर विशेष प्रभावी नसतात, म्हणूनच काही नैसर्गिक घटकांचा वापर करून घरी कंडिशनर कसे बनवू शकतो आणि त्याचे फायदे काय आहेत, हे आज आपण जाणून घेणार आहोत.
रात्रीच्या वेळी चुकूनही करू नये ‘या’ डाळीचे सेवन; फायद्याच्या जागी होऊ शकते मोठे नुकसान
घरी कंडिशनर बनवण्यासाठी एका भांड्यात दोन चमचे मध, दोन चमचे कोरफड जेल आणि ४ चमचे ऑलिव्ह ऑईल मिसळून पेस्ट तयार करा. ते चांगले मिसळण्यासाठी तुम्ही त्यात थोडेसे पाणी देखील घालू शकता. कंडिशनर बनवल्यानंतर थोडा वेळ बाजूला ठेवा. केसांना कंडिशनर लावण्यापूर्वी केस शॅम्पूने चांगले धुवा. यानंतर, केसांचा ब्रश किंवा बोटांच्या मदतीने, केसांवर घरगुती कंडिशनर लावा आणि २० मिनिटे केसांवर राहू द्या. आता सौम्य शॅम्पूच्या मदतीने केस धुवा. चांगल्या परिणामांसाठी, आठवड्यातून दोनदा घरगुती कंडिशनर वापरा.
होममेड कंडिशनर उन्हाळ्यात केसांना डीप कंडिशनिंग करून केसांचा कोरडेपणा कमी करतो. तसेच, मध आणि कोरफडमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म टाळूवरील अतिरिक्त तेल कमी करतात आणि केसांना मॉइश्चराइझ ठेवण्यास मदत करतात. हवे असल्यास कंडिशनरमध्ये गुलाबजल मिसळा. त्यामुळे उन्हाळ्यात केसांना दुर्गंधीही येणार नाही. उन्हाळ्यात केसांना निरोगी, मुलायम आणि चमकदार बनवण्यासाठी घरगुती कंडिशनरचा वापर हा एक चांगला उपाय आहे.