Hair Care Tips for winter : केस हा आपल्या सौंदर्यातील एक महत्त्वाचा भाग असतो. त्यामुळेच केसांची आपण विशेष काळजी घेत असतो. पण आपण केसांची कितीही काळजी घेतली तरी प्रदूषण, वातावरण यांचा त्याच्यावर परीणाम होतो. त्यामुळे मग केस हळूहळू खराब व्हायला लागतात. हिवाळा आपल्या केसांची चमक घालवतो. केस अतिशय लवकर निस्तेज आणि कोरडे होऊ लागतात. त्यामुळे अशा दिवसांत आपण आपल्या केसांकडे अधिक लक्ष देणे गरजेचे असते. नाही तर कोंडा होणे, केस तुटणे किंवा केसांना सांभाळणे मुश्कील होते. परंतु, असे का होते? तर हिवाळ्यातील थंड हवेमध्ये आर्द्रता नसते, ओलावा नसतो. त्यामुळे आपोआप अशा वातावरणात केस जलद गतीने कोरडे होतात आणि ते जास्त प्रमाणात तुटण्याची शक्यता असते.
हिवाळ्यात केसांची निगा राखताना कोणत्या गोष्टीत कराव्यात आणि करू नयेत? या चुका टाळा
१. गरम पाण्याने अंघोळ
थंड हवेमध्ये गरम पाण्याने अंघोळ करणे अनेकांना आवडते; परंतु असे न करता त्याऐवजी कोमट गरम पाण्याचा वापर करा. पाणी जास्त गरम असेल, तर तुमच्या त्वचेवरील आणि केसांमध्ये नैसर्गिकरीत्या असणारे तेल निघून जाते. परिणामी त्वचा आणि केस कोरडे पडू शकतात.
२. केसांवर गरम उपकरणांचा वापर
केसांना सरळ किंवा कुरळे करण्यासाठी आपण स्ट्रेटनर किंवा कर्लिंग आयर्न [केसांना आकार देणारी उपकरणे] वापरतो. परंतु, त्यांच्या अतिउष्ण तापमानामुळे केस कोरडे होऊन तुटू शकतात, असे निकेता म्हणतात. त्यामुळे शक्य असल्यास अशा उपकरणांचा वापर टाळावा अथवा कमी प्रमाणात करावा.
३. सतत केस धुणे
केसांची काळजी घेण्यासाठी जर तुम्ही त्यांना वरचेवर धुत असाल, तर तसे करू नका. अतिकेस धुण्यानेदेखील केसांमध्ये असणारे नैसर्गिक तेल आणि ओलावा निघून जाऊन, ते कोरडे होऊ शकतात.
हेही वाचा >> गर्भधारणेसाठी महिलांमध्ये ‘हे’ व्हिटॅमिन असणं महत्त्वाचं; वाचा डॉक्टरांनी सांगितलेली सविस्तर माहिती
हिवाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठी काय करावे?
१. केसांना हायड्रेटेड ठेवणे
हिवाळ्यामध्ये हवा कोरडी असते. त्यामुळे आपले केस शुष्क होतात. असे न होण्यासाठी ग्लिसरिन, ह्यालुरोनिक ऍसिड [glycerine, hyaluronic] असणारे आणि केसांना मॉइश्चराइझ्ड करणारे असे शाम्पू अन् कंडिशनर वापरा, असा सल्ला डॉक्टर निकेता यांनी दिला आहे.
२. कंडिशनिंग
थंड हवेमुळे केसांची मुळे आणि त्वचा कोरडी होते; ज्यामुळे कोंड्याचा त्रास होऊ शकतो. असे होऊ नये यासाठी खोलवर पोषण करणाऱ्या हेअर मास्कचा वापर करावा. तुमच्या केसांना अधिक जास्त पोषण मिळावे यासाठी आठवड्यातून दोनदा या हेअर मास्कचा वापर करावा, असे डॉक्टर निकेता म्हणतात.
३. केस झाकणे
बाहेर जाणार असल्यास हिवाळ्यासाठी योग्य असेल अशी टोपी किंवा स्कार्फमध्ये आपले केस झाकून घ्या. त्यामुळे केस वाऱ्यावर जास्त उडणार नाहीत आणि त्यांना सांभाळणे सोपे होईल.
या सगळ्यांसोबत तुम्ही कोणते उत्पादन वापरत आहेत हेदेखील महत्त्वाचे असते. त्यामुळे हिवाळ्यात कोणत्या गोष्टींचा वापर केसांसाठी करावा आणि करू नये ते पाहा.