आपल्या किचन मध्ये बऱ्याच अशा गोष्टी असतात ज्या अत्यंत गुणकारी असतात, पण आपल्याला त्याबद्दल माहित नसल्याने त्याचा वापर आपण फक्त खाण्यासाठी करतो. अर्थात याला आयुर्वेदाबद्दलची कमी जागरुकता हेच कारण आहे. आयुर्वेदामध्ये स्वयंपाकघरातील प्रत्येक पदार्थाचे शरीरासाठी काय गुणधर्म आहेत हे स्पष्ट करून सांगितलेले आहे. जुन्या काळातील लोकांना हे सगळे तोंडपाठ असल्याने ते त्याचा योग्य तो वापर करायचे. पण आता जसा काळ बदलत चालला आहे तसे हे सगळं ज्ञान सुद्धा मागे पडत चाललं आहे. तुम्हाला माहित आहे का किचन मध्ये असे बरेच रोजच्या वापरातील पदार्थ असतात ज्याचा वापर आपण केसांच्या समस्येवर करू शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नसेल माहीत तर आज जाणून घ्या ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती! या माहितीचा वापर करून तुम्ही सहज तुमच्या केसांच्या समस्या दूर करू शकता. केस निरोगी बनवण्यासाठी काही घरगुती उपाय देखील करता येतात. चहा पावडरच फायदा माहिती झाला तर, हेयर कलर वापरणं बंद कराल. जाणून घेऊया चहा पावडर केसांसाठी वापरायची.

चहा पावडरचं पाणी

केस सुंदर आणि चमकदार बनवण्यासाठी घरच्या घरी चहा पावडरचं पाणी बनवता येऊ शकतं. याकरता 1 लिटर पाण्यामध्ये फक्त 2 चमचे चहा पावडर टाका. त्यानंतर सात ते आठ मिनिटं गॅसवर चांगलं उकळून द्या. पाणी उकळल्यानंतर गॅस बंद करा. हे पाणी थंड झाल्यानंतर केसांसाठी वापरता येतं.

वापरण्याची पद्धत

केस धुवताना चहापावडरच्या पाण्याचा वापर करता येतो. केस शाम्पूने स्वच्छ धुवा. त्यानंतर हे पाणी केसांवर टाका. लक्षात ठेवा केस पूर्ण भिजले पाहिजेत. पाणी केसांवर टाकल्यावर 1 मिनिटं हाताने केसांना मसाज करा. यानंतर केसांना टॉवेल बांधा. हे पाणी केसांवर टाकल्यानंतर पाणी केसांवर टाकू नका. आठवड्यातून दोन वेळा हा उपाय करता येतो.

हेही वाचा – चहानंतर लगेच पाणी पिता? त्याचा शरीरावर कसा परिणाम होतो, ते जाणून घ्या

चहा पावडरचे फायदे

  • केसांमध्ये कोंडा झाला असेल तर, चहा पावडरच्या पाण्याने फायदा मिळतो.
  • चहा पावडरचं पाणी केसांसाठी वापरलं तर केसांची वाढ होते. केस मजबूत बनतात.
  • चहा पावडरचं पाणी केसांसाठी नॅचुरल कलर प्रमाणे वापरता येतं.
  • चहा पावडरच्या पाण्यामुळे आपले केस चांगले वाढतात. याशिवाय रेशमी आणि मुलायम बनतात.
  • या पाण्याने केस धुतल्यामुळे केसांचं गळणं, तुटणार बंद होतं.
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hair care tips home remedies tea water benefits for long healthy and beautiful hair srk
Show comments