Hair Care Tips : केसांची समस्या आजकाल सामान्य झाली आहे. मग ते स्त्री असो किंवा पुरुष, मुलगा असो किंवा मुलगी प्रत्येकाचे केसांच्या संबंधित काहीतरी प्रोब्लेम आहेत. केसांच्या समस्यांची दोन कारणे आहेत. पहिलं कारण म्हणजे बदललेली जीवनशैली आणि दुसरी तुमची केसांची निगा राखण्याची पद्धत. तुमच्या केसांची निगा राखण्याची दिनश्चर्या तुमच्या केसांवर मोठ्या प्रमाणात परिणाम करते.
अशा परिस्थितीत, केसांना निरोगी ठेवण्यासाठी आपण कोणत्या प्रकारे केसांची निगा राखली पाहिजे हा सर्वात मोठा प्रश्न आहे. तुम्ही केसांना तेल लावता का? केसांना किती वेळ तेल लावून ठेवावं माहीत आहे का? याबाबत अनेकांनी शंका असते. काही लोकांचं असं म्हणणं असतं की, फक्त एकच तास तेल ठेवावं, तर काही जणांचं म्हणणं असं असतं की, रात्रभर तेल लावून ठेवावं कारण ते तेल केसांमध्ये मुरतं आणि केसांच्या मुळांना पोषण मिळतं. पण यापैकी खरं काय मानावं? आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत केसांना तेल किती वेळ तेल लावलं पाहिजे.
केसांना तेल कधी लावावे?
ओल्या केसांना तेल लावावे की लावू नये असा अनेकांना प्रश्न पडतो. जेव्हा तुम्ही तेल लावता तेव्हा तुमचे केस किंवा टाळू स्वच्छ असणे गरजेचे आहे. बिघडलेल्या केसांना कधीही तेल लावू नका. घाण झालेल्या टाळूला तेल लावण्याची चूक अनेकजण करतात. असे केल्याने केसांना योग्य पोषण मिळत नाही. तुमच्या केसांच्या स्काल्पचा पीएच लेवल योग्य प्रमाणात असेल आणि केसांचं आरोग्यही उत्तम असेल तर ऑयलिंग ट्रिटमेंट म्हणजेच केसांना फक्त एक तासांसाठीच तेल लावावं.
तेच जर केस डॅमेज असतील किंवा कोरडे असतील तर केसांना कंडिशनिंगची जास्त गरज असते. अशावेळी केसांना तेल लावून मसाज करावा आणि ते रात्रभर ठेवणं गरजेचं असत.आपल्या केसांचं टेक्शर लक्षात घेऊन आठवड्यातून एकदा एक एक करून दोन्ही पद्धतीने तेल लावू शकता.
केवळ केस चमकदार करण्यातच नाही, तर केसांमध्ये कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन होऊ नये यासाठीदेखील नियमित तेल लावणं फायद्याचं ठरतं. तसंच, स्काल्पला पुरेसं पोषण मिळाल्यामुळे केसांची मुळं घट्ट होतात. तसंच, कुरळे केसही नीट होण्यास मदत मिळते.
हेही वाचा – पावसाळ्यात घरात एकही मच्छर दिसणार नाही, फक्त १० रुपयांत मिळवा कायमची सुटका
केसांबाबत सर्वांत मोठी समस्या कोंडा अर्थात डँड्रफ असते. केसांचा कोरडेपणा डँड्रफ होण्यास कारणीभूत ठरतो. नियमित तेल लावल्यामुळे स्काल्प कोरडं राहत नाही आणि पर्यायाने डँड्रफच्या समस्येपासूनही सुटका मिळते. डँड्रफ कमी झाल्यामुळे त्यामुळे होणारी केसांची गळतीही थांबते.
अशा रीतीने केवळ तेल लावण्याची सवय लावून तुम्ही केसांशी संबंधित कित्येक समस्यांपासून सुटका मिळवू शकता.