तसं पाहायला गेलं तर केसांची काळजी १२ महिने घ्यावी लागते. पण उन्हाळ्यामध्ये केसांची खास काळजी घ्यावी लागते. कारण वातावरणातील उष्णतेमुळे केसांमधील नैसर्गिक ओलावा शोषून घेतला जातो. उन्हाळ्यात आपले केस कोरडे आणि निर्जीव होतात. त्यामुळे केसं तुटू लागतात आणि केसांची चमकही कमी होते. म्हणून उन्हाळ्यात केसांची विशेष काळजी घ्यावी लागते. उन्हाळ्यात घामामुळे आपले केस आधिक खराब होतात. त्याचप्रमाणे आपल्या स्काल्पवर असणाऱ्या तैल ग्रंथीमधून अधिक प्रमाणात तेल बाहेर येते. यामुळे केसांच्या मुळांना इजा पोहोचण्याची दाट शक्यता असते. अशावेळी आठवड्यातून किती वेळा केस धुवायचे असा प्रश्न पडतो. चला तर जाणून घेऊयात उन्हाळ्यात किती वेळा केस धुवावेत.

जास्त वेळा केस धुणं केसांसाठी अपायकारक –

महिलांचं सौंदर्य हे केसांमुळे अधिक खुलतं, आपले केस जरा खराब दिसले की सारखे सारखे केस धुण्याचीही अनेकांना सवय असते. परंतु तुम्हाला ही सवय मोडणं आवश्यक आहे. कारण जास्त वेळा केस धुतल्यानं तुमच्या केसांवर त्याचा वेगळा परिणामही होऊ शकतो. केसांमधील नैसर्गिक तेलाचे प्रमाण कमी होऊन तुमचे केस रूक्ष दिसू लागतात. त्यातून बरेच दिवस तुम्ही केस धुतलेच नसतली तर त्याचाही परिणाम तुमच्या केसांवर व्हायला वेळ लागत नाही. तेव्हा आपल्याला याचा योग्य तो बलॅन्स ठेवणे आवश्यक राहते.

Tomato
पावसाळ्यात टोमॅटो वापरण्यापूर्वी एकदा नव्हे दोनदा करा खात्री, कारण तज्ज्ञांकडून जाणून घ्या….
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Best time for Job Hunting
Best time for Job Hunting : कोणत्या महिन्यांमध्ये नोकरी शोधावी? जाणून घ्या, नोकरी शोधण्याची सर्वोत्तम वेळ
Due to heavy rains production of custard apple in Maharashtra has decreased by up to 30 percent Pune news
अतिवृष्टीचा सीताफळाला फटका बसला? जाणून घ्या, जुलै महिन्यातील पावसामुळे काय झालं
रात्री गाडी चालवताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी? ‘या’ टिप्स करतील मदत
Bad sleep Routine can increase heart disease risk losing one hour of sleep takes four days to recover
झोपेचं रुटीन बिघडलंय! फक्त एक तासाची कमी झोप तुमच्या आरोग्यासाठी ठरेल धोक्याची घंटा? तज्ज्ञांनी केला खुलासा
fishermen demand government to approve diesel quota soon
हजारो मच्छीमारांना नव्या हंगामात डिझेल कोट्याची प्रतीक्षा; अनुदानास मंजुरी नसल्याने मच्छीमारांना आर्थिक भुर्दंड
simple tips the car will look like new even in rainy season
‘या’ सोप्या टिप्सच्या मदतीने पावसाळ्यातही कार दिसेल नव्यासारखी

केस किती वेळा धुतावेत? –

केसांची स्थिती ही दोन गोष्टींवरून ठरते एक म्हणजे ऑयली हेअर आणि ड्राय हेअर तेव्हा आपल्याला त्याप्रमाणे आपले केस किती वेळा धुवावेत याबद्दल योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. ड्राय केस असलेल्या महिला योग्य मॉश्चराईझर शॅम्पूसह आठवड्यातून तीन वेळा केस धुवू शकतात. तर ऑईली हेअर असलेल्या स्त्रियांनी निदान तीन वेळा तरी केस धुणे आवश्यक आहे. यामध्ये कोंडा आणि कुरळे केस असलेल्या तसेच पातळ केस असलेल्या महिलांनाही आपल्या केसांसाठी योग्य तो तज्ज्ञांचा सल्ला घेऊन केस धुणं आवश्यक आहे. बादाम, एरंडेल, जैतुन, नारळ आणि लव्हेंडर या पाच तेलाचा वापर केसांसाठी उन्हाळ्यात करावा. हे पाच तेल योग्य प्रमाणात मिसळून, अंघोळ करण्याआधी ४ तास केसांना लावून ठेवावे. त्यानंतर माइल्ड शॅम्पूने केस धुवावेत.

हेही वाचा – गुलाबपाणी फक्त त्वचेसाठीच नाहीतर आरोग्यासाठीही ठरतंय गुणकारी! जाणून घ्या फायदे

मोठ्या दातांचा कंगवा वापरा –

केस धुतल्यानंतर केसांमधील गुंता काढण्यासाठी बारीक दातांच्या कंगव्याचा वापर करू नका. ओले केस तुटण्याची शक्यता अधिक असते. मोठ्या दातांचा  कंगवा वापरल्यास केसांवर पडणाऱ्या दबावाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे केस तुटण्याची शक्यता देखील कमी होते. जर तुम्ही केसांना तेल लावणार असाल, तर लावलेले तेल समप्रमाणात लावण्यासाठी मोठ्या दाताच्या कंगव्याचा वापर करणे योग्य आहे.