केस हा प्रत्येक महिलांचा जिव्हाळ्याचा विषय. आपले केस लांब, मजबूत असावे, केसांचं गळणं कमी व्हावं म्हणून आपण १०० उपाय करून पाहतो. केसांची चांगली निगराणी राखण्यासाठी काही गोष्टी करणं आवश्यक आहे, तरच केसांचं आरोग्य सुधारतं. यासाठी समतोल आहार, चांगला शॅम्पू-कंडिशनर वापरणं गरजेचं आहे. पण त्याचबरोबर योग्यवेळी हेअरकट करणंही आवश्यक आहे, आता हेअरकट कधी आणि केव्हा करावा याविषयीही अनेकींच्या मनात काही संभ्रम आहेत. तर जाणून घेऊयात हेअर कट कधी करावा आणि त्यांची काळजी कशी घ्यावी याविषयी थोडक्यात.
नवरा-बायकोतील भांडण टाळण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा
दर तीन ते चार महिन्यांनी केस थोडेसे ट्रीम करावे, यामुळे केसांची वाढ चांगली होते. अनेकदा केसांवर सतत शॅम्पू वापरणं, वाटेल तसं केस विंचरणं आणि केसांविषयीचा निष्काळजीपणा यामुळे केस दुभंगतात, त्यांची वाढ खुटंते केस अधिक रुक्ष होत जातात म्हणूनच केस दुभंगण्याची समस्या तुम्हाला वारंवार जाणवत असेल तर दर तीन ते चार महिन्यांनी केस थोडेसे ट्रीम करून घ्यावे, किंवा हेअर कट करावा.
हेअर कट कसा निवडावा
– गोल चेहरा असेल तर लेअर्स कट निवडावा यामुळे चेहऱ्याचा गोलाकार कमी दिसतो.
– बदामाकृती चेहरेपट्टी असेल तर शॉर्ट लाँग हेअरकट निवडावा.
– आयताकृती चेहऱ्यावर ब्लंट बँग्ज, लाँग, साइडस्वेप्ट बँग्ज हेअर कट चांगला दिसतो.
– अंडाकृती चेहऱ्यावर कोणाताही हेअरकट शोभून दिसतो.