Side Effects Of Hair Dryer : तुम्हीही दररोज हेअर ड्रायर वापरता का? जर वापरत असाल तर त्याचे शरीरावर काय परिणाम होतात हे जाणूम घेणे अत्यंत आवश्यक आहे. ओले केस सुकवण्यासाठी, मेकअप व्यवस्थित सेट व्हावा यासाठी किंवा लिपस्टिक सुकवण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर केला जातो. पण हेअर ड्रायरची हवा शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकते. हेअर ड्रायर मधील हवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फिल्डद्वारे तयार केली जाते. यामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण खूप कमी असते. त्यामुळे अशी हवा शरीराला नुकसानकारक ठरू शकते. कशी ते जाणून घ्या.
हेअर ड्रायरचा वापर करणे कशाप्रकारे नुकसानकारक ठरु शकते जाणून घ्या
आणखी वाचा : लहान मुलं अनोळखी व्यक्तींशी बोलताना घाबरतात का? त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी ‘या’ टिप्स करतील मदत
केस वेगाने पांढरे होऊ शकतात
हेअर ड्रायर वापरल्याने केसामध्ये असणारे मेलानिन कमी होऊ शकते, यामुळे केसांच्या रंगावर प्रभाव पडतो आणि आणि केस वेगाने पांढरे होऊ शकतात. त्यामुळे हेअर ड्रायरचा अतिवापर टाळण्याचा सल्ला दिला जातो.
त्वचा कोरडी होऊ शकते
काहीजण मेकअप सेट करण्यासाठी किंवा लिपस्टिक सुकवण्यासाठी सतत हेअर ड्रायरचा वापर करतात, यामुळे त्यांची त्वचा कोरडी होऊ शकते. यामुळे ड्राय पॅचेस, खाज येणे, एग्जिमा ट्रिगर अशा समस्या उद्भवू शकतात.
डोळे कोरडे होऊ शकतात
हेअर ड्रायर च्या हवेमुळे डोळे कोरडे होण्याची समस्या उद्भवू शकते. हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकते. यामध्ये डोळे लाल होणे, डोळ्यांना खाज येणे अशी लक्षणं दिसू शकतात.
आणखी वाचा : घामातून येणारी दुर्गंधी असू शकते ‘या’ गंभीर आजारांचे लक्षण; वेळीच सावध व्हा
केसांसाठी नुकसानकारक
रोज हेअरड्रायर वापरल्याने केसांमध्ये फाटे फुटू शकतात म्हणजेच दुहेरी केसांची संख्या वाढू शकते. कारण हेअर ड्रायर वापरल्याने केसांमधील ओलावा कमी होतो आणि ते कमकुवत होतात.