धावपळीच्या जीवनशैलीत केस गळणं कॉमन होत आहे. मात्र, जास्त प्रमाणात सतत केस गळत राहिले तर ही चिंतेची बाब असते. उन्हाळ्यातही अनेकांना केस गळण्याचा त्रास सुरू होतो. यामागे बरीच कारणे असू शकतात. उन्हाळ्यात आपले केस कोरडी आणि निर्जीव होतात. त्यामुळे केसं तुटू लागतात आणि केसांची चमकही कमी होते. म्हणून उन्हाळ्यात केसांची विशेष काळजी घ्यावी लागते. उन्हाळ्यात घामामुळे आपले केस आधिक खराब होतात. यामुळे किमान दोन दिवसांमध्ये एकदा केस धूणे आवश्यक आहे.
या हंगामात हवा उष्ण असते. गरम हवेच्या संपर्कात आल्याने केस कोरडे होतात. कोरडे केसही लवकर कमकुवत होतात. कमकुवत केस लवकर तुटतात. या ऋतूमध्ये वाईट सवयींचा परिणाम त्वचा आणि केसांवर होतो. सतत केस गळल्यामुळे तुम्हाला टक्कल पडू शकता. टक्कल पडण्याची सुरुवात डोक्याच्या पुढच्या आणि बाजूने होते. टक्कल पडल्यास पुरुषांमध्ये केसांची रेषा हळूहळू कमी होते. त्याच वेळी, महिलांमध्ये भांगाच्या आसपास केस कमी होऊ लागतात. हळूहळू ही समस्या वाढत जाते आणि केस बारीक आणि पातळ होऊ लागतात. केस गळणे वेळेवर थांबवणे आवश्यक आहे. यासाठी काही टिप्स फॉलो करा.
केसगळती कशी रोखावी ?
- केस गळायला सुरुवात झाली असेल तर या सोप्या टिप्सचे पालन करा
- एसीच्या हवेत जास्त वेळ राहू नका.
- केस धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर करू नका.
- केसांवर जास्त हीटिंग मशीन वापरू नका.
- टाळूमध्ये रक्त प्रवाह वाढवण्यासाठी दररोज व्यायाम करा.
- फायबर, व्हिटॅमिन-ई, व्हिटॅमिन-सी युक्त पदार्थांचे सेवन करा.
- दिवसातून 2 ते 3 वेळा केस कंगव्याने विंचरा. या सवयीने केस अडकून तुटणार नाहीत.
हेही वाचा – Cucumber facemask: काकडीपासून बनवलेला ‘हा’ फेसपॅक उन्हाळ्यात त्वचा ठेवेल थंड, जाणून घ्या कसा तयार करायचा?
उन्हाळ्यात केसगळतीची कारणं –
ऊन आणि प्रदूषण
सूर्यप्रकाशात दीर्घकाळ राहिल्याने आणि प्रदूषणामुळे केस कमकुवत होतात. अतिनील किरणांमुळे केसांची आर्द्रताही कमी होते. केसांमध्ये ओलावा नसल्यामुळे केस कोरडे आणि निर्जीव दिसू लागतात. बाहेर जात असल्यास केसांना टोपी किंवा स्कार्फने झाकून ठेवा. तसेच, केस फक्त सौम्य शांपूने स्वच्छ करा.
पुरेशा प्रमाणात पाणी न पिणे
पुरेसे पाणी न प्यायल्याने केस गळण्याची शक्यता असते. उन्हाळ्यात हायड्रेशनची काळजी न घेतल्याने केस कमकुवत होऊन तुटायला लागतात. पाण्याच्या कमतरतेमुळे केस गळण्याची समस्या देखील उद्भवू शकते.
दररोज केस धुणे
उन्हाळ्यात दररोज आंघोळ करणे ही चांगली सवय आहे. पण केस रोज धुवू नयेत. केसांना रोज शांपू आणि कंडिशनर लावल्याने केसांची मुळं कमकुवत होतात. उन्हाळ्यात केस आठवड्यातून 2 ते 3 वेळा धुवा.
केस घट्ट बांधणे
तुम्हालाही नेहमी केस बांधून ठेवायला आवडतात का? या सवयीमुळे केस गळण्याची समस्या उद्भवू शकते. खरं तर, उन्हाळ्यात केस खूप घट्ट बांधल्यामुळे, घाम केसांमध्ये अडकतो. या कारणास्तव, बॅक्टेरिया वाढू लागतात. यामुळे केस गळणे आणि कोंडा होऊ शकतो.
हेही वाचा – Kajal for Babies : सावधान! बाळाच्या डोळ्यात काजळ घालत असाल तर… आधी हे वाचा
आपल्या केसांना योग्य पोषण मिळण्यासाठी आणि ते चमकदार होण्यासाठी, केस धुतल्यानंतर कंडीशनिंग करणे महत्वाचे आहे. तसे, बाजारात आधीपासूनच बऱ्याच प्रकारचे कंडिशनर्स आहेत, जे आपल्या केसांना ठराविक काळासाठी चमकदार बनवू शकतात. परंतु, या कंडिशनर्समध्ये रसायने खूप जास्त प्रमाणात असता. आपल्या केसांच्या आरोग्यासाठी ती खूप घातक सिद्ध होतात. ही रसायने आपल्या केसांना रुक्ष आणि निर्जीव बनवतात. अशावेळी आपण घरगुती हेअर कंडिशनर वापरू शकता