आपल्या स्वयंपाकघरात, खाद्यपदार्थांमध्ये अशा काही गोष्टी असतात; ज्या चवीला तर मस्त लागतातच; पण सोबत त्यामध्ये भरपूर पौष्टिक घटकदेखील असतात. परंतु, त्यांची माहिती मात्र आपल्याला अजिबात नसते. त्यामुळे अशा गोष्टींचा आहारात फारसा समावेशही केला जात नाही. असाच एक फार कुणाला पसंत नसणारा किंवा माहीत नसलेला पदार्थ आहे आणि तो म्हणजे अळीव. लहान चॉकलेटी रंगाचे अळीव प्रचंड प्रमाणात पौष्टिक असून, तुमच्या आरोग्यासंबंधी असणाऱ्या अनेक तक्रारी दूर करण्यास मदत करू शकतात. अळिवाचे लाडू, खीर असे पदार्थ तुम्ही नक्कीच खाऊन पाहिले असतील किंवा निदान ऐकले असतील. असे हे विविध पदार्थांत वापरले जाणारे अळीव केसांच्या वाढीपासून ते वजन घटवणे, लोहाची कमतरता भरून काढणे यांसारख्या अनेक गोष्टींत उपयोगी असतात, अशी माहिती इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरील @leemamahajan या अकाउंटवरून शेअर झालेल्या व्हिडीओमधून मिळते. या लहानशा पदार्थाचा फायदा कसा करून घ्यायचा ते पाहा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अळिवाचा वापर कसा करावा?

हेही वाचा : तुम्हाला जेवताना सॉफ्ट ड्रिंक पिण्याची सवय आहे? पाहा या सवयीबद्दलचा अभ्यास काय सांगतो ते….

इन्स्टग्रामवरील [@leemamahajan] आहारतज्ज्ञ लीना महाजनने सांगितल्यानुसार,

  • एक ग्लास पाण्यामध्ये, अर्धा लहान चमचा [tsp] अळीव घालून प्यावे. हा प्रयोग सुरुवातीला तुम्ही आठवड्यातील तीन दिवस करू शकता.
  • अळिवाला मोड आणून, त्याचा वापर तुम्ही सॅलडमध्येदेखील करू शकता.
  • दूध, लस्सी किंवा स्मूदी बनवताना त्यामध्येही अळीव वापरू शकता.
  • लोहाचे प्रमाण वाढवायचे असल्यास ग्लासभर पाण्यामध्ये अर्धा लहान चमचा [tsp] अळीव आणि लिंबाच्या रसाचे काही थेंब घालून, जेवण करण्याआधी १५ मिनिटांपूर्वी प्यावे.

अळिवाचे होणारे फायदे

१. केसांची वाढ

आहारात अळिवाचा समावेश केल्यामुळे केसांच्या पोषणासाठी आवश्यक असणारी जीवनसत्त्वे, लोह, कॅल्शियम, इसेन्शियल फॅट्स, अँटीऑक्सिडंट्स असे सर्व घटक यामध्ये असल्याने केसांची वाढ होण्यासाठी ते उपयोगी ठरते.

२. वजन कमी करणे

अळिवामध्ये असणाऱ्या फायबर, प्रथिनांमुळे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत होऊ शकते, असे सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋतुजा दिवेकरने सांगितल्याची माहिती एनडीटीव्हीच्या एका लेखावरून मिळते. अळिवाचे सेवन केल्याने पोट बराच काळ भरल्यासारखे वाटते. त्यामुळे अनावश्यक पदार्थ खाणे टाळले जाते. परिणामी वजन नियंत्रित ठेवले जाऊ शकते. त्यासोबतच यामध्ये फॅट्सचे प्रमाणही कमी असते. त्यामुळे आहारात अळीव उपयुक्त ठरतात.

३. पोटाच्या समस्यांवर उपयोगी

पोटासंबंधीचे त्रास म्हणजे अपचन, गॅस, बद्धकोष्ठता असे काही त्रास होत असल्यास, अळीव फायदेशीर ठरू शकतात, अशी माहिती लिमा महाजनच्या व्हिडीओमधून मिळते.

४. लोहाचे प्रमाण वाढवणे

१ [tbsp] लहान चमचा अळिवामध्ये १२ मिलिग्रॅम लोह असते. त्यामुळे शरीरामधील रक्तातील लोहाचे प्रमाण कमी असल्यास किंवा रक्ताची कमतरता असल्यास, अळीव ती कमतरता भरून काढण्याचे काम करते.

@leemamahajan या अकाउंटवरून शेअर झालेल्या या व्हिडीओला ९२.७ K व्ह्युज मिळाले आहेत.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hair growth to weight loss use aliv or garden cress seeds learn about its healthy benefits dha
Show comments