महिलांच्या सुंदरतेमध्ये केसांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे महिलांना आपल्या केसांची काळजी घेणे आवश्यक असते. प्रत्येक स्त्रीला सिल्क आणि चमकदार केस हवे असतात पण प्रत्यक्षात स्थिती मात्र उलट असते. कित्येकदा असे होते की एक दिवस चमक असते आणि दुसऱ्या दिवशी झोपेतून उठल्यानंतर केस कोरडे होतात. जर तुम्हालाही अशी समस्या जाणवत असेल तर त्यावर सोपा उपाय आम्ही या लेखात सांगणार आहोत. काही सोप्या टिप्स वापरून तुम्ही केसांची चमक परत मिळवू शकता आणि त्याच बरोबर केसांना मजबूत बनवू शकतो.
रेशमी उशी कव्हर्स वापरा वापरा
फ्रिझी आणि कोरडे केसांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही रेशमी किंवी सॅटन उशी कव्हर्स वापरू शकता. सूती कपड्यापासून तयार केलेल उशी कव्हर्सवर केसांचे जास्त घर्षण होते. ज्यामुळे तुमचे केसांचा गुंता होतो आणि मग कोरडे आणि खराब दिसू लागतात. अशा स्थितीमध्ये तुम्ही रेशमी किंव सॅटन उशी कव्हर्स वापरून तुमच्या केसांची चमक टिकवून ठेवू शकता.
हेही वापरा – लिंबूमळे कमी होते का ब्लड प्रेशर? भरपूर व्हिटॅमिन सी असलेल्या या फळाचे आहेत अनेक फायदे
ओल्या केसांमुळे वाढते समस्या
नेहमी असे दिसून येते की महिला सायंकाळी केस धूतात आणि मग ओले केस घेऊन झोपतात ज्यामुळे त्यांचे केस दुसऱ्या दिवशी फ्रिझी दिसू लागतात. खरं तर ओले केसांना नुकसान पोहचण्याची शक्यता जास्त असते. त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे ओले केस घेऊन झोपल्यामुळे बुरशी संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे झोपण्यापूर्वी तुमचे केस चांगल्या प्रकारे सुकवा.
हेअर ड्रायर किंवा टॉवेल वापरू नका
महिला आपले केस सुकवण्यासाठी टॉवेल किंवा हेअर ड्रायर वापरतात. अशामध्ये काही वेळासाठी केस चमकदार आणि सुळसुळीत दिसतात पण नंतर ते लगेच रुक्ष होतात. एकिकडे हेअर ड्राय तुमच्या केसांना नुकसान पोहचवतो तर टॉवेलमुळे केसांचा नैसर्गिक ओलावा काम होता. त्यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही कॉटन टी शर्ट किंवा मायक्रोफायबर्स टॉवेल वापरू शकतात. हे केवळ केसांमध्ये साचलेले पाणी शोषून घेतो आणि ते फ्रिझी होत नाही
हेही वाचा –Beauty Tips: पहिल्यांदाच ‘स्पा’ करणार आहात? मग महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा
केस मोकळे सोडणे
अनेक महिला बहुतेकवेळा केस मोकळे सोडतात त्यामुळे सकाळी उठल्यानंतर केस रुक्ष आणि फ्रिझी दिसू लागतात. त्यामुळे झोपताना केस बांधा. केस बांधल्यामुळे झोपण्यापूर्वी त्यामध्ये गुंता होत नाही. तसेच केसांमध्ये ओलावा टिकून राहतो.
हेअर मास्क वापरा
रात्री झोपण्यापूर्वी केसांसाठी हेअर मास्क वापरा. त्यामुळे सकाळी उठेपर्यंत तो केसांना हायड्रेट करू शकतो. कोरडे आणि फ्रिजी केसांपासून वाचण्यासाठी सर्वोत्तम उपायांपैकी एक आहे.