आहार, चुकीची जीवनशैली, प्रदूषण आणि केसांची अयोग्य काळजी यामुळेही केसांची वाढ थांबते, शिवाय केसांसबंधी अनेक समस्याही उद्भवतात. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या जीवनशैलीत बदल करून केसांची वाढवू शकता. पण जर तुम्हाला तुमचे केस लवकर वाढवायचे असतील, तर केसांची काळजी घेण्यासाठी अशा काही नैसर्गिक गोष्टींचा वापर करू शकता. ज्यामुळे तुमच्या केसांना आतून पोषण मिळतेच शिवाय चे केसांची वाढदेखील झपाट्याने होईल.
आज आम्ही तुम्हाला अशाच केस झटपट वाढवण्यासाठी काही नैसर्गिक उपाय सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया केसांची वाढ होण्यास उपयुक्त ठरणारे काही घरगुती आणि नैसर्गिक उपाय.
हेही वाचा- तुमच्या मुलांचे डोळे कोरडे पडतायत? तर मग जाणून घ्या त्यामागची कारणे आणि घरगुती उपचार
तिळाचे तेल आणि मेथीचे दाणे –
तिळाचे तेल आणि मेथीचे दाणे हे दोन्ही केसांना पोषण देण्याचे काम करतात. या दोन्हींपासून तयार केलेल्या हेअर मास्कच्या मदतीने तुम्ही केसांची वाढ झटपट होऊ शकत. हे हेअर मास्क करण्यासाठी मेथीचे दाणे कोरडी भाजून त्याची पावडर बनवा. तुमच्या केसांच्या लांबीनुसार, एका भांड्यात मेथी पावडर घ्या आणि त्यात १ चमचा तिळाचे तेल मिसळा. तेल जास्त नसावे हे लक्षात ठेवा. काही वेळ मसाज केल्यानंतर केस अर्धा तासानंतर केस धुवा. आठवड्यातून २ वेळा हा उपाय करु शकता.
आवळा रस –
व्हिटॅमिन सी आणि आयर्नने समृद्ध आवळा ज्यूस नैसर्गिक घटकांनी परिपूर्ण आहे. त्याचा केसांना अनेक प्रकारे फायदा होतो. यासाठी आवळ्याचा रस केसांना लावा आणि अर्ध्या तासानंतर केस धुवा.
हेही वाचा- घरातील झुरळांच्या त्रासाने त्रस्त आहात? सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय
नारळाचे दुध –
नारळाच्या दुधात ऑलिव्ह ऑईल मिक्स करून डोक्याला मसाज करा. उरलेले मिश्रण केसांना लावा. यामुळे केस लांब, रेशमी आणि चमकदार होतील
कोरफड जेल –
कोरफड जेल केसांच्या वाढीसाठी खूप फायदेशीर आहे. तुम्ही हेअर पॅक आणि तेल लावण्यासाठी त्याचा वापरू शकता. आठवड्यातून तीन वेळा कोरफड जेल लावा आणि रात्री झोपा आणि सकाळी उठल्यानंतर केस पाण्याने धुवा. शिवाय तुम्हाला हवे असल्यास तुम्ही आंघोळीच्या २ तास आधीही कोरफडीचे जेल लावू शकता.
कांद्याचा रस –
केस लवकर वाढण्यासाठी तुम्ही कांद्याचा रस लावू शकता. यामध्ये असलेले सल्फर केसांसाठी खूप चांगले आहे. कांदा ग्राइंडरमध्ये बारीक करून घ्या आणि एकाद्या कपड्याने तो रस गाळून घ्या. हा रस कापसाच्या मदतीने केसांना लावा.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे, केसा संदर्भातील अधिकच्या माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या)