How To Make Rice Water For Rapid Hair Growth: केसाच्या तक्रारीवरून स्त्री- पुरुष दोघेही त्रस्त आहेत. अनेकजण केसवाढीसाठी ऑनलाईन उपाय शोधत असतात. पण अनेकदा आयुर्वेदाच्या नावावर विकल्या जाणाऱ्या उत्पादनांची किमंत फारच वाढीव असते. अशावेळी घरीच काही उपाय करता आला तर किती बरं होईल ना? आज आपण केसाच्या झटपट वाढीसाठी वर्षानुवर्षे वापरण्यात येणारा उपाय पाहणार आहोत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, केसवाढीसाठी काय आवश्यक असतं हे पाहूया व मग हे आवश्यक पोषण कसे मिळवता येईल हे ही जाणून घेऊया…
आशियामध्ये भाताचे सेवन अधिक प्रमाणात केले जाते. यामुळेच तांदळाला आपल्याकडे विशेष महत्त्व आहे. तांदळातुन मिळणारे जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स केसांना पोषण आणि मजबूत करतात. केसांच्या वाढीसाठी तांदळाचे पाणी कसे बनवावे हे व त्याचा वापर कसा करावा हे पाहूया..
तांदळाचे पाणी म्हणजे तांदूळ भिजवलेले किंवा उकळल्यावर शिल्लक राहिलेले स्टार्च युक्त पाणी. या पाण्यात अमीनो ऍसिड, जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. जे केसांचे आरोग्य आणि वाढ सुधारू शकतात. तांदळाच्या पाण्यातील अमीनो अॅसिड केसांना मजबूत करण्यासाठी कामी येतात. तर जीवनसत्त्वे आणि खनिजे केसांना पोषण पुरवतात आणि वाढीस प्रोत्साहन देतात
केसांच्या वाढीसाठी तांदळाचे पाणी कसे बनवायचे? (How to Make Rice Water for Hair Growth)
भिजवण्याची पद्धत:
- एक कप तांदूळ पाण्याने स्वच्छ धुवा.
- एका भांड्यात तांदळामध्ये दोन कप पाणी घालून झाकून ठेवा
- तांदूळ किमान ३० मिनिटे किंवा जास्तीत जास्त २४ तास भिजत ठेवा.
- तांदळाचे पाणी स्वच्छ डब्यात गाळून घ्या
उकळण्याची पद्धत:
- एक कप तांदूळ पाण्याने स्वच्छ धुवून घ्या
- एका भांड्यात भाताबरोबर तीन कप पाणी एकत्र करा.
- पाणी व तांदूळ १०-१५ मिनिटे उकळून घ्या
- तांदळाचे पाणी स्वच्छ डब्यात गाळून घ्या.
केसांच्या वाढीसाठी तांदळाचे पाणी कसे वापरावे (How to Use Rice Water for Hair Growth)
केस तांदळाच्या पाण्याने धुवा:
- केस नेहमीप्रमाणे शॅम्पू आणि कंडिशन केलेले असावेत.
- तांदळाचे पाणी टाळू आणि केसांना लावा आणि मसाज करा.
- १०-१५ मिनिटे पाणी केसामध्ये राहू द्या
- मग साध्या पाण्याने केस पूर्णपणे स्वच्छ करा.
तांदळाच्या पाण्याचा हेअर मास्क
- तांदळाच्या पाण्यात लॅव्हेंडर किंवा पेपरमिंट सारख्या तेलाचे काही थेंब घाला.
- हे मिश्रण हाताने मिक्स करा आणि केस व टाळूला लावा.
- अर्धा तास किंवा तासाभरासाठी आपले केस शॉवर कॅपने झाकून ठेवा.
- नेहमीप्रमाणे, केस पाण्याने आणि शाम्पूने चांगले धुवा
हे ही वाचा<< हेअर स्पा क्रीम घरीच बनवायाची सोपी पद्धत; तुमच्या केसांसाठी फक्त दोन मिनिट काढा
केसांच्या वाढीसाठी तांदळाचे पाणी वापरण्याच्या टिप्स सुद्धा लक्षात घेणे आवश्यक आहे. मंडळी तांदळाचे पाणी बनवण्यासाठी सेंद्रिय तांदूळ वापरा. तांदूळ भिजवण्यासाठी फिल्टर केलेल्या पाण्याचाच वापर करा व तांदूळ जास्त वेळ पाण्यात भिजवून ठेवू नये, कारण त्याचा आंबट वास येऊ शकतो.तसेच तुमचा टाकाऊ जर संवेदनशील असेल तर त्याआधी एकदा वैद्यकीय सल्ला सुद्धा घेऊ शकता.