How often should you straighten your hair: कुरळ्या केसांची काळजी घेणे कठीण असते. अशा अनेक मुली आहेत ज्या आपले कुरळे केस सरळ करण्यासाठी हेअर स्ट्रेटनर वापरतात. ऑफिस किंवा कॉलेजमध्ये जाणाऱ्या अनेक मुली किंवा स्त्रिया रोजच केस सरळ करतात. आंचल पंथ यांच्या मते, आम्ही केस सरळ करण्यासाठी स्ट्रेटनरचा वापर करतो. याला थर्मल हेअर स्ट्रेटनिंग असेही म्हणतात. मी वैयक्तिकरित्या २००४ पासून स्ट्रेटनर वापरत आहे. तसंच नियमितपणे हीटिंग टूल वापरून आपले केस सरळ केल्याने ते कमकुवत होऊ शकतात, ज्यामुळे केस गळतात.

केस सरळ करण्यासाठी तुम्ही किती वेळा स्ट्रेटनर वापरू शकता?

डॉक्टर आंचल यांच्या मते आठवड्यातून एकापेक्षा जास्त वेळा याचा वापर करणे टाळावे. जर तुम्हाला हे हीटिंग टूल आठवड्यातून एकापेक्षा जास्त वेळा वापरायचे असेल तर, इतर पर्याय शोधा. हीट स्टाइलिंग उत्पादनांचा जास्त वापर केल्याने केस कोरडे आणि निर्जीव होऊ शकतात.

Kartik Aaryan
डिओड्रंटचा वापर करून ‘या’ अभिनेत्याने जाळले होते बहिणीचे केस; आईनेच केला खुलासा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
pune vada pav crime news
पुणे: गार वडापाव देताच डोके गरम झाले, ग्राहकाची विक्रेत्याला मारहाण
Boy Spoils Sister's Rangoli Caught on CCTV
संधी साधली अन् बहिणीने काढलेली रांगोळी खराब केली, पण अशी झाली पोलखोल, VIDEO एकदा पाहाच
bull Fight Viral Video | Bull Attack on boy Wearing Red Shirt
“शिंगांनी उडवलं अन् लाथांनी तुडवणार इतक्यात…”, पिसाळलेल्या बैलाचा व्यक्तीवर हल्ला; पाहा थरारक Video
Social media influencer and YouTuber is dating a tree and films herself kissing, hugging, and going out with the tree video viral
आधी केली किस मग मारली मिठी अन्…, इन्फ्लूएंसर करतेय चक्क झाडाला डेट! नेमकं प्रकरण काय? पाहा VIDEO
Young boy bite dog video viral on social media shocking and funny video
VIDEO…अन् ‘तो’ चक्क कुत्र्याला कचाकचा चावला; हल्ला करताच रागावलेल्या तरुणानं घेतला बदला, पण शेवट…

( हे ही वाचा: हृदयाच्या चांगल्या आरोग्यासाठी बटाटा फायदेशीर; जाणून घ्या कसे?)

‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

आपले केस शैम्पूने धुवा आणि कोरड्या खराब झालेल्या केसांसाठी बनवलेले कंडिशनर वापरा. यानंतर हीट प्रोटेक्टेंट स्प्रे लावा. नंतर ब्लो ड्राइ करा किंवा पूर्णपणे कोरडे करा. जेव्हा केस पूर्णपणे कोरडे होतात तेव्हा ते लहान भागांमध्ये विभाजित करा. यानंतर, एक ते दोन स्ट्रोकसाठी कमी हिटवर आयरनचा वापर करा. सिरॅमिक कोटेड हेअर स्ट्रेटनर वापरा.

डॉक्टर पंथच्या म्हणण्यानुसार केस स्ट्रेट करतानाही काही खबरदारी घ्यायला हवी. लक्षात ठेवा ओल्या केसांवर कधीही स्ट्रेटनर वापरू नका. कारण केस ओले राहिल्यास जास्त नुकसान होऊ शकते. यासोबतच डॉ. चांदनी जैन गुप्ता, डर्मेटोलॉजिस्ट, अॅलेंटिस हेल्थकेअर, यांनी इंडियन एक्सप्रेससोबत केस स्ट्रेटनर्समुळे जाणवणारे काही सामान्य दुष्परिणाम शेअर केले आहेत.

( हे ही वाचा: बदाम, काजू आणि पिस्ता किती प्रमाणात खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे? तज्ज्ञांकडून जाणून घ्या योग्य मात्रा)

केस गळणे

केसांचे कोणतेही साधन अयोग्य रीतीने वापरण्याचा एक साइड इफेक्ट म्हणजे केस गळणे. कारण उष्णतेमुळे केसांचे नुकसान होते.

कोरडेपणा

हेअर स्ट्रेटनर वापरण्याचे सर्वात सामान्य दुष्परिणाम म्हणजे कोरडेपणा कारण जास्त उष्णता आणि रसायने केसांचे नैसर्गिक तेल काढून टाकतात.

स्प्लिट एंड्स

उष्णता आणि रसायनांच्या वापरामुळे स्प्लिट एंड्स होऊ शकतात, जे कमकुवत केसांचे लक्षण आहे. आपले केस वारंवार ट्रिम करा.

( हे ही वाचा: Bath Tips: तुम्ही स्किन कॅन्सरला तर आमंत्रण देत नाही आहात ना? आजच बदला ‘या’ आंघोळीच्या चुकीच्या सवयी)

एलर्जी रिएक्शन

जरी अशी प्रकरणे फारच दुर्मिळ आहेत परंतु काही दुर्मिळ घटनांमध्ये हे रसायन टाळू आणि त्वचेवर प्रतिक्रिया देऊ शकते ज्यामुळे खाज सुटणे, टाळू लाल होणे किंवा मानेवर फोड येऊ शकतात.