तीस चाळीस वर्षांपूर्वी शम्मी कपूर आणि अमेरिकेत एल्व्हिस प्रेस्लीसारख्या स्टाईल आयकाॅन्समुळे ‘कोंबडा’ स्टाईल फेमस होती. काय कोंबड्यासारखे केस केले आहेत हा टोमणा एकदातरी सगळ्या मुलांनी एेकला आहे. तसं आताही ही हेअरस्टाईल करता येते पण आधीच्या लोकांसारखे आमचे केस राहिले कुठे? सध्या विशी पंचविशीतच हेअरलाईन कमी होणारे अनेकजण आपण पाहतो. अनेक तरूणांचे तर केसही पांढरे होतात. आपलं आरोग्य चांगलं राखणं हे केसांची निगा राखण्यासाठी खूप महत्त्वाचं असतं.
हेल्थ सुधारणं वगैरे उपाय असले तरी ते थोडे लाँग टर्म आहेत. रोजच्या रोज मागे जाणाऱ्या हेअरलाईनला थांबवण्यासाठी हेअरस्टाईलची काही झटपट सजेशन्स आम्ही तुम्हाला देणार आहोत.
‘द रिसीडर हेअरस्टाईल’

यामध्ये साईडचे आणि मागचे केस लहान ठेवत डोक्याच्या वरच्या भागातले केस मोठे ठेवले जातात. यामुळे केसांचा थिकनेस जास्त असल्याचा लूक येतो.
‘बझ कट’

डोक्यावरचे केस अगदीच कमी असतील तर या कटचा आॅप्शन आहे. बझ कटमुळे एक रफ लूक मेंटेन करता येतो. यामध्ये संपूर्ण डोक्यावरचे केस झीरो मशीनने बारीक केले जातात. यावेळी स्टायलिस्टला झीरो मशीनचं २ किंवा ३ नंबरचं रेझर वापरायला सांगावं
‘कोंब ओव्हर’

हा काही कट नसून केस विंचरायची एक पध्दत आहे. डोक्यावर ज्या भागात केस कमी आहेत त्या भागावरून बाजूचे कंगव्याच्या साहाय्याने फिरवल्यामुळे थोडा वेगळा लूक येऊ शकतो.
दाढी वाढवा

डोक्यावर केस कमी असले तर दाढी वाढवत त्याबरोबर हेअरस्टाईल कोआॅर्डिनेट करणंही शक्य असतं. सध्या दाढी किंवा स्टबल ठेवण्याचा लूक इन आहे. त्यामुळे दुहेरी फायदा होऊ शकतो. या पध्दतीत दाढीच्या केसांची लांबी आणि डोक्यावरच्या केसांचा लूक कोआॅर्डिनेट करावा लागतो. हे एेकायला कठीण वाटत असलं तरी चांगल्या हेअरड्रेसरकडे जात त्याच्या सजेशनने हा लूक सहज मिळवता येऊ शकतो.
पार्टिंग

आपण रोज भांग पाडतो त्यासारखंच पण हेअरस्टाईल थोडी बदलून कमी होत जाणारी हेअरलाईन लपवता येते.
आपली हेल्थ चांगली ठेवणं हे केसांच्या आरोग्यासाठीही फायदेशीर असतं पण अनेकदा आनुवांशिक कारणांमुळे पुरूषांमध्ये केस कमी होण्याचा त्रास जाणवतो. त्यामुळे आरोग्य सुधारतानाच हे हेअरकट्स वापरले तर व्यक्तिमत्त्व जास्त खुलून दिसेल