Hanuman Jayanti Wishes 2025 in Marathi: श्रीरामाचा सर्वश्रेष्ठ भक्त म्हणजे हनुमान. चैत्र महिन्यातील पौर्णिमा तिथीच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी हनुमानाचा जन्म झाला होता. यंदा १२ एप्रिल रोजी म्हणजेच शनिवारी हनुमान जयंती साजरी केली जाणार आहे. अनेक भक्तगण या दिवशी आनंदात, मोठ्या श्रद्धेत हा दिवस साजरा करतात. यंदा या जन्मोत्सवाला तुम्ही नातेवाईक, प्रियजन आणि मित्र परिवाला भक्तीमय शुभेच्छा पाठवून त्यांचा आनंद अधिक द्विगुणीत करू शकता.
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा संदेश व सुंदर ग्रीटिंग्स WhatsApp, Facebook, Instagram या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर शेअर करून तुम्ही शुभेच्छा देऊ शकता.
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा (Hanuman Jayanti Wishes in Marathi)
भीमरूपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुती |
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना ||
सर्वांना श्री हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

ज्याच्या मनात आहे श्रीराम,
ज्याच्या तनात आहे श्रीराम,
संपूर्ण विश्वात जो आहे बलवान
अशा मारुतीरायास आमचा शत शत प्रणाम…
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

अंजनीच्या सूता, तुला रामाचं वरदान
एकमुखाने बोला, बोला जय जय हनुमान
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
हनुमान जयंती फोटो (Hanuman Jayanti Photo)

जिथे श्रद्धा, तिथे राम |
जिथे निष्ठा, तिथे हनुमान ||
श्री हनुमान जन्मोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा!

जय हनुमान ज्ञान गुणसागर, जय कपिश तिहू लोक उजागर,
रामदूत अतुलित बल धामा
अंजनीपुत्र पवनसुत नामा,
जय श्रीराम, जय हनुमान।
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

हनुमान जयंतीच्या मराठी शुभेच्छा संदेश (Hanuman Jayanti Shubhechha In Marathi)
ज्याने आपली छाती फाडून
आपल्या हृदयातील श्रीराम दाखवले
त्यांना बजरंगी हनुमान म्हटले
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
सूर्याचा घ्यायला गेला घास,
जो वीरांचा आहे खास,
त्याच्या शक्तीपुढे सर्व काही लहान
असा रामभक्त आहे सर्व भक्तांमध्ये महान
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!
भगवान श्री हनुमान आपल्या जीवनात आनंद,
शांती आणि समृद्धी मिळवून देवो,
त्यांची कृपादृष्टी आपल्या परिवारावर कायम राहो
हनुमान जयंतीच्या हार्दिक शभेच्छा!
ज्याला रामाचा आशीर्वाद आहे,
ज्याचा अभिमान गदा आहे,
ज्याची ओळख समस्या सोडवणारा आहे
तो हनुमान आहे
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
हनुमान जयंती मेसेज, स्टेटस (Hanuman Jayanti Quotes, Message, Status)
अंजनीसूत, पवनपुत्र बजरंग बली,
ज्याने फक्त शेपटीने लंका जाळली,
अशा बलशाली हनुमानास कोटी कोटी प्रणाम
हनुमान जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा!
मुखी राम नाम जपी,
योगी बलवान लंकेचा नाश करी,
असा सर्व शक्तिमान,
आकाशापरी मोठा,
कधी मुंगीहूनी लहान,
ह्रदयी वसती राम असा भक्त हनुमान
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!