Happy Children’s Day Wishes: बालदिन म्हटलं की आपसूक डोळ्यासमोर आपल्या लहानपणी आठवणी तरंगळू लागतात. या दिवशी प्रत्येकजण आप-आपल्या लहानपणीचे किस्से आठवत असतो. कुणी बालमित्रांसोबत केलेली मस्ती, झाडावर चढून चोरून आंबे तोडलेले असतात, कुणी बालमित्रांसोबत सूरपारंब्या, क्रिकेटसारखे खेळलेले खेळ, नदीवर खेकडे पकडलेले असतात, अशा एक ना अनेक आठवणी तुमच्याही मनात जाग्या झाल्या असतील. हो ना? सध्या राज्यात करोना व्हायरस महामारीचे सावट कायम आहे. राज्यातल्या तणावाच्या वातावरणामुळे दरवर्षीप्रमाणे बालमित्रांसोबत गेटटुगेदर करून हा दिवस साजरा देखील करता येणार नाही. म्हणून काय झालं? सोशल मीडियाची मदत घेऊन तुम्ही हा दिवस स्पेशल पद्धतीने साजरा करू शकता. इंस्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून मित्र, नातेवाईकांना, तुमच्या बालमित्रांना शुभेच्छा देऊ शकता. म्हणूनच तुमच्यासाठी घेऊन आलोय बालदिनाच्या शुभेच्छा संदेश, बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश, बालदिनाच्या शुभेच्छा स्टेटस….नक्की शेअर करा.

Vivah muhurat 2025 Marriage Dates in 2025 Hindu Panchang
Vivah Muhurat 2025 : नवीन वर्ष २०२५ मध्ये विवाहासाठी किती शुभ मुहूर्त, पाहा जानेवारी ते डिसेंबरपर्यंतच्या तारखांची यादी
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Shani gochar in kumbh shash rajyog 2024
२०२५ पर्यंत ‘या’ राशींचे लोक होतील मालामाल; शनीच्या शश राजयोगामुळे कमावतील चिक्कार पैसा अन् जगतील राजासारखे जीवन
Sun Rashi Parivartan 2024
सूर्य करणार मालामाल; वृश्चिक राशीतील राशी परिवर्तनाने ‘या’ तीन राशी कमावणार पैसा, प्रेम आणि प्रतिष्ठा
After 30 years Saturn-Venus alliance will happen
३० वर्षांनतर शनी-शुक्राची होणार युती! २०२५ मध्ये ‘या’ राशींची होणार चांदी, मिळणार अपार पैसा
Happy Birthday Raha alia ranbir daughter
२ वर्षांची झाली राहा कपूर! वाढदिवशी आजीने शेअर केला लाडक्या नातीचा गोंडस फोटो; आत्याची सुद्धा खास पोस्ट
Aries To Pisces 6th November Horoscope
६ नोव्हेंबर पंचांग: चारचौघात कौतुक, अचानक धनलाभ, जन्मराशीनुसार कोणाची मनोकामना आज पूर्ण होणार; वाचा तुमचे राशिभविष्य
Dev Uthani Ekadashi 2024
Dev Uthani Ekadashi 2024 Date: का साजरी केली जाते देवउठणी एकादशी? जाणून घ्या तारीख, मुहूर्त आणि महत्त्व…

Happy Children’s Day Wishes In Marathi | बालदिनाच्या शुभेच्छा

चंद्राला गवसणी घालण्याची इच्छा,
रंगीबेरंगी फुलपाखराची होती आवड,
एकत्र जगण्याची मुभा देणारे,
बालपण आज पुन्हा जगूया,
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

वयाने मोठ्या पण मनाने लहान
अशा प्रत्येकाला बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा !

कोनाड्यात पडलेल्या
जुन्या आठवणींना
पुन्हा एकदा डोळ्यासमोर आणायचं आहे,
आज आपलं हरवलेलं बालपण,
पुन्हा नव्याने जगायचं आहे,
बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा !

तोडून सारे मोठेपणाचे रूल
झालात तरी ८० वर्षाचे
तरी जपा स्वतःतील मूल,
बालदिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा !

खऱ्याखुऱ्या लहानग्यांसोबत,
तुम्हा आम्हा प्रत्येकातल्या,
लहान बाळासा सुद्धा
बालदिनाच्या खुप खुप शुभेच्छा !

बालपणी होते स्वछंद खेळाचे क्षण..
बालपणी होते सर्व सुखाचे धन..!!
बालपणीच्या आठवणीत हरपते मन..
येणार नाहीत कधीच ते सोनेरी क्षण…
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!

लहान पणी सगळेच विचारायचे
तुला काय व्हायचंय?
पण उत्तर कधी सापडलेच नाही..
आज जर कोणी विचारले ना
तर उत्तर एकच असेल,
मला पुन्हा लहान व्हायचंय…
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

पाखरांची चपळता,
प्रातःकाळची सोम्य उज्ज्वलता
निसर्गाचा खळखळाट म्हणजे मुले….
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…

आपण आपल्या इच्छेनुसार,
आपल्या मुलांना घडवू शकत नाही,
आपण त्यांना त्याच रूपात स्वीकारूया, प्रेम देऊया
ज्या रुपात देवाने त्यांना आपल्यास दिले आहेत.
हॅप्पी बाल दिन !!

कागदाची नाव होती,
पाण्याचा किनारा होता,
मित्रांचा सहारा होता,
खेळण्याची मस्ती होती,
मन हे वेडे होते,
कल्पनेच्या दुनियेत जगत होतो,
कुठे आलो या समजूतदारीच्या दुनियेत,
या पेक्षा ते भोळे बालपणच सुंदर होते…
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

काही वेळा शाळा बुडवणं,
मित्रांसोबत वेळ घालवणं चांगल असतं.
कारण आता मागे वळून पाहिल्यावर कळतं की,
शाळेतले मार्क नाहीतर अशा आठवणी जास्त हसवतात.
या दिवशी प्रत्येक बापाला आपल्या मुलाची आठवण येते
म्हणूनच मला तुझी आली. Happy Baldiwas

जगातील सर्वात चांगला वेळ,
जगातील सर्वात चांगला दिवस,
जगातील सर्वात सुंदर क्षण
फक्त बालपणीच मिळतात.
Happy Children’s Day.

जगातील अशा काही गोष्टी आहेत
ज्या विकत घेता येत नाही
त्यातील एक गोष्ट म्हणजे बालपण
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…

हॅलो टीचर, आज तुम्ही काहीच म्हणू नका,
पूर्ण वर्ष आम्ही तुमचं ऐकलं,
आज तुम्ही आमचं ऐका,
हॅपी चिल्ड्रन्स डे !

आणखी वाचा : Children’s Day 2021 : ‘या’ राशीची मुलं असतात हजारात एक, त्यांना सांभाळणं पालकांसाठी असतो मोठा टास्क, का जाणून घ्या…

Happy Children’s Day Quotes In Marathi | बालदिनाच्या शुभेच्छा कोट्स

मनात बालपण जपणाऱ्या बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

प्रत्येकवेळी खेळाची होती साथ, आनंदाची होती उधळण, आईबाबांची होती सावली आणि मैत्रीचा होता काळ.”

दिवस आनंदाचा निरागसतेचा उत्साहाचा त्यांच्या कौतुकाचा…बालदिनाच्या शुभेच्छा…

कालपण, आजपण आणि उद्यापण … जे निरंतर आपल्यामध्ये जिवंत असतं ते बालपण !!! बालदिनाच्या सर्व बालमित्र व बालगोपाळांना शुभेच्छा…

“चला आपल्या जगातील या चिमुकल्यांच्या आनंदासाठी एक “सुरक्षित जग बनवूया”, बालदिनाच्या शुभेच्छा ….

मनात बालपण जपणाऱ्या बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

“आईच्या गोष्टी होत्या, परीकथा होत्या, पावसात कागदाची होडी होती आणि प्रत्येक ऋतू छान होता.”

तुम्ही मुलांकडूनही काही गोष्टी शिकता ज्यापैकी एक म्हणजे तुमच्यात किती धीर आहे.”

“प्रत्येक मुलं एक कलाकार आहे, समस्या ही आहे की, एकदा मोठं झाल्यावर आपण आपल्यातला तो कलाकार विसरतो.”

लहानपणीचा तो दिवस मी खूप आठवतो, बालपण असंच भु्र्रकन निघून जातं. जोपर्यंत आपल्याला कळतं तोपर्यंत ते भूतकाळ बनतं.

मुलं तिथे जाणं पसंत करतात जिथे उत्साह असतो आणि तिथेच राहतात जिथे प्रेम असतं.

मुलांमध्ये दिसतो देव, चला देवाची ही कलाकृती साजरी करूया Happy Children’s Day.

आणखी वाचा : Children’s Day: १४ नोव्हेंबर हा दिवस बालदिन म्हणून का साजरा करतात? जाणून घ्या इतिहास…

Happy Children’s Day Status In Marathi | बालदिनाच्या स्टेटस

सकाळ नाही, संध्याकाळ नाही
चोवीस तास मस्ती आणि काही क्षणांचा अभ्यास होता
रम्य असा लहानपणीचा काळ होता
बालदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आजीच्या त्या चिऊकाऊच्या गोष्टी,
तर आजोबांची स्वातंत्र्यलढ्यापर्यंतची ती दूरदृष्टी
वात्सल्य, धाडसीपणा, सर्वकाही त्यात असतं,
खरंच ते बालपण किती सुंदर असतं…

आईची ती प्रेमळ माया,
बाबांची ती वटवृक्षाची छाया,
प्रेम,माया सर्व काही त्यात असतं,
खरंच हे बालपण किती सुंदर असतं…

लहानपण देगा देवा,
मुंगी साखरेचा रवा,
ऐरावत रत्न थोर,
त्यासी अंकुशाचा मार,
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

भावंडाची ती रोजची भांडणं,
आईच्या हातचे ते धम्मक लाडू मिळवणे
मस्करी, कुस्करी सर्व काही त्यात आहे,
खरंचे हे बालपण किती सुंदर आहे…

मुलं ही जणून देवाची पृथ्वीवरील प्रतिनिधी आहेत
त्यांना प्रेमाने घडवा आणि प्रेमाने वागवा
बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा

प्रत्येक गोष्ट विकत घेता येते पण बालपण नाही. बालदिवस आनंदाने साजरा करा आणि मुलांना भरपूर प्रेम द्या. हॅपी चिल्ड्रन्स डे.

मुलांना शिकवा श्रीमंत होण्यासाठी नाहीतर आनंदी राहण्यासाठी. ज्यामुळे त्यांना कळेल वस्तूचं मूल्य त्यांची किंमत नाही. बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!