Christmas History and Significance : ख्रिसमस हा जगभरातील सर्वांत लोकप्रिय सणांपैकी एक आहे. हा सण दरवर्षी २५ डिसेंबर रोजी येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. त्यानिमित्ताने ख्रिश्चन समुदायातील लोक आपली घरं सुंदर लायटिंग, मेणबत्त्या व ख्रिसमसच्या झाडांनी सजवतात, चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करतात. तसेच नातेवाईक आणि लहान मुलांना केक, स्वीट्स, गिफ्ट्स भेट म्हणून देतात. पण, ख्रिसमस हा सण २५ डिसेंबरलाच का साजरा केला जातो, याविषयी आपण जाणून घेऊ…

ख्रिसमसचा इतिहास आणि त्यासंबंधीत काही समजुती आणि प्रथा आहेत. ख्रिश्चन धर्माच्या मान्यतेनुसार, प्रभू येशू म्हणजे येशू ख्रिस्ताचा जन्म बेथलेहममध्ये मेरी आणि जोसेफ यांच्या पोटी झाला. पण, बायबलमध्ये येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या अचूक तारखेचा उल्लेख नाही. त्यामुळे ख्रिश्चन समुदायातील लोकांनी ख्रिश्चन धर्माच्या सुरुवातीच्या काळात वेगवेगळ्या तारखांना ख्रिसमस डे साजरा केला. जसे की, ६ जानेवारी व २५ मार्च. पण, त्यानंतर २५ डिसेंबरलाच ख्रिसमस डे साजरा करण्यामागे काही कारणं सांगितली जातात. त्यातीलच तीन कारणांविषयीची माहिती आपण जाणून घेऊ…

२५ डिसेंबरलाच ख्रिसमस डे साजरा करण्यामागे सांगितली जाणारी तीन कारणे

१) मदर मेरीचा निर्णय

ख्रिसमस हा शब्द क्राइस्ट मास यापासून आला आहे. इसवी सन ३३६ मध्ये पहिला ख्रिश्चन रोमन सम्राट कॉन्स्टंटाईन याच्या कारकिर्दीत येशूचा जन्म २५ डिसेंबर रोजी साजरा करण्याची प्रथा सुरू झाली, असे मानले जाते. त्यानंतर पोप ज्युलियस यांनी २५ डिसेंबर रोजी येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस अधिकृतपणे साजरा करण्याचा निर्णय घेतला, असे मानले जाते.

एका मान्यतेनुसार, प्रभू येशूची आई मेरी हिला मार्च महिन्यात ती गर्भवती होणार असल्याची जाणीव झाली होती. या तारखेपासून बरोबर नऊ महिन्यांनी २५ डिसेंबर रोजी येशूचा जन्म झाला.

२) मूर्तिपूजक लोकांशी संबंधित

इतिहासानुसार, चर्चने २५ डिसेंबर ही तारीख म्हणून निवडली. कारण- ती स्थानिक मूर्तिपूजक लोकांशी संबंधित होती. चर्चचा असा विश्वास होता की, ख्रिसमस सण तिथल्या स्थानिक मूर्तिपूजक लोकांशी जोडला गेला, तर अधिक लोक तो स्वीकारतील. परंतु, याबाबत १२ व्या शतकापर्यंत कोणताही सिद्धान्त मांडला गेला नाही. पण याचा अर्थ असा नाही की, मूर्तिपूजक संबंधातील ही बाब असत्य आहे; परंतु ख्रिसमसच्या सणासाठी या तारखेची निवड करण्याचे कारण म्हणून ती सांगितली जात नाही.

३) क्रूसिफिक्शन कनेक्शन

२५ डिसेंबर रोजी ख्रिसमस साजरा करण्याचे आणखी एक कारण येशूच्या निधनाशी संबंधित आहे. फसह तिथीच्या आधारे, टर्टुलियनने निष्कर्ष काढला की, येशूचे २५ मार्च रोजी निधन झाले. २५ मार्चपासून २५ डिसेंबरपर्यंत नऊ महिने होत असल्याने २५ डिसेंबर हा येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणून निवडला गेला.

सुरुवातीच्या ख्रिश्चन परंपरेत असे मानले जात होते की, येशूच्या मृत्यूचा संदर्भ त्याच्या जन्माच्या घोषणेशीच जोडलेला होता. देवदूत गॅब्रियलने मेरीला सांगितले की, तिच्यावर देवाची कृपा आहे. ती गर्भवती होईल आणि मसीहाला म्हणजे देवाच्या पुत्राला जन्म देईल. या कारणास्तव नवजात येशूच्या जन्मामागच्या पार्श्वभूमीच्या माहितीत, त्यामध्ये वधस्तंभाची किंवा क्रॉस असलेल्या चित्रांच्या घोषणांचे चित्रण करणाऱ्या कलाकृती वारंवार आढळतात. जगामध्ये घडलेल्या पापांचे प्रायश्चित्त म्हणून पुढे बलिदान देण्यासाठी येशू या देवपुत्राचा जन्म झाला.

Christmas 2024 Wishes: ख्रिसमसच्या निमित्ताने सर्वांना खास मराठीतून द्या शुभेच्छा; एकापेक्षा एक हटके Messages, Quotes, SMS, Status Images

ख्रिसमस २०२४ : सणाचे महत्त्व

ख्रिश्चन धर्मात ख्रिसमसला धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा केला जातो, जो मानवतेला वाचवण्यासाठी पृथ्वीवर आला, असे मानले जाते. येशू ख्रिस्ताच्या शिकवणींनी त्याग, प्रेम व करुणा यांवर भर दिला. ख्रिस्ती मानतात की, येशूच्या जन्माने जग बदलले, लोभ आणि वाईटाच्या जागी आनंद आणि आशा आली.

ख्रिसमस हा येशूने केलेल्या बलिदानाचा स्मरण करण्याचा एक काळ आहे. त्यामुळे या प्रभू येशूच्या स्मरणार्थ कॅरोल गायन, धार्मिक सेवा व प्रार्थना केली जाते.

Story img Loader