Happy Christmas 2024 Wishes Messages SMS, Quotes : प्रभु येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणजे ख्रिसमस (नाताळ) हा सण ख्रिश्चन बांधवांचा महत्त्वाचा सण आहे. केवळ भारतातच नाही, तर जगभरात २५ डिसेंबर रोजी ख्रिसमस मोठ्या उत्साहात, आनंदात व जल्लोषात साजरा केला जातो. सरत्या वर्षाचा शेवट आनंदी आणि गोड करणाऱ्या या सणाचा आनंद ख्रिश्चन धर्मीयांबरोबर सर्वच धर्मांचे लोक घेत असतात. या सणानिमित्त चर्च आणि इतर ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या दिवशी लोकांना त्यांच्या प्रियजनांबरोबर वेळ घालवायला, भेटवस्तू द्यायला आणि एकमेकांना शुभेच्छा द्यायला आवडते.
यंदा तुम्ही तुमच्या प्रियजनांना ख्रिसमसनिमित्त खास मराठीत शुभेच्छा देत या सणाचा आनंद घेऊ शकता. तुम्ही WhatsApp, Instagram, Facebook च्या माध्यमातून या शुभेच्छा पाठवू शकता. तसेच शुभेच्छांच्या फ्री इमेजेस तुमच्या स्टेट्सवर ठेवू शकता.
ख्रिसमसच्या शुभेच्छा | Merry Christmas Wishes In Marathi For Friends
१) प्रेम, आनंद व समृद्धीने भरलेल्या आनंददायी ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा! मेरी ख्रिसमस
२) मदर मेरीच्या पोटी जन्मला येशू बाळ,
आनंद दिला जगाला, साजरा होतोय नाताळ
ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा!
३) आला सांता आला घेऊन शुभेच्छा हजार
लहान मुलांसाठी गिफ्ट्स आणि प्रेमाची बहार
तुम्हालाही आनंदाचा जावो हा ख्रिसमसचा सण वारंवार.
४) माझ्या मित्रा तुला ख्रिसमसच्या खूप शुभेच्छा आणि हॅपी न्यू ईयर!
ख्रिसमससाठी हटके शुभेच्छा Merry Christmas Wishes In Marathi
५) तुमच्यासाठी सांता आनंद, समृद्धी आणि यश घेऊन येवो. तुमच्या मनातल्या सर्व इच्छा तो पूर्ण करो. नाताळच्या हार्दिक शुभेच्छा! मेरी ख्रिसमस!
६) आयुष्यात तुझ्या ख्रिसमसची रात्र
सुख, समृद्धी घेऊन येवो
आनंद नेहमीच द्विगुणीत होवो,
ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा!
७) तुझ्यासारख्या चांगल्या मित्राची आठवण ख्रिसमसला हमखास येते. आपण एकत्र घालवलेला काळ आठवतो आणि पुन्हा एकदा लहान व्हावसं वाटतं. माझ्या मित्रा, नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!
८) ख्रिसमस म्हणजे प्रेम, ख्रिसमस म्हणजे आनंद, ख्रिसमस हा उत्साह आहे, ख्रिसमस हा नवीन उत्साह आहे.
तुम्हा सर्वांना ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा.
Christmas Wishes 2024 WhatsApp Status, Messages In Maratthi
९) मी कार्ड पाठवत नाही
मी फुलं पाठवत नाही,
फक्त मनापासून मी तुम्हाला शुभेच्छा देतो,
ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या
मी शुभेच्छा पाठवत आहे.
Happy Christmas 2024
१०) प्रत्येकाच्या हृदयात प्रत्येकासाठी प्रेम,
येणारा प्रत्येक दिवस आनंदाचा सण घेऊन येईल,
या आशेने सर्व दु:ख विसरू या.
आपण सर्वांनी नाताळचे स्वागत करू या.