Dhantrayodashi 2024 Wishes in Marathi:  देशभरात सध्या दिवाळी सणाचा उत्साह पाहायला मिळतोय. यंदा धनत्रयोदशीचा सण २९ ऑक्टोबरला साजरा केला जात आहे. कार्तिक महिन्यातील कार्तिक कृष्ण पक्षातील त्रयोदशीला धनत्रयोदशी साजरी केली जाते. या दिवशी सर्वजण आपल्या घरी धन्वंतरी आणि लक्ष्मी मातेची पूजा करतात.धनत्रोदशी हा सण व्यापारी वर्गासाठी विशेष असतो. या दिवशी सर्व व्यापार वर्ग दुकानाची पूजा करतात.संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक असणारा हा सण धनतेरस म्हणूनही ओळखला जातो. या दिवशी सोने, चांदी, भांडी इत्यादी खरेदीचे विशेष महत्त्व आहे. या धनत्रयोदशीच्या शुभ दिनी तुम्ही सर्वांना आरोगयासाठी, धनसंपदेसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या जातात. तुम्ही धनत्रयोदशीनिमित्त तुमच्या प्रियजणांना सोशल मीडियावरुन खास मराठीत शुभेच्छा संदेश पाठवू शकता, यासाठी शुभेच्छा संदेशाची एक यादी तुमच्यासाठी तयार केली आहे.

धनत्रयोदशीनिमित्त खास मराठमोळ्या शुभेच्छा | Happy Dhantrayodashi Wishes In Marathi

१) धन्वंतरी देवता आपणावर सदैव प्रसन्न राहो
व आपणास सुखी व आरोग्यदायी जीवन लाभो
ही ईश्वर चरणी प्रार्थना,
धनत्रयोदच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

Happy Diwali Wishes 2024 Wishes in Marathi
Diwali Wishes 2024 : प्रियजनांना द्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक हटके मराठी मेसेज
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Happy Vasubaras 2024 Wishes in Marathi| Happy Govatsa Dwadashi 2024 wishes in marathi
Vasubaras 2024 Wishes: ‘दिन दिन दिवाळी गाई-म्हशी ओवाळी’ वसुबारसनिमित्त प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook वर खास मराठीतून पाठवा शुभेच्छा; पाहा लिस्ट
Happy Narak Chaturdashi 2024 Wishes in Marathi
Narak Chaturdashi 2024 : नरक चतुर्दशीनिमित्त WhatsApp स्टेटस, फेसबुकला शेअर करण्यासह तुमच्या प्रियजनांना पाठवा मराठी शुभेच्छा!
Diwali Padwa bali pratipada 2024 Wishes In Marathi hd photo
Diwali Padwa 2024 निमित्त नातेवाईक, मित्रमंडळींना पाठवा ‘या’ खास मराठी शुभेच्छा; हटके HD फोटो, Messages, Whatsapp Status पाठवून करा खूश
Vasu Baras 2024 Date Shubha Muhurat! What is meaning of Vasu Baras
Vasu Baras 2024 Date: दिवाळीच्या आधी वसुबारस का साजरी केली जाते? जाणून घ्या वसुबारस शब्दाचा अर्थ अन् पूजेचा शुभ मुहूर्त
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
How To take care of health in Diwali if you have Diabetice problem to control your blood sugar levels
Diwali Blood Sugar Tips: यंदाच्या दिवाळीत गोड खाताय? रक्तातील साखर वाढू नये म्हणून घ्या ‘ही’ काळजी

२) धनत्रयोदशीचा हा दिन
धन्वंतरीच्या भक्तीत व्हा लीन
लक्ष्मी सदैव नांदो तुमच्या घरी
तुमची मनोकामना होवो पूरी
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!

३) लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघो ही निशा घेऊनी येवो नवी उमेद नवी आशा,
सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा धनतेरसच्या हार्दिक शुभेच्छा…!

४) दिवाळी आली सोनपावली, उधळण झाली सौख्याची,
धनधान्यांच्या भरल्या राशी घरी नांदू दे सुख समृद्धी…
धनत्रयोदशी हार्दिक शुभेच्छा…!

हेही वाचा – Dhantrayodashi 2024 : धनत्रयोदशीला झाडू खरेदी करण्यामागे नेमकी काय परंपरा? या दिवशी झाडूला इतके महत्त्व का? जाणून घ्या विशेष माहिती

५) दिव्यांची रोशणाई, फराळाचा गोडवा,
असा हा धनत्रयोदशीचा सोहळा…
धनत्रयोदशीच्या मनपूर्वक शुभेच्छा

६) धनत्रयोदशीला सुख-समृद्धीचा संगम होवो आणि तुमचं वर्ष भरभराटीचे जावो,
धनत्रयोदशीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा!

७) धन धान्याची व्हावी घरीदारी रास राहो
सदैव लक्ष्मीचा तुमच्या घरी वास
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!

८) जीवनात आनंद नांदो
लक्ष्मी देवीच्या कृपेने
धनत्रयोदशीला पैशाचा खजिना भरो
धनत्रयोदशीच्या शुभेच्छा!

९) संपत्तीचा वर्षाव होवो,
आनंदाची सुरुवात होवो,
जीवनातील प्रत्येक सुख प्राप्त होवो,
लक्ष्मी देवी तुमच्या घरी वास करो,
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!

१०) सर्वांसाठी नवीन आनंद घेऊन आला. लक्ष्मी-गणेश विराजेतुमच्या घरावर सदैव सुखाची सावली राहू दे .

तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा, ही दिवाळी तुम्हाला आनंदाची आणि भरभराटीची जावो.

Story img Loader