Diwali Padwa, Bali Pratipada 2024 Wishes In Marathi:  दिवाळीनिमित्त देशभरात मोठ्या उत्साहाचे, चैतन्याचे वातावरण पाहायला मिळत आहे. फटाक्यांची आतषबाजी, फराळाचा गोडवा अन् नातेवाईक, मित्रपरिवारांच्या भेटीमुळे हा सण आयुष्यात खरंच नवा आनंद घेऊन येतो. दिवाळी सण नरक चतुर्दशीच्या अभ्यंगस्नापासून सुरू होतो. यानंतर लक्ष्मी पूजनाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी दिवाळी पाडवा (Diwali Padwa 2024) साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणून हा सण ओळखला जातो. य़ा दिवशी सोने खरेदी, सुवासिनींकडून पतीला औक्षण, व्यापाऱ्यांसाठी वर्षाचा प्रारंभ अशा अनेक कारणांसाठी या दिवसाचे विशेष महत्त्व आहे.

या सणाला बलिप्रतिपदा असेही म्हटले जाते. यंदा २ नोव्हेंबर (शनिवारी) हा सण साजरा केला जाणार आहे. दिवाळी पाडव्यानिमित्त सोशल मीडियाद्वारे लोक एकमेकांना दिवाळी पाडव्याच्या खास शुभेच्छा देतात. तुम्हीदेखील दिवाळी पाडव्यानिमित्त खास मराठीतून WhatsApp Status, SMS, HD Greetings, Quotes द्वारा आपल्या मित्र-परिवारास हटके शुभेच्छा पाठवू शकता.

Happy Diwali Wishes 2024 Wishes in Marathi
Diwali Wishes 2024 : प्रियजनांना द्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक हटके मराठी मेसेज
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Happy Narak Chaturdashi 2024 Wishes in Marathi
Narak Chaturdashi 2024 : नरक चतुर्दशीनिमित्त WhatsApp स्टेटस, फेसबुकला शेअर करण्यासह तुमच्या प्रियजनांना पाठवा मराठी शुभेच्छा!
Happy Vasubaras 2024 Wishes in Marathi| Happy Govatsa Dwadashi 2024 wishes in marathi
Vasubaras 2024 Wishes: ‘दिन दिन दिवाळी गाई-म्हशी ओवाळी’ वसुबारसनिमित्त प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook वर खास मराठीतून पाठवा शुभेच्छा; पाहा लिस्ट
Diwali Padwa subha muhurta
Diwali Padwa 2024 : पाडव्याच्या दिवशी पतीचे औक्षण का केले जाते? जाणून घ्या पाडव्याचा शुभ मूहूर्त आणि पौराणिक कथा
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Happy Dhantrayodashi 2024 wishes in marathi | dhanteras 2024 Wishes
Dhantrayodashi 2024 : धनत्रयोदशीनिमित्त नातेवाईक प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook वर खास मराठीतून पाठवा शुभेच्छा; ही घ्या यादी

दिवाळी पाडवा व बालिप्रतिपदेच्या शुभेच्छा | Diwali Padwa Balipratipada 2024 Wishes In Marathi

१) आपुलकीच्या नात्यात मिसळू फराळाचा गोडवा…
सुख, समृद्धी घेऊन येतो दिवाळीचा पाडवा…
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Diwali Padwa BaliPratipada Wishes In English 2023
दिवाळी पाडवा आणि बलिप्रतिपदेच्या हार्दिक शुभेच्छा

२) सुमुहूर्तावरी पाडव्याच्या एकात्मतेचे लेणे लेऊया,
भिन्न विभिन्न असलो तरी सर्व मनाने एक होऊया.
दिवाळी पाडवा व बलिप्रतिपदेच्या हार्दिक शुभेच्छा!

३) धनाचा होवो वर्षाव, सर्व ठिकाणी होवो तुमचं नाव
मिळो नेहमी समृद्धी अशी, होवो खास तुमची आमची दिवाळी
दिवाळी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा! (Happy Diwali Padwa, Bali Pratipada  Wishes In Marathi)

diwali padwa balipratipada wishes free HD Images
दिवाळी पाडवा आणि बलिप्रतिपदेच्या खूप शुभेच्छा

४) पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव गोडवा यावा!
सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो!
थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत राहो!
दिवाळी पाडवा व बलिप्रतिपदेच्या हार्दिक शुभेच्छा!

Laxmi Pujan Horoscope : लक्ष्मी कृपेने नोव्हेंबरचा पहिला दिवस मेष ते मीन राशीला कसा जाईल; कुणावर होणार धन अन् सुखाचा वर्षाव? वाचा तुमचे राशीभविष्य

५) नवा सुगंध नवा ध्यास, नव्या रांगोळीची नवी आरास,
स्वप्नातले रंग नवे, आकाशातले असंख्य दिवे,
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

दिवाळी पाडवा कोट्स 2024 | Diwali Padwa 2024 Quotes In Marathi

६) गरजवंतांच्या घरी येवो समृद्धी,
हीच देवाचरणी प्रार्थना
दिवाळी पाडव्याचा खूप खूप शुभेच्छा!

diwali padwa balipratipada wishes marathi free HD Images
दिवाळी पाडवा आणि बलिप्रतिपदेच्या खूप शुभेच्छा

७) आज बलिप्रतिपदा, दिवाळीचा पाडवा. राहो सदा नात्यात गोडवा.

diwali padwa 2024 free HD Images
दिवाळी पाडवा आणि बलिप्रतिपदेच्या खूप शुभेच्छा

८) सगळा आनंद, सगळे सौख्य,
सगळ्या स्वप्नांची पूर्तता. सगळे ऐश्वर्य आपणास लाभू दे…
दिवाळी पाडव्याच्या खूप शुभेच्छा!

९) तेजोमय दीप तेवावा आज तुमच्या अंगणी,
तेजोमय प्रकाश पडावा सदैव तुमच्या जीवनी – बलिप्रतिपदा अन् दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!

Happy Diwali Padwa BaliPratipada Wishes In English 2023
दिवाळी पाडवा आणि बलिप्रतिपदेच्या हार्दिक शुभेच्छा

१०) ईडा पीडा टळो, बळीचं राज्य येवो..
सर्वांना बलिप्रतिपदा, दीपावली पाडव्याच्या व बलिप्रतिपदेच्या खूप-खूप शुभेच्छा!

Story img Loader