नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या उत्सवानंतर ज्या सणाची आतुरता असते तो सण म्हणजे दसरा ! नवरात्रीचे नऊ दिवस देवीची मनोभावे सेवा केल्यानंतर या दिवशी देवीला निरोप देण्यात येतो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणूनही या दिवसाला एक वेगळे महत्त्व असते. प्रभू श्रीरामाने लंका नरेश रावणाचा पराभव करून त्याच्या कैदेतून सितामाईची सुटका केली होती. असत्यावर वर सत्याचा विजय म्हणून हा सण साजरा करतात. दसऱ्याच्या निमित्ताने तुमच्या नातेवाईकांना, मित्र परिवाराला व्हॉट्सअॅप आणि फेसबूकवरून शुभेच्छा देण्यासाठी काही खास दसरा शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी…

Happy Dussehra Wishes In Marathi | दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा संदेश

उत्सव हा विजयाचा
दिवस सोनं लुटण्याचा
जुने हेवे दावे विसरून सारे
दिवस फक्त आनंद लुटण्याचा
दसरा व विजयादशमी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

lord hanuman favourite zodiac signs these horoscope will shine in new year 2025
२०२५मध्ये बजरंगबलीच्या कृपेने या राशींचे नशीब पलटणार! मिळेल पैसा, मान सन्मान, चांगला पगार अन् पदोन्नती, विवाह योग निर्माण होणार
14 December Rashi bhavishya In Marathi
१४ डिसेंबर पंचांग: आज १२ पैकी ‘या’ राशींवर…
7 December astrological predictions for zodiac signs
७ डिसेंबर पंचांग: धनिष्ठा नक्षत्रात १२ राशींवर होणार सुखाचा वर्षाव; पद, पैसा, प्रतिष्ठेत होईल वाढ, तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय खास?
shukra shani Yuti 2024 in kumbha rashi horoscope
shukra-shani Yuti : २०२५ मध्ये ‘या’ तीन राशींवर धन-सुखाची बरसात; शुक्र-शनी युतीने प्रेमात यश अन् नोकरी, व्यवसायातून मिळेल बक्कळ पैसा
Kark Rashifal 2025
Kark Rashifal 2025: कर्क राशीसाठी कसे असेल नववर्ष २०२५? कोणत्या ग्रहाचे गोचर ठरणार लाभदायी, कोणाची होईल कृपा?
Shukra Nakshatra Gochar 2024
११ डिसेंबरपासून ‘या’ राशीच्या लोकांची होईल चांदी चांदी! धनाचा दाता शुक्र करणार श्रवण नक्षत्रात प्रवेश, यशाबरोबर कमावणार पैसाच पैसा
Mahaparinirvan Din 2024 Wishes Quotes in Marathi
Mahaparinirvan Din 2024 Wishes : महापरिनिर्वाण दिनानिमित्त HD Images, WhatsApp Status, Messages द्वारे करा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन!
mithun
Mithun Rashifal 2025: नववर्षात मिथुन राशीच्या लोकांचे नशीब चमकणार! शनीदेवाची होणार कृपा

आपट्याची पाने, झेंडुची फुले,
घेवूनी आली विजयादशमी,
दसऱ्याच्या आज शुभ दिनी,
सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी…
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला
दसऱ्याच्या मनापासून शुभेच्छा★★★★★★ ????

यशाच्या दारावर
माणुसकीचे तोरण बांधुया
सुखाचं सोनं वाटून
सोन्यासारखी माणूसकी जपूया
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.

कृषी संस्कृतीच्या उत्सवाचे प्रतिक असणारा दसरा अर्थात विजयादशमी आपण साजरी करत आहोत. यानिमित्ताने दुःख, नकारात्मकता यांचे सीमोल्लंघन होऊन आनंद व सकारात्मकता सर्वांना लाभो ही सदिच्छा.
सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!

वाईटावर चांगल्याची मात
महत्त्व या दिनाचे खास असे
जळोनिया त्या द्वेष-मत्सराच्या त्या रावणा,
मनोमनी प्रेमच प्रेम वसे
विजयादशमी आणि दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा!!!

आकार,
मनाचे बंध त्यांना प्रेमाची झंकार,
आनंदाच्या क्षणांना सर्वांचा रुकार,
“विजयादशमी”च्या निमित्ताने करावा शुभेच्छांचा स्वीकार.
!!!!सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!

मराठी अस्मितेची मराठी शान
मराठी परंपरेचा मराठी मान
आज सोन्यासारखा दिवस घेऊन येईल,
आयुष्यात तुमच्या सुख, समृद्धी आणि समाधान”
?? शुभ दसरा ??
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा….
??????

संस्कृतीचा ठेवूनिया मान
वाटले सोनियाचे पान
स्वीकारताना ठेवा चेहरा हसरा
तुम्हा सर्वांना शुभ दसरा
विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा

ठेवुनी चेहरा हसरा, दुख सगळे विसरा
सोनियाचा दिन आपुला, तो विजयादशमी दसरा
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा

रावणाचा वध करुनी राम राज्याने दिला आसरा
संपवूनी रावण भ्रष्टाचाराचा, आनंदाने करू दसरा साजरा
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा

झेंडूची फुले, आंब्याची पाने घरोघरी तोरणे सजली
रंगबेरंगी रांगोळी सजली
नवरात्रीच्या नऊ दिवसाचा पूर्ण झाला प्रवास
आला दसऱ्याचा दिवस खास
तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा

झाली असेल चूक तरी
या निमिनत्ताने आता ती विसरा
वाटून प्रेम एकमेकांस
साजरा करु यंदाचा हा दसरा! दसरा शुभेच्छा.

वाईटाचा होतो विनाश
रावणाप्रमाणेच होईल तुमच्या दुःखाचाही नाश
आला आहे दसऱ्याचा सण
दसरा शुभेच्छा तुम्हाला आणि कुटुंबाला

झेंडूची तोरण आज लावा दारी
सुखाचे किरण येऊद्या घरी
पूर्ण होऊद्या तुमच्या सर्व इच्छा
विजयादशमीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!

Happy Dussehra Messages In Marathi | हॅपी दसरा शुभेच्छा संदेश मराठी

परक्यांना ही आपलसं करतील असे गोड शब्द असतात,
शब्दांनाही कोडं पडावं अशी गोडं माणसं असतात
किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात.
सोन्यासारखे तर तुम्ही सर्व आहातच
सदैव असेच राहा
तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा!

हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की,
शेवटी चांगुलपणाचा विजय होतो आणि वाईट गोष्टींचा विजय होतो,
दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा!

आपली चिंता रावणाच्या पुतळ्यासह जळून जावो,
आपण नेहमी आनंदी आणि समाधानी राहो
हीच सदिच्छा!
दसऱ्याच्या शुभेच्छा !

तुमच्या मार्गावरील सर्व अडथळे व त्रास
दसऱ्याच्या दिवशी नाहीसे होवोत,
याच दसऱ्याच्या निमित्ताने शुभेच्छा!

वाईटावर चांगल्याने विजय मिळवण्याची वेळी आलीय
याच उत्साहाने आयुष्यात पुढे जाऊया
दसरा २०२१ च्या खूप खूप शुभेच्छा!

आज रात्री फटाक्यांप्रमाणे तुमची सर्व दुःखे जळून खाक व्हावीत
तुमचा आनंद या दसऱ्याला आणखी हजारपट वाढावा
तुमचा दिवस आनंदात जावो!

Story img Loader