Gudi Padwa 2025 Wishes in Marathi:  गुढीपाडवा हा सण चैत्र शुद्ध महिन्याच्या पहिल्या दिवशी येतो. याच सणापासून मराठी नववर्षाला सुरुवात होते. या सणाच्या निमित्ताने घरोघरी उंचच उंच गुढी उभारून नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले जाते. याच दिवसापासून वसंत ऋतूची सुरुवात होते. या वर्षी गुढीपाडव्याचा सण ३० मार्च २०२५ रोजी साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्ताने प्रत्येक मराठी घरामध्ये गुढी उभारून स्वादिष्ट अन्नपदार्थ, गोडधोड बनवून कुटुंबासह या सणाचा आनंद घेतला जातो. दाराबाहेर सुंदर फुलांचे तोरण, रांगोळी काढली जाते. त्यामुळे सर्वत्र चैतन्यमय, उत्साही वातावरण पाहायला मिळते. यंदा या सणानिमित्त तुम्ही नातेवाईक, प्रियजन आणि मित्र परिवाला शुभेच्छा पाठवून त्यांचा आनंद अधिक द्विगुणीत करू शकता.

गुढीपाडव्याच्या शुभेच्छा संदेश व सुंदर ग्रीटिंग्स WhatsApp, Facebook, Instagram या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर शेअर करून तुम्ही शुभेच्छा देऊ शकता. (Happy Gudi Padwa Status In Marathi)

गुढीपाडवा आणि मराठी वर्षाच्या शुभेच्छा (Gudi Padwa 2025 Wishes in Marathi)

पाडव्याची नवीन पहाट
घेऊन येवो तुमच्या
जीवनात सुखाची लाट
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !

Happy Gudi Padwa 2025 Wishes in marathi
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा २०२५

दुःख सारे विसरून जाऊ,
सुख देवाच्या चरणी वाहू,
स्वप्ने उरलेली नव्या या वर्षी,
नव्या नजरेने नव्याने पाहू…
गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा!

गुढी उभारून आकाशी,
बांधून तोरण दाराशी,
काढून रांगोळी अंगणी,
हर्ष पेरूनी मनोमनी,
करू सुरुवात नववर्षाची…
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा! (Happy Gudi Padwa Wishes In Marathi)

शांत निवांत शिशिर सरला,
सळसळता हिरवा वसंत आला,
कोकिळेच्या सुरुवातीसोबत,
चैत्र ‘पाडवा’ दारी आला…
गुढीपाडवा अन् नूतन वर्षाभिनंदन!

Happy Gudi Padwa 2025 Wishes in marathi
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा २०२५

उभारून आनंदाची गुढी द्वारी
जीवनात येवो रंगत न्यारी
पूर्ण होवोत तुमच्या इच्छा-आकांक्षा
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !

गुढीपाडव्याच्या मराठी शुभेच्छा संदेश (Happy Gudi Padwa 2025 Shubhechha In Marathi)

जल्लोष नववर्षाचा
मराठी अस्मितेचा
हिंदू संस्कृतीचा
सण उत्साहाचा
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !

नवे वर्ष, नवी सुरुवात,
नव्या यशाची, नवी रुजवात,
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Gudi Padwa 2025 Wishes in marathi
मराठी नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा २०२५

नववर्षाची सुरुवात होवो न्यारी,
सुख-समृद्धीने सजो आपली गुढी,
हीच शुभेच्छा आहे आज माझ्या मनी
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! (Gudipadwa Quotes In Marathi)

Happy Gudi Padwa 2025 Wishes in marathi
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा २०२५

सोनेरी पहाट, उंच गुढीचा थाट,
आनंदाची उधळण, अन् सुखाची बरसात,
दिवस सोनेरी, नव्या वर्षाची सुरुवात
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Gudi Padwa 2025 Wishes in marathi
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा २०२५

आरंभ आहे चैत्र मासाचा
गुढी तोरणे सण उत्साहाचा
पूर्ण होवोत तुमच्या इच्छा-अपेक्षा
गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!