Hanuman Janmotsav 2023 : चैत्र महिन्यात रामनवमी उत्सवानंतर आता देशभरात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. हनुमान जयंती म्हणजे भगवान हनुमान यांचा जन्मोत्सव, चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाला हनुमानाचा जन्म झाला अशी आख्यायिका सांगितली जाते. त्यामुळए दरवर्षी चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते. यंदा ६ एप्रिल २०२३ रोजी हनुमान जयंती साजरी केली जाणार आहे.
भगवान शिवाचा अवतार मानले जाणारे भगवान हनुमान ऊर्जा आणि शक्तीचे प्रतीक मानले जातात. भगवान हनुमान हे प्रभू रामाचे निस्सीम भक्त होते. त्यांना शक्तीची देवता म्हणून देखील ओळखले जाते. हनुमान जयंतीनिमित्त मारुतीची पूजा केल्याने भक्तांच्या जीवनातील सुख, समृद्धी नांदते आणि सर्व संकटे, दु:ख दूर होतात. हनुमान जयंतीच्या निमित्ताने तुम्ही मराठीतून कुटुंबिय, नातेवाईक, मित्रमंडळी आणि प्रियजनांना व्हॉट्सअॅप स्टेट्स, मेसेजेस पाठवून शुभेच्छा देऊ शकता.
हनुमान जयंतीनिमित्त मित्रपरिवार, कुटुंबियांना मराठीतून द्या शुभेच्छा (Hanuman Jayanti 2023 Wishes in Marathi)
राम, लक्ष्मण, जानकी
जय बोला हनुमान की!
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा.
ज्याच्या मनात आहे श्रीराम
ज्याच्या तनात आहे श्रीराम
संपूर्ण विश्वात जो आहे बलवान
असा माझा प्रिय हनुमान
जय श्रीराम… जय हनुमान
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
रामाप्रती भक्ती
तुझीराम राखे अंतरी
रामासाठी शक्ती
तुझी राम राम बोले वैखरी
सूर्याचा घ्यायला गेला घास
जो वीरांचा आहे खास
त्याच्या शक्तीपुढे सर्व काही लहान
असा रामभक्त आहे सर्व भक्तांमध्ये महान
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा
भगवान श्री हनुमान आपल्या जीवनात
आनंद, शांती आणि समृद्धी देवो
आणि त्याची कृपादृष्टी
आपल्या परिवारावर कायम राहो..
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
ज्ञान, गुण, बळ आणि भक्ती चे दैवत,
श्री हनुमान जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा..!
माझी प्रार्थना आहे की बजरंगबली
आपले प्रत्येक संकटातून रक्षण करो..
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान
एक मुखाने बोला जय जय श्री हनुमान…
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा…