उद्या म्हणजेच १५ ऑगस्ट २०२२ रोजी संपूर्ण देशभरात ७६वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जाणार आहे. भारत स्वतंत्र होऊन ७५ वर्ष पूर्ण झाल्याने यंदाचा स्वातंत्र्यदिन खूपच खास आहे. ‘स्वातंत्र्याचा अमृत महात्सव’ अंतर्गत अनेक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. ‘हर घर तिरंगा’ मोहिमेची तयारी शेवटच्या टप्प्यात असून उद्या प्रत्येक घरात तिरंगा फडकताना दिसेल.
सर्वजण एकमेकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत आहेत. सोशल मीडियावरही शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. याचनिमित्ताने तुम्ही तुमच्या प्रियजनांना खालील संदेश पाठवून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा द्या.
या दिवशी हुतात्म्यांना त्यांच्या बलिदानासाठी वंदन करूया आणि आपल्याला एक उज्ज्वल देश दिल्याबद्दल त्यांचे आभार मानूया. स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!
आपण सर्व एक आहोत. आपल्या सर्वांना आपल्या प्रिय देशाचा अभिमान आहे. भारताला चैतन्यशील आणि सशक्त बनवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत. तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!
देशाला स्वतंत्र करणे हे आपल्या स्वातंत्र्य सैनिकांचे स्वप्न होते ते पूर्ण झाले. मातृभूमीच्या विकासासाठी परिश्रम घेऊन त्यांचे स्वप्न साकार करूया. स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!
आपल्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व सैनिकांना शतशः प्रणाम! जय हिंद!
आपले स्वातंत्र्य कधीही बलिदानाशिवाय येत नाही. या महान राष्ट्राने भूतकाळात सहन केलेला रक्तपात आणि क्रूरता कधीही विसरू नका. स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा!
या महान राष्ट्राचा एक भाग असल्याचा अभिमान वाटण्याचा आजचा दिवस आहे. स्वातंत्र्याची ही भावना आपल्या सर्वांना जीवनात यश आणि वैभवाकडे नेवो. स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!
आपले स्वातंत्र्यसैनिक, सैनिक, राष्ट्राचे वीर, नायक हेच आपण आज जिवंत आणि सुस्थितीत असण्याचे कारण आहेत. त्यांचे बलिदान आम्ही कधीही विसरणार नाही. स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!
आपल्या स्वातंत्र्यसैनिकांप्रतीचा आदर कधीही कमी होणार नाही. संपूर्ण देशाला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा!