Happy Makar Sankranti 2025 Wishes SMS : हिंदू धर्मात प्रत्येक सणाचे विशेष असे महत्त्व आहे; पण वर्षाच्या सुरुवातीलाच येणारा मकर संक्रांत सण अधिक खास मानला जातो. हा सण धार्मिक आणि पवित्रतेचा संगम आहे. या दिवशी सूर्य देव मकर राशीत प्रवेश करतो आणि त्यामुळे या सणाला मकर संक्रांत, असे म्हणतात. या सणाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी पतंग उडवण्याचा आनंद घेतला जातो, तिळगुळाचे लाडू वाटून एकमेकांना गोड शुभेच्छा दिल्या जातात. यंदा १४ जानेवारी रोजी मंकर संक्रांतीचा सण साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने तुम्ही तुमच्या प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook च्या माध्यमातून गोड शुभेच्छा अन् शुभेच्छापत्र पाठवून या सणाचा गोडवा आणखी वाढवू शकता.

मकर संक्रांत सणानिमित्त तुम्ही तुमचे प्रियजन, नातेवाईक यांना प्रत्यक्ष भेटू शकत नसला ऑनलाइन शुभेच्छा नक्की पाठवू शकता. चला तर मग पाहूया मकर संक्रांतीच्या गोड गोड अन् काही हटके अशा मराठमोळ्या शुभेच्छा…

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

मकर संक्रांतीच्या मराठमोळ्या शुभेच्छा | Happy Makar Sankrati Wishes In Marathi

१) गुळातील गोडवा ओठांवर येऊ द्या, मनातील कडवटपणा बाहेर पडू द्या, मकर संक्रांतीच्य गोड गोड शुभेच्छा!

२) मकर संक्रांतीचा हा पवित्र सण तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि यश घेऊन येवो. मकर संक्रांतीच्या शुभेच्छा!

३) तुमच्या आयुष्यात सकारात्मकतेचा सूर्य उगवो. मकर संक्रांतीच्या शुभेच्छा!

४) मकर संक्रांतीचा सण तुमच्या घरात तिळाचे लाडू आणि गुळाच्या गोडीने आनंद घेऊन येवो!

५) नात्यातील कटुता इथेच संपवा… तिळगूळ घ्या नि गोड गोड बोला
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

६) झाले-गेले विसरुनी जाऊ, तिळगूळ खात गोड गोड बोलू..!
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

७) तुमच्या यशाचा पतंग उंचच उंच उडत राहो हीच सदिच्छा!
शुभ मकर संक्रांती, तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला!

८) जपू तिळाप्रमाणे स्नेह, वाढवू गुळाप्रमाणे गोडवा, निर्माण करू भेद-भावमुक्त समाज प्रेरणा, मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा! तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला!

९) तिळात मिसळला गूळ, त्याचा केला लाडू… मधुर नात्यासाठी गोड गोड बोलू..! संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

१०) आठवण सूर्याची, साठवण स्नेहाची
कणभर तीळ, मणभर प्रेम
गुळाचा गोडवा, ऋणानुबंध वाढवा
तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

मकर संक्रांतीच्या शुभेच्छा |Makar Sankrati Quotes In Marathi

१) विसरुनी जा दु:ख तुझे हे,
मनालाही दे तू विसावा,
आयुष्याचा पतंग तुझा हा
प्रत्येक क्षणी गगनी भिडावा
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

२) तीळ आणि गुळासारखी राहावी
आपली मैत्री घट्ट अन् मधुर
नात्यातील कटुता इथेच संपवा
तिळगूळ घ्या नि गोड गोड बोला!

२) एक तिळ रुसला, फुगला,
रडत रडत गुळाच्या पाकात पडला,
खुदकन हसला, हातावर येताच बोलू लागला,
तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला!

३) तिळाची गोडी, प्रेमाची माडी,
माडीचा जिना, प्रेमाच्या खुणा, मायेचा पान्हा,
साऱ्यांच्या मना, म्हणूनच एक तीळ सात जना,
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

४) मराठी अस्मिता, मराठी मन,
मराठी परंपरेची मराठी शान,
आज संक्रांतीचा सण,
घेऊन आला नवचैतन्याची खाण!
तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला!

५) वर्ष सरले, डिसेंबर गेला,
हर्ष घेऊनी जानेवारी आला,
निसर्ग सारा दवाने ओला,
तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला
मकर संक्रांतीच्या संदेशरूपी गोड गोड शुभेच्छा!

Story img Loader