आई एक नाव असतं
घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं!
सर्वांत असते तेव्हा जाणवत नाही
आता नसली कुठंच तरीही नाही म्हणवत नाही
आईबद्दल ज्येष्ठ कवी फ.मुं. शिंदे यांनी उत्तम कविता लिहिली आहे…
फमुं म्हणतात तसंच… आई नावाचं हे गजबलेलं गाव नेहमीच जाणवतं असं नाही…
गृहित धरणं हा प्रकार आईच्या आयुष्याला चिटकलेलाच…
आईला योग्य तो मान-सन्मान मिळतोच असंही नाही….
आता तुमच्या आईबद्दलच्या भावना व्यक्त करण्यासाठी लोकसत्ता डॉट कॉम देतंय एक संधी…
१० मे रोजी आहे Mothers Day… कायम दुर्लक्षित राहिलेलं आई हे भावनेचं गाव आता या दिवशी सन्मानित करण्याची ही संधी आहे असं समजा…
तुम्हाला फार काही करायचं नाहीच…
एक सेल्फी आईसोबत काढायचाय… तो आमच्या loksatta.com साईटवर अपलोड करायचा… आणि आईबद्दल दोन शब्द लिहायचे… (येथे क्लिक करा…)
योग्य ते फोटो आम्ही नक्की प्रसिद्ध करू…
त्यासाठी काय करायचं?
१. https://loksatta.com/mothers-day/ या लिंकवर क्लिक करा…
२. अपलोड जिथे म्हटलंय तिथे फोटो अपलोड करा…
३. BROWSE वर क्लिक केल्यावर तुमचा फोटो तुम्हाला सिलेक्ट करता येईल….
४. Description च्या ठिकाणी आईबद्दल थोडक्यात भावना व्यक्त करा.
५. Name – या ठिकाणी तुमचं नाव लिहा.
६. Email – या ठिकाणी तुमचा ईमेल-आयडी टाका
७. Location – तुम्ही कोणत्या शहरातून फोटो पाठवताय त्या शहराचं/गावाचं नाव टाका
८. I’m not a robot या बॉक्सवर टिक करा आणि सबमिटचं बटन दाबा.
फोटो पाठवण्यासाठी काही नियमावली
१. एकाच व्यक्तीचे दोन फोटो आल्यास दोन्ही फोटो रिजेक्ट होतील.
२. फोटोसोबत माहिती नसल्यास ते फोटो स्वीकारले जाणार नाहीत.
३. फोटो आडवा असावा…
४. १० मेपर्यंत येणारेच फोटो स्वीकारले जातील. त्यानंतर ते अपलोड करता येणार नाहीत.
५. कोणते फोटो प्रसिद्ध करायचे याचे सर्वस्वी अधिकार loksatta.com कडे असतील.