Happy Narak Chaturdashi 2024 Wishes : दिवाळी हा प्रकाशमय दिव्यांचा, उत्साहाचा सण मानला जातो. हा सण आपल्याकडे थाटामाटात, उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात साजरा केला जातो. वसुबारसपासूनच दिवाळी सणाचे वातावरण पाहायला मिळते. पण, आपण नरक चतुर्दशीपासून दिवाळी सणाला सुरुवात करतो. हिंदू पंचागानुसार यंदा नरक चतुर्दशी गुरुवार म्हणजे ३१ ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे. नरक चतुर्दशीला नरक चौदस आणि हनुमान जयंती असते. याला छोटी दिवाळीदेखील म्हणतात. यंदा तुम्ही मित्र आणि नातेवाईकांना खास मराठीतून शुभेच्छा पाठवून या सणाचा आनंद द्विगुणित करू शकता.

नरक चतुर्दशीच्या खास मराठमोठ्या शुभेच्छा ( Happy Narak Chaturdashi 2024 Wishes In Marathi)

१) श्रीकृष्णाने जसा नरकासुराचा केला नाश, तसाच तुमच्या सर्व दु:खांचा होवो नाश; नरक चतुर्दशीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!

२) आपल्याकडून नेहमी सत्कर्म घडो! आपणास स्वर्ग सुख नित्य लाभो! नरक चतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा!

३) नरक चतुर्दशीच्या शुभ मुहूर्तावर आयुष्यात आपुल्या, नवचैतन्याचे नवकिरण येवो आपल्या दारी
नरक चतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा!

४) सत्याचा असत्यावर नेहमीच विजय असावा
अन्यायाचा प्रतिकार करण्याचे बळ आपल्याला लाभो!
ही दिवाळी तुम्हा सर्वांना सुख-समृद्धी आणि भरभराटीची जावो
नरक चतुर्दशीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

happy diwali to all
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

६) दिवाळीची नवी पहाट घेऊन आली सुखाची नवी आशा,
दुष्ट प्रवृत्तींचा संहार होऊन जगी उजळू दे तेजाची दिशा
आपल्या सर्वांना नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!

७) दिवाळीच्या मुहूर्ता, अंगणी भाग्यलक्ष्मीची स्वारी
सुख-समाधान, आरोग्य आणि धनसंपदा, गुंफून हात हाती, येवो तुमच्या दारी
नरक चतुर्दशीच्या निमित्ताने मंगलमय शुभेच्छा

८) लक्ष दिव्यांनी उजळली निशा,
घेऊन नवी उमेद नवी आशा,
होतील पूर्ण मनातील सर्व इच्छा
नरक चतुर्दशीनिमित्त शुभेच्छा!

happy diwali 2024
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा २०२४

९) सर्व वाईटांवर तुम्हाला विजय
मिळो आणि हे वर्ष तुमच्यासाठी
नशीब घेऊन येवो आणि तुमची
सर्व स्वप्ने पूर्ण करो
नरक चतुर्दशीनिमित्त शुभेच्छा !!

happy diwali 2024
दिवाळीच्या सर्वाना खूप खूप शुभेच्छा

१०) या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध केला होता.
आपल्या सर्वांच्याही आयुष्यात दुःखरूपी व दुर्गुणरूपी
नरकासुराचा नाश होवो, ही सदिच्छा!”
नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!