New Year 2025 Visa Free Countries : इयर सेलिब्रेशनसाठी लोक भारतासह परदेशातील वेगवेगळ्या ठिकाणी जातात. तिथे कुटुंब किंवा मित्रांसह न्यू इयर सेलिब्रेट करतात. जर यंदा तुम्हीही कुठेतरी सुंदर ठिकाणी प्रवास करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही नेपाळला जाऊ शकता. भारताचा शेजारी देश नेपाळ हा सौंदर्याच्या बाबतीत खूपच सुंदर देश आहे, जेथे जाऊन तुम्ही व्यस्त जीवनातून बाहेर पडून निवांत क्षण अनुभवू शकता. व्हिसा आणि पासपोर्टशिवायही तुम्ही या शांतताप्रिय देशाला सहज भेट देऊ शकता.(New Year 2025 Celebrations)

नेपाळमध्ये करा न्यू इयर सेलिब्रेशन ( Celebrate New Years eve in Nepal)

शेजारील देश नेपाळमध्ये जाण्यासाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागणार नाहीत. अगदी कमीत कमी पैशात तुम्ही नेपाळची आंतरराष्ट्रीय टूर करू शकता. आम्ही तुम्हाला भारतातून नेपाळला कसे जायचे, नेपाळला जाण्यासाठी सर्वोत्तम मार्ग कोणता आहे आणि नेपाळला जाण्यासाठी किती खर्च येईल, नेपाळमध्ये फिरण्यासाठी बेस्ट ठिकाणं कोणती आहेत अशा सर्वांची माहिती देऊ..

e cycle ferry for Mahapex 2025 exhibition in Mumbai reached Nashik Roads Head Post Office on Thursday
इ सायकल फेरीत नाशिकमधील टपाल कर्मचाऱ्यांचा सहभाग
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
IND vs ENG Pakistani Origin England Bowler Saqid Mahmood Denied Visa To India
IND vs ENG: पाकिस्तान वंशाच्या इंग्लंड खेळाडूला भारत व्हिसा नाकारला, भारत दौऱ्यात खेळू शकणार?
Image of Indian nationals returning home or a related graphic
Russia-Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धात केरळच्या तरुणाच्या मृत्यूनंतर भारत आक्रमक, युद्धात लढत असलेल्या भारतीयांना परत पाठवण्याची मागणी
PM Modi to youth: Step out of comfort zone to build Viksit Bharat by 2047
युवक देशाला २०४७पर्यंत विकसित करतील ; ‘विकसित भारत युवा नेता संवाद’ मध्ये पंतप्रधान मोदींचा विश्वास
Separated father cannot object to daughters passport
विभक्त राहणारे वडील मुलीच्या पासपोर्टला हरकत घेऊ शकत नाहीत
Worlds Most Powerful Passports 2025
Worlds Most Powerful Passports 2025 : जगात सिंगापूरचा पासपोर्ट पुन्हा सगळ्यात पॉवरफुल, भारताचा क्रमांक घसरला; तळाशी कोण? जाणून घ्या
AIIMS Recruitment 2025
AIIMS Recruitment 2025 : एम्समध्ये २२० पदांची भरती सुरू, MBBS व BDS उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी; जाणून घ्या, कसा करावा अर्ज?

नेपाळला पोहोचायचे कसे? (How To Reach Nepal)

नेपाळला जाण्यासाठी तुम्ही दिल्लीसह भारतातील अनेक शहरांमधून फ्लाइट घेऊ शकता. दिल्ली ते नेपाळची राजधानी काठमांडू अशी थेट उड्डाणे आहेत. तुम्ही थेट काठमांडूला जाऊ शकता. फ्लाइट तिकिटासाठी तुम्हाला ६००० रुपये आणि त्याहून अधिक खर्च करावा लागू शकतो. त्याच वेळी जर तुम्ही दिल्लीहून नेपाळला बसने जाण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही भारत-नेपाळ मैत्री बस सेवेद्वारे नेपाळलाही जाऊ शकता. या बसने नेपाळला पोहोचण्यासाठी तुम्हाला २५ ते ३० तास लागू शकतात. नेपाळला बसने जाण्यासाठी तुम्हाला ३००० रुपयांपर्यंत खर्च येतो.

नेपाळमध्ये प्रवेश करण्यासाठी भारतीयांना कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे?

भारतातून नेपाळला जाण्यासाठी व्हिसा किंवा पासपोर्टची आवश्यकता नाही. पण आधार कार्ड, पॅन कार्डसह इतर भारतीय ओळखपत्र पुरावे बरोबर ठेवण्यास विसरू नका.

नेपाळमधील हॉटेलचे भाडे किती आहे? (What documents do Indians need to enter Nepal?)

जर तुम्ही नेपाळला जाण्याचा विचार करत असाल तर कमी खर्चात तुम्ही तिथे राहू शकता. तिथली हॉटेल्स परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध आहेत. तुम्हाला नेपाळमध्ये सुमारे १५०० ते ५००० रुपयांमध्ये चांगली हॉटेल्स मिळू शकतात, ज्यामध्ये तुम्ही सहज राहू शकता. तुम्ही नेपाळमध्ये कमीत कमी पैशांत अनेक वस्तू खरेदी करू शकता.

हेही वाचा – Healthy Hair : आठवडाभरात कोरडेपणा अन् फाटे फुटलेल्या केसांपासून मिळेल सुटका; करा फक्त 3 उपाय, केस दिसतील मऊ, घनदाट

नेपाळमध्ये भेट देण्यासाठी प्रसिद्ध ठिकाणं (Famous places to visit in Nepal)

पशुपतिनाथ मंदिर

पशुपतिनाथ मंदिरापासून तुम्ही नेपाळमधील टूर एक्सप्लोर करू शकता. हे मंदिर नेपाळची राजधानी काठमांडूपासून तीन किलोमीटर अंतरावर बागमती नदीच्या काठावर आहे. हे मंदिर भगवान शिवाला समर्पित असून जगभर प्रसिद्ध आहे. हिंदू धर्माचे लोक येथे भगवान शंकराच्या दर्शनासाठी जातात. जर तुम्हीही नेपाळला जात असाल तर या मंदिरात भगवान शिवाचे दर्शन नक्की करा.

या’ ठिकाणांना जरूर भेट द्या

नेपाळची राजधानी काठमांडू हे पाहण्यासाठी बेस्ट ठिकाणांपैकी एक आहे. काठमांडूला भेट दिल्यानंतर तुम्ही पोखरा, लुंबिनी, जनकपूर, माता सीतेचे जन्मस्थान, एव्हरेस्ट प्रदेश, चितवन राष्ट्रीय उद्यान, काठमांडू व्हॅली या सुंदर ठिकाणांनाही भेट देऊ शकता.

Story img Loader