Happy New Year 2022 Wishes, नवीन वर्षाच्या शुभेच्छा 2022 शुभेच्छा : 2021 मध्ये करोना आपत्तीने जो काही हाहाकार माजवला तो वर्षाच्या अखेरीस थंडावेल, अशी आशा डोळ्यासमोर असताना अचानक नववर्ष जवळ आलेलं असताना करोना आणि त्याच्या सोबतील ओमायक्रॉनने सुद्धा डोकं वर काढलं आहे. नवीन वर्षाचे काउंटडाऊन सुरू झाले आहे आणि 2022 सुरू होण्यास काही दिवसच शिल्लक आहेत. समोर करोना आणि ओमायक्रॉनचं संकट उभं असताना या नववर्षाच्या निमित्ताने तुमच्या जवळच्या मित्रांना आणि नातेवाईकांना काही खास नववर्षाच्या शुभेच्छा देणारे Happy New Year 2022 wishes, messages, status पाठवून त्यांचं हे नववर्ष आनंदी करा. जर तुम्ही सुद्धा happy new year wishes in marathi | नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा शोधत असाल तर तुमच्यासाठी खास मेसेज, स्टेटस आणि शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत.

13 December Daily Horoscope in Marathi
१३ डिसेंबर पंचांग: पंचांगानुसार शिवयोग १२ पैकी कोणत्या राशीची आर्थिक घडी सुधारणार? तुम्हाला लाभेल का भाग्याची साथ; वाचा शुक्रवारचे भविष्य
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Guru Asta 2025 Guru will set for 27 days in the new year
Guru Ast 2025: नवीन वर्षात २७ दिवसांनी अस्त होणार गुरू! ‘या’ राशींची होणार चांदी, झटपट वाढेल पगार
12 December Rashi Bhavishya In Marathi
दुसरा गुरुवार, १२ डिसेंबर पंचांग: महालक्ष्मीच्या कृपेने मेषला मिळेल प्रार्थनेचे फळ तर व्यवसायिकांचा असेल सोन्याचा दिवस, वाचा तुमचे राशिभविष्य
Thane, Chitrarath, Constitution, New Year Swagat Yatra,
ठाणे : यंदाच्या नववर्षे स्वागत यात्रेत ‘संविधान’ विषयावर चित्ररथ
Budh Uday In Scorpio 2024 horoscope 2025
Budh Uday 2024 : ९ तासांनंतर बुध उदयाने एका झटक्यात ‘या’ राशींच्या लोकांच्या नशिबाला मिळेल कलाटणी; तुम्हीही व्हाल कोट्यधीश?
Guru gochar gajkesari rajyog horoscope 2025 in marathi
२०२५ चा गजकेसरी राजयोग ‘या’ तीन राशींची करु शकतो आर्थिक भरभराट, हत्तीवरुन वाटाल साखर
Viral Video Shows Man Sign Birthday Song In Marathi
‘तुझा आहे बर्थडे…’ आता वाढदिवसाला मराठी गाणं गात द्या शुभेच्छा; VIRAL VIDEO पाहून हसाल पोट धरून

New Year Wishes In Marathi | नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

नव्या या वर्षी
संस्कृती आपली जपूया
थोरांच्या चरणी एकदा तरी
मस्तक आपले झुकवू या
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

भोवर्‍यातून बाहेर पडून किनारा मिळाला,
जगण्याला आज एक नवा अर्थ मिळाला,
चढ- उतार्‍यांनी भरलेले होते हे वर्ष,
या नव्या वर्षी परत एकदा तुझी साथ मिळाली
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!

मना मनातून आज उजळले
आनंदाचे लक्ष्य दिवे…
समृध्दीच्या या नजरांना
घेऊन आले वर्ष नवे….
आपणांस व आपल्या परिवारास
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…

हे आपल नातं असंच राहु दे,
मनात आठवणींची ज्योत अखंड तेवत राहु दे
खूप सुंदर असा प्रवास होता 2021 वर्षाचा
2022 मध्येही अशीच सोबत कायम राहू दे
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

सरतं वर्ष जातय आपल्यापासून दूर
नव्या वर्षात संपून जाऊ देत शंका- कुशंका, राग-रुसवे
तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

नवीन वर्ष आपणांस सुखाचे,
समाधानाचे, ऐश्वर्याचे, आनंदाचे, आरोग्याचे जावो…!
येत्या नवीन वर्षात आपले जीवन आनंदमय आणि सुखमय होवो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
नववर्षाभिनंदन
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!

सर्वांच्या हृदयात असुदे प्रेमाची भावना
नव्या वर्षात पुरी होऊ दे अधुरी ही कहाणी
हीच प्रार्थना करते होऊन नतमस्तक
गरिबांना मिळू दे अन्न- वस्त्र आणि निवारा
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

हे नातं सदैव असंच राहो,
मनात आठवणींचे दिवे कायम राहो,
खूप प्रेमळ होता 2021 चा प्रवास,
अशीच राहो 2022 मध्येही आपली साथ.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!

नवीन वर्ष प्रकाश बनून आलंय आपल्या जीवनात
या वर्षात उजळून जाऊदे भाग्याची ही रेषा
परमेश्वराची कृपा राहो सर्वांवरती खास
तुमच्या उपस्थितीने लखलखुदे हे जीवन आज
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

पाकळी-पाकळी भिजावी
अलवार त्या दवाने
फूलांचेही व्हावे गाणे
असे जावो वर्ष नवे…
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

हे साल तुमच्यासाठी ठरो आनंदाची पर्वणी
आयुष्यातील प्रत्येक क्षण उजळू दे क्षणोक्षणी
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न,
नव्या आशा,नवी उमेद व नाविन्याची कास धरत
नवीन वर्षाच स्वागत करू.
आपली सर्व स्वप्न, आशा, आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy New Year Whatsapp Messages In Marathi | नवीन वर्षाच्या शुभेच्छा व्हॉट्सअॅप मेसेज

गेलं ते वर्ष, गेला तो काल,
नवीन आशा अपेक्षा घेवून आले 2022 साल.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

नवीन वर्ष आपणांस सुख-समाधानाचे,
आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो!
नवीन वर्षात आपले जीवन आनंदमय,
सुखमय होवो, अशी श्रीचरणी प्रार्थना.

पुन्हा एक नवीन वर्ष,
पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा
एक नवी दिशा,
नवी स्वप्ने, नवी क्षितीजे,
सोबत माझ्या नव्या शुभेच्छा !
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

31 तारखेला फक्त मजा करा अन् नवीन वर्षात
भरपुर काम करा……
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

घेऊनी नवी उमेद ,नवी आशा,
होतील मनातील पूर्ण इच्छा
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

गतवर्षीच्या
फुलाच्या पाकळ्या वेचून घे
भिजलेली आसवे झेलून घे
सुख दुःख झोळीत साठवून घे
आता उधळ सारे हे आकाशी
नववर्षाचा आनंद भरभरून घे
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..

नव्या वर्षात तुम्हाला जास्त प्रोब्लेम्स, जास्त अश्रू आणि जास्त वेदनांचा सामना करावा लागो. मला चुकीचं समजू नका. तुम्ही फक्त मजबूत व्हावं एवढीच माझी इच्छा आहे.

2022….
नवीन वर्ष आपणां सर्वांस
सुखाचे,
समृद्धीचे,
भरभराटीचे,
सुरक्षित आणि आरोग्यदायी जावो……

येवो समृद्धी अंगणी,
वाढो आनंद जीवनी,
तुम्हासाठी या शुभेच्छा,
नव वर्षाच्या या शुभदिनी..!

वं वर्ष येवो घेऊन येवो सुखाचा प्रकाश, नशिबाची दारं उघडावी, देव राहो तुमच्यावर प्रसन्न, हीच प्रार्थना आहे देवाकडे तुमच्या चाहत्याची. नववर्षाभिनंदन.

दुःख सारी विसरून जावू ..
सुख देवाच्या चरणी वाहू…
स्वप्ने उरलेली.. नव्या या वर्षी
नव्या नजरेने नव्याने पाहू…
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…

नव्या कल्पना, नव्या भराऱ्या, झेप घेऊया क्षितिजावर
उंच उंच ध्येयाची शिखरे,
गगनाला घालूया गवसणी,
हाती येतील सुंदर तारे !
नववर्षाच्या सुरवातीला मनासारखे घडेल सारे !!
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..

Happy New Year Status In Marathi | मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा स्टेटस

संकल्प करूया साधा, सरळ, सोप्पा
दुसऱ्याच्या सुखासाठी मोकळा करूया हृदयाचा एक छोटासा कप्पा
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..

आता तर हद्दच झाली यार ज्याला बघावं तो बाजी मारतोय, कोणी 15 दिवस, कोणी 7 दिवस, कोणी 2 दिवस, कोणी 1 दिवस मग तुम्हाही घ्या…….नववर्षाच्या शुभेच्छा Happy New Year 2022

नमस्कार!
उद्या तुमच्यावर अनेकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होईल..
त्या घाईगडबडीत तुमचे माझ्या शुभेच्छांकडे लक्ष असेल-नसेल म्हणून,
आजच एक दिवस आधी मी माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून,
तुम्हाला व तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो..
नवीन वर्ष 2022 हे तुम्हाला आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक,
आणि मंगलमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना…!

इडा, पीडा टळू दे..
आणि नवीन वर्षात
माझ्या भावांना,
कडक आयटम मिळू दे…
Happy New Year 2022!

नवीन वर्ष येणार म्हणून
जास्त उड्या मारू नका
फक्त कॅलेंडर बदलणार आहे
बायको तिच राहणार आहे.

पुन्हा नववर्षाचे स्वागत करूया
गतवर्षाची गोळाबेरीज करूया
चांगले तेवढे जवळ ठेऊन वाईट वजा करूया
नवे संकल्प,
नव्या आशा पुन्हा पल्लवित करूया
नवीन वर्षाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा !!!

आयुष्याच्या या वळणावर
तुमच्यासारखे मित्र मला मिळाले या पेक्षा
जास्त मला काही नको आहे येणाऱ्या या वर्षात
तुम्हाला सुख समृद्धी आरोग्य
लाभो हे वर्ष
तुमच्यासाठी एक अत्यंत सुखाचे जावो हीच ईश्वर
चरणी प्रार्थना.
तुमचाच मित्र…

मला आशा आहे की नवीन वर्ष
आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम वर्ष असेल..
आपली सर्व स्वप्ने सत्यात येतील आणि
आपल्या सर्व आशा पूर्ण होतील..!
नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा..!

लोक नवीन वर्षात देवाकडे खुप काही मागतील,
पण मी देवाकडे फक्त तुझी साथ मागेल..
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!

या नवीन वर्षासाठी माझी एकच इच्छा आहे की,
मला तुझ्यावर पूर्वीपेक्षा जास्त प्रेम करता यावे,
तुझी पूर्वीपेक्षा जास्त काळजी घेता यावी,
आणि पूर्वीपेक्षा तुला अधिक सुख देता यावे..
नवीन वर्षाच्या प्रेमपूर्वक शुभेच्छा..!

चला या नवीन वर्षाचं.
स्वागत करूया,
जुन्या स्वप्नांना,
नव्याने फुलवूया,
नववर्षाभिनंदन

मागील वर्षी मी केलेली सर्वात चांगली
गोष्ट म्हणजे तुमचा मित्र बनणे..
मला खरोखरच ही मैत्री
आयुष्यभर कायम ठेवायची आहे..
नवीन वर्षाच्या मैत्रीपूर्ण शुभेच्छा..!

तुमच्या या मैत्रीची साथ
यापुढे ही अशीच कायम असू द्या…नव्या वर्षात नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या…
येणा-या नवीन वर्षासाठी आपल्याला भरभरून शुभेच्छा!

माणसं भेटत गेली,
मला आवडली आणि मी ती जोडत गेलो !!
चला..या वर्षाचे हे अखेरचे काही दिवस
माझ्याकडून काही चुक झाली असल्यास क्षमस्व,
आणि तुमच्या या प्रेमळ मैत्रीबद्दल खुप सारे धन्यवाद..!!

पुन्हा एक नवीन वर्ष,
पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा
एक नवी दिशा,
नवी स्वप्ने, नवी क्षितीजे,
सोबत माझ्या नव्या शुभेच्छा !

एक जानेवारी म्हणजे 365 पानांच्या पुस्तकाचं पहिलं कोरं पान आहे. मग छान नवीन कथा लिहा.

तुमच्या या मैत्रीची साथ
यापुढे ही अशीच कायम असू द्या…
नव्या वर्षात नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या…
येणा-या नवीन वर्षासाठी आपल्याला भरभरून शुभेच्छा !

एखादी चांगली गोष्ट घडण्यासाठी आपण फक्त करणंच नाहीतर त्याचं स्वप्नंही पाहिलं पाहिजे. नव्या वर्षात नव्या संधी मिळवा. हॅपी न्यू ईयर.

“जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे,
भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहुन कळु दे,
शिखरे यशाची सर तुम्ही करावी,
पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी,
तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे,
आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे”…
सन 2022 साठी हार्दीक शुभेच्छा…!

नव्या कल्पना, नव्या भराऱ्या, झेप घेऊया
क्षितिजावर उंच उंच ध्येयाची शिखरे,
गगनाला घालूया गवसणी, हाती
येतील सुंदर तारे ! नववर्षाच्या
सुरवातीला मनासारखे घडेल सारे !
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!..

दु:ख सारी विसरून जा …
सुख देवाच्या या चरणी वाहू …
स्वप्ने उरलेली .. नव्या या वर्षी
नव्या नाझरेने, नव्याने पाहू ..
नवीन वर्षाच्या शुभेच्छा.
नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy New Year Quotes In Marathi | हॅपी न्यू ईयरसाठी खास कोट्स

माझी इच्छा आहे की येणारे 12 महिने सुख मिळो, 52 आठवडे यश आणि 365 दिवस मजेदार जावोत माझ्या मित्राचे. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

आज वर्षाचे शेवटचे काही तास राहिलेत…..
खूप काही गमावलं, पण त्यापेक्षा अजून कमावलं
अगदी ह्रदयाजवळची माणसे दूर झाली,
पण तितकीच जवळ आली,
खूप काही सोसलं,
खूप काही अनुभवलं,
केलेल्या संघर्षातून जीवन कसं जगायचं हे शिकलं……
धन्यवाद मित्रांनो देत असलेल्या साथीबद्दल……
असाच सहवास तुमचा आयुष्यभर लाभो…….
चुकून जर मन दुखवलं असेल तर मोठ्या मनाने माफ करा……
अन येणारे नवीन वर्ष सुखाचे, समृद्धीने, भरभ­राठीचे “राहो”…
|| नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ||

माझ्यासाठी तर 2021 वर्ष खूपच छान होतं. मला विश्वास आहे की, तुमचंही चांगलंच गेलं असेल. असाच सुरू करूया 2022 चा नवा प्रवास. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

नव्या वर्षात नव्या उमेदीने
पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या…
येणा-या नवीन वर्षासाठी
आपल्याला आमच्या कडून भरभरून शुभेच्छा!

मला आशा आहे की नवीन वर्ष
आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम वर्ष असेल.
आपली सर्व स्वप्ने सत्यात येतील आणि
आपल्या सर्व आशा पूर्ण होतील!

तुम्ही जिथे जाल तिथे करा फ्लाय ऑल टियर. सर्व लोकांचे व्हा तुम्ही डिअर, तुमचा मार्ग राहो ऑलवेज क्लियर आणि देव तुम्हाला देवो झक्कास न्यू ईयर. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

नको चंद्र तारे
फुलांचेप सारे..
आणि नवीन वर्षात
जिथे मी बसावे
तिथे 4G नेटवर्क असावे…

पाहता दिवस उडुन जातील तुझ्या
कर्तृत्वाने दिशा झळकुन जातील,
आशा मागील दिवसांची करु नको,
पुढील दिवस तुझे सोन्याने न्हाऊन निघतील.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

Story img Loader