Republic Day 2023 Marathi Wishes: भारतात दरवर्षी २६ जानेवारीला मोठ्या उत्साहात आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो. यावर्षी भारत आपला ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. अलीकडे कोणताही सण म्हंटला की सर्वात आधी मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना WhatsApp Status, फेसबुक वर शुभेच्छा दिल्या जातात. आपण भारतीय लोकं दिवाळी- दसऱ्याप्रमाणेच राष्ट्रीय सण सुद्धा धामधुमीत साजरे करतो. येत्या २६ जानेवारीला सुद्धा आपल्या मित्रमंडळींना पाठवण्यासाठी आपण शुभेच्छापत्र शोधत असाल तर आम्ही तुमचे कष्ट थोडे कमी करत आहोत.

आज आम्ही नेहमीच्या मेसेजपेक्षा काहीतरी वेगळं आणि खरोखरच देशाप्रतीचा तुमचा अभिमान प्रेम दाखवणारं स्टेटस ठेवण्यासाठी मराठी शुभेच्छापत्र खाली देत आहोत. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी व्हाट्सऍप स्टेटस, इंस्टग्राम, फेसबुकसह तुम्ही वापरत असणाऱ्या सोशल मीडियावरून ही ग्रीटिंग्स शेअर करायला विसरु नका.

हे ही वाचा<< विश्लेषण: प्रजासत्ताक दिनाचा चित्ररथ नेमकं कोण घडवतं? महाराष्ट्राची यंदाची थीम नेमकी काय असणार?

भारतीय प्रजासत्ताक दिन चिरायू होवो!

Republic Day 2023 Wishes in Marathi
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

उत्सव तीन रंगाचा, आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांसाठी.. ज्यांनी भारत देश घडवला… प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

Republic Day 2023 Wishes in Marathi
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

स्वर्गाहुनी प्रिय आम्हाला अमुचा सुंदर देश ..आम्ही सारे एक. .. जरी नाना जाती नाना वेष…
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

Republic Day 2023 Wishes in Marathi
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

वाढदिवस विसरला तरी चालेल… पण तुम्ही 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी कधीच विसरु नका.
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

Republic Day 2023 Wishes in Marathi
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

वीरांच्या बलिदानाची ही कहाणी आहे,
वीरगती मिळालेल्या पुत्रांची निशाणी आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

Republic Day 2023 Wishes in Marathi
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

हे ही वाचा<< Republic Day 2023: WhatsApp वर असे डाउनलोड करा प्रजासत्ताक दिनाचे स्टिकर्स, जाणून घ्या काय आहे प्रोसेस?

वर दिलेली शुभेच्छापत्र आपण फ्री डाउनलोड करून आपल्या सोशल मीडिया पेजवर शेअर करू शकता. आपल्या सर्वांना ७४ व्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!