Happy Republic Day 2024 Wishes and Messages : दरवर्षी आपण २६ जानेवारी हा प्रजासत्ताक दिन राष्ट्रीय सण म्हणून साजरा करतो. याच दिवशी २६ जानेवारी १९५० रोजी संविधान देशात अंमलात आले होते. हा दिवस संपूर्ण राष्ट्रासाठी अभिमानाचा दिवस असतो. या दिवशी विविध ठिकाणी उत्सव साजरा केला जातो. शाळा, कॉलेज आणि इतर अनेक ठिकाणी ध्वजारोहण केले जाते. या दिवशी प्रत्येक देशवासी एकमेकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतात. सध्या सोशल मीडियाचा वापर वाढल्यामुळे अनेक जण मेसेज वरून शुभेच्छा पाठवतात. आज आम्ही तु्म्हाला प्रजासत्ताक दिनाच्या काही हटके शुभेच्छांची लिस्ट सांगणार आहोत.
१. रंग बलिदानाचा, रंग शांततेचा, रंग मातीच्या नात्याचा, हाच खरा उत्सव लोकशाहीचा…प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा.
२. वीरांच्या बलिदानाची ही कहाणी आहे,
वीरगती मिळालेल्या पुत्रांची निशाणी आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
३. देशाने तुमच्यासाठी काय केले हे विचारण्यापेक्षा तुम्ही देशासाठी काय करत आहात, हे स्वत:ला विचारा… प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
४. ना हिंदू, ना मुस्लीम फक्त माणूस बना माणूस. वंदे मातरम, प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा.
५. तुमच्या मनात तिरंगा असेल तर तुम्हाला कशाचीही भीती नाही. एक देशा, भारत देशा…प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा.
६. स्वर्गाहुनी प्रिय आम्हाला अमुचा सुंदर देश ..आम्ही सारे एक. .. जरी नाना जाती नाना वेष…
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
हेही वाचा : रामतीर्थम ते रामप्पा मंदिर, भारतातील कमी प्रसिद्ध असलेल्या प्रभू रामाच्या ७ मंदिरांना द्या भेट!
७. सैनिकांच्या जोशामुळे लहरतोय हा तिरंगा..
सैनिकांचा आहे आम्हाला अभिमान
प्रजासत्ताक दिनी गातोय आम्ही त्यांचे गुणगान..
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा.
८. देश सर्वांपुढे मोठा आहे.. या देशासाठी लढणाऱ्या त्या शुर वीरांना शत् शत् प्रणाम…
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
९.बलसागर भारत होवो,
विश्वात शोभुनी राहो
हे कंकण करि बांधियले,
जनसेवे जीवन दिधले
राष्ट्रार्थ प्राण हे उरले,
मी सिद्ध मरायाला हो
बलसागर भारत होवो…
प्रजासत्ताक दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा!
१०. हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
आ-चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे
प्रजासत्ताक दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा!