Tulsi Vivah 2024 Wishes Quotes Messages : दिवाळीनंतर अनेकांना वेध लागतात ते तुळशीच्या लग्नाचे. कारण यानंतर दिवाळी सण संपन्न होत लग्नसराईला सुरुवात होते. या सणाला केवळ धार्मिक महत्त्वच नाही तर निसर्गाशी त्याचा संबंध आहे. दिवाळीनंतरच्या पहिल्या एकादशीला तुळशीची पूजा केली जाते. हा दिवस तुळशी विवाह म्हणून साजरा केला जातो. यंदा १३ नोव्हेंबरला तुळशी विवाह साजरा केला जाईल. तुळशी विवाहाच्या दिवशी भगवान विष्णू, भगवान शालिग्राम आणि माता तुळशीची पूजा केल्याने जीवनात सुख-समृद्धी येते असेही मानले जाते.
यंदा तुळशी विवाहनिमित्त तुम्ही आपल्या मित्र-परिवारास खास शुभेच्छा देऊ शकता. हे तुळशी विवाह संदेश तुम्ही Messages, Wishes, Whatsapp Status, SMS द्वारे पाठवून त्यांचा हा सण आनंदी करू शकता.
तुळशी विवाह शुभेच्छा | Tulsi Vivah Wishes In Marathi
१) आनंदाचे, मांगल्याचे पावन पर्व तुळशी विवाहाचे
तुळशी विवाहाच्या मंगलमयी शुभेच्छा!
२) ज्या अंगणात तुळस आहे,
तिथे देवी-देवतांचा वास आहे,
ज्या घरात ही तुळस आहे
ते घर स्वर्गासमान आहे,
तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!
३) तुळशीचे पान
एक त्रैलोक्य समान,
उठोनिया प्रात: काली
करुया तिला वंदन
आणि राखूया तिचा मान
तुलसी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!
४) सण आनंदाचा, सण मांगल्याचा
सण सौख्याचा सण तुळशी विवाह पर्वाचा
तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!
५) अंगणात तुळस आणि शिखरावर कळस हीच आहे महाराष्ट्राची ओळख…
कपाळी कुंकू आणि डोक्यावर पदर, हीच आहे सौभाग्याची ओळख…
तुळशी विवाहनिमित्त मंगलमय शुभेच्छा!
६) हळद लागली, तुळस सजली
विवाहासाठी तयार झाली,
तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!
७) चला वाटूया पेढे आणि गाऊया
मंगलमयी मंगलाष्टके
कारण आज आहे आपल्या
लाडक्या तुळशीचे लग्न
तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!
८) तुळशीचे पान, एक त्रैलोक्य समान
उठोनिया प्रात:काळी, करुया तिला वंदन अन् राखूया तिचा मान
तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!
९) ऊसाचे मांडव सजवूया आपण,
विष्णू-तुळशीचे लग्न लावूया आपण,
तुम्हीही व्हा आमच्या आनंदात सामील,
मोठ्या थाटात तुळशी विवाह करूया आपण.
तुळशीच्या लग्नाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!!