women’s day 2022 Wishes in Marathi: आंतरराष्ट्रीय महिला दिन दरवर्षी ८ मार्च रोजी साजरा केला जातो. महिलांच्या सन्मानाचा, त्यांच्या उत्कर्षाचा दिवस म्हणजे महिला दिन.प्रत्येक क्षेत्रात आज महिला पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत असून, आपल्या कर्तृत्त्वाने त्यांनी विविध क्षेत्रांत गगनभरारीही घेतली आहे. या दिवशी आवर्जून आपल्या आयुष्यातील ‘तिला’ शुभेच्छा मेसेज पाठवतोच. म्हणूनच तुमच्या नातेवाईकांना, मैत्रिणीला किंवा आयुष्यातील कोणत्याही महत्त्वाच्या महिलेला शुभेच्छा देण्यासाठी काही खास शुभेच्छा, संदेश मेसेज देत आहोत.

स्री म्हणजे अडथळ्यांवर मात,
स्त्री म्हणजे क्षणा क्षणांची साथ,
तुझ्या कतृत्वाला सर्वांचा सलाम.
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!

विधात्याच्या नवनिर्माणाची कलाकृती तू
एक दिवस साजरा कर स्वतःच्या अस्तित्वाचा तू
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

(हे ही वाचा: International Women’s Day 2022: ‘हे’ पाच गॅजेट्स ठरतील उत्तम महिला दिन गिफ्ट)

स्री म्हणजे वास्तव्य,
स्री म्हणजे मांगल्य,
स्री म्हणजे मातृत्व,
स्री म्हणजे कतृत्व
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!!

(हे ही वाचा:International Women’s Day 2022: महिला दिनी आवर्जून द्या ‘या’ सहा आर्थिक भेटवस्तू )

उत्तुंग तुझ्या भरारी पुढे

गगन हे ठेंगणे भासावे

तुझ्या विशाल पंखाखाली

अवघे विश्व वसावे

महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

(हे ही वाचा: Women’s Day 2022: गिफ्ट म्हणून ‘या’ उपयुक्त पर्यायांचा नक्की करा विचार)

आईच्या वात्सल्याला सलाम

बहिणीच्या प्रेमाला सलाम

मैत्रिणीच्या विश्वासाला सलाम

पत्नीच्या खंबीर पाठिंब्याला सलाम

माझ्या आयुष्यातील प्रत्येक स्त्री शक्तीला सलाम

महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रतिभेला तुझ्या नवे पंख मिळू दे

स्वप्नांना तुझ्या नवी क्षितिजं लाभू दे

महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

“तिला भिती वाटत नाही म्हणून ती खंबीर नाही ,
तर ती भयापुढेही नमत नाही म्हणून ती शक्तीशाली आहे.”

Happy Women’s Day

“आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू झाशीची राणी,
मावळ्यांची भवानी तू,
प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू,
आजच्या युगाची प्रगती तू…”
Happy Women’s Day!!

(मेसेज क्रेडीट: सोशल मीडिया)

Story img Loader