House Flies Home Remedies: पावसाळ्यात पाऊस जसा येतो त्यासोबत माशा देखील येतात. पावसाळा ऋतूत माशांचा वावर जास्त झालेला पाहायला मिळतो. आपण जर पावसाचा आनंद घेण्यासाठी बाल्कनीत बसलो तर तिथेही बिनबोभाट माशा गुंजायला लागतात. त्यानंतर मात्र मूड खराब होऊन जातो. स्वयंपाक घरात देखील या माशांचा वावर इतका असतो की, फळांपासून ते अन्नावर या माशा वरती फिरताना दिसतात. या माशा घालविण्यासाठी आपण केमिकल स्प्रे वैगरे वापरतो. मात्र, त्याचा हवा तसा फायदा होत नाही आणि या माशा पुन्हा घरात आलेल्या दिसतात. जर तुमच्या घरात देखील माशा असतील आणि त्यामुळे तुम्ही कंटाळले असाल, तर आज आम्ही तुम्हाला असे काही घरगुती उपाय सांगणार आहोत. की ज्याचा अवलंब करून तुम्ही या माशांपासून सुटका मिळवू शकता. जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माशांपासून सुटका करण्यासाठी घरगुती उपाय

मीठ पाणी

एका ग्लास पाण्यात २ चमचे मीठ चांगले मिसळा आणि स्प्रे बाटलीत भरून माशांवर शिंपडा. माशीपासून मुक्त होण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. मिठाच्या पाण्याने माशा लवकर पळतील सुद्धा आणि त्यांचा पुन्हा त्रास होणार नाही.

( हे ही वाचा: घरात उंदरांचा वावर जास्त झालाय?; ‘या’ घरगुती उपायांनी सुटका मिळू शकते)

पुदिना आणि तुळस

माश्या दूर करण्यासाठी पुदिना आणि तुळस यांची पेस्ट बनवा आणि पाण्यात मिसळून स्प्रे तयार करा आणि माशांवर शिंपडा. हे कीटकनाशकासारखे परिणाम दर्शवते. बाहेरील केमिकल स्प्रे पेक्षा हे एक स्वस्त आणि प्रभावी असा उपाय आहे.

दूध आणि काळी मिरी

हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम एका ग्लास दुधात एक चमचा काळी मिरी आणि ३ चमचे साखर मिसळा आणि जिथे माश्या जास्त येतात अशा ठिकाणी ठेवा. माश्या त्याकडे आकर्षित होतील आणि या दुधात बुडून मरतात.

( हे ही वाचा: पावसाळ्यात डेंग्यू-मलेरिया झपाट्याने पसरतो; अशाप्रकारे काळजी घ्या)

व्हीनस फ्लायट्रॅप वनस्पती

व्हीनस फ्लायट्रॅप ही एक प्रकारची मांसाहारी वनस्पती आहे जी कीटक आणि किडे खातात. हे रोप तुम्ही घराच्या बाहेर किंवा आत कोणत्याही कोपऱ्यात लावू शकता. त्यावर माशी बसताच ती त्यात अडकते. हा एक सोपा घरगुती उपाय म्हणता येईल.