बर्‍याच लोकांना गोड खाण्याची इतकी वाईट सवय असते की, त्यांना दिवसभरा मधून काही गोड पदार्थांची गरज भासते.आरोग्य तज्ज्ञांच्या मते, तुम्ही जेवढी साखर खाता, तेवढी गोड खाण्याची तुमची इच्छा वाढते. आपल्या आरोग्यासाठी साखर अत्यंत हानिकारक आहे. लठ्ठपणा आणि मधुमेह व्यतिरिक्त, हे इतर अनेक रोगांची शक्यता वाढवतात. त्यातच एक चांगली गोष्ट अशी आहे की ही वाईट सवय तुम्ही काही विशेष पद्धतींनी १० दिवसात नियंत्रित केले जाऊ शकते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्वतःशी करा निर्धार

सगळ्यात आधी तुम्ही स्वत: ला वचन द्या की, तुम्ही तुमच्या गोड खाण्याच्या सवयीवर खरोखरच नियंत्रण कराल आणि पुढील १० दिवसांत तुमचे शरीर डिटॉक्स कराल. तुम्ही जर १० दिवसात कमी गोड खाल्लात तर लवकरच या बदलावाचा परिणाम तुमच्या शरीरावरच नव्हे तर तुमच्या मनावरही होऊ लागेल.

या गोष्टींपासून दूर रहा

तुम्ही मैदा, आर्टिफिशयल तयार केलेले गोड पदार्थ, हायड्रोजनयुक्त फॅट्स आणि पॅकयुक्त पदार्थांपासून दूर रहा. तसेच तुम्ही बिना साखरेचा चहा आणि कॉफी दररोज प्या. हिरव्या भाज्यांच्या रस व्यतिरिक्त इतर कोणताही रस पिऊ नका. विशेषतः बाजारात उपलब्ध असलेल्या पेयांना विसरूनही स्पर्श करू नका.

आहारात प्रथिनांची मात्रा वाढवा

तुमच्या न्याहारी, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण यामध्ये प्रथिनांचे प्रमाण वाढवा. तसेच अंडी, शेंगदाणे, बियाणे, मासे, चिकन, मांस, सोया दूध आणि ओटमीलचा आहारात समावेश करा. तुम्ही या प्रथिनेयुक्त अन्न खाल्ल्याने शरीराला आतून ऊर्जा मिळते.

योग्य कार्बोहायड्रेट्स खा

तुम्ही तुमच्या आहारात शतावरी, हिरव्या बीन्स, मशरूम, कांदे, स्क्वॅश, टोमॅटो, बडीशेप, एग्प्लान्ट आणि शिमला मिर्च सारख्या स्टार्च नसलेल्या गोष्टींचा समावेश करा. प्रत्येक आहारातून चांगले फॅट घेण्याचा प्रयत्न करा. ओमेगा -3 फॅटी एसिड जसे की नट, सिड्स, आणि मासे जास्त प्रमाणात खा. ग्लूटेन आणि दुग्धजन्य पदार्थ खाणे टाळा.

जास्त तणावात राहू नका

जेव्हा तुम्ही तणावाखाली असता तेव्हा तुमचे कोर्टिसोल वाढते. याला स्ट्रेस हार्मोन असेही म्हणतात. या संप्रेरकामुळे भूक वाढते आणि अशा परिस्थितीत ज्यांना गोड खायला आवडतात. ते तणावाखाली असल्यास फक्त साखरयुक्त गोष्टी खायला बघतात. त्यामुळे गोड खाणे टाळण्याकरिता तुम्ही चांगली आणि पूर्ण झोप घ्या. ८ तासांपेक्षा कमी झोपल्याने जास्त कॅलरी खाण्याची इच्छा वाढते.

या सर्व गोष्टींचे पालन केल्यास तुम्ही नक्की १० दिवसातच अति गोड खाण्याची सवय तुटेल.

(टीप:- वरील टिप्सचा वापर करताना तुमच्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Have a bad habit of eating too many sweets and reduce the habit of eating sweets in 10 days scsm