१४ नोव्हेंबर या ‘जागतिक मधुमेह दिना’निमित्त याविषयी गेल्या अनेक वर्षांपासून जनजागृती करण्यात येत आहे.आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी डॉक्टर आणि आहारतज्ज्ञ आपल्याला रोज ताजी फळे खाण्याचा सल्ला देतात. मात्र, मधुमेहाच्या व्यक्तींना त्यांच्या डाएटवर विशेष लक्ष द्यावे लागते आणि आरोग्याची काळजी घ्यावी लागते. कारण चुकीचं खानपान आपलं स्वास्थ्य व्यक्तींच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढवू किंवा इन्सुलिनवर परिणाम करु शकतो. म्हणूनच की काय, मधुमेह रुग्णांची संख्या भारतात एवढ्या वेगाने वाढत आहे की, आता भारत मधुमेह्यांचे ‘हब’ बनत चालला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यामुळं त्यावर एकच उपाय ‘हेल्दी डायट’. मधुमेहात ‘ही’ फळं आरोग्यासाठी धोकादायक आहेत. चला तर जाणून घेऊया. मधुमेहाच्या रुग्णांसाठी फळं खाणे सुरक्षित आहे की नाही…

सन २०२१ च्या आंतरराष्ट्रीय मधुमेह महासंघाच्या अहवालानुसार, भारतातील ७४ दशलक्षाहून अधिक प्रौढ लोक मधुमेह ग्रस्त आहे. ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च – इंडिया डायबिटीज’ यांनी १५ राज्यांमध्ये केलेल्या अभ्यासावर आधारित, पूर्व – मधुमेहाचे प्रमाण १०.३ टक्के आणि मधुमेह ७.३ टक्के होते. मधुमेहाचे व्यवस्थापन करण्याकडे केलेले दुर्लक्ष यामुळे अवघ्या २५ ते ३५ वर्षे वयोगटातील युवापिढी तसेच ‘टाइप-१’ या मधुमेहाच्या व्याधीत किशोरवयीन आणि लहान मुले सापडलेली आहेत. मुलांच्या वाढत्या लठ्ठपणामुळे झपाट्याने वाढ होत आहे. ‘लठ्ठपणा’, ‘बदलती जीवनशैली’ आणि ‘आनुवंशिकता’ या तीन कारणांमुळेच मधुमेह दिवसेंदिवस वाढत आहे. ही आकडेवारी लक्षात घेता नागरिकांनमध्ये मधुमेहाबाबत अज्ञान लक्षात आले. त्यावर जनजागृती हा एकमेव उपाय डॉक्टरांनी सुचविला.

kama Hospital study shows increased diabetes prevalence in pregnant women due to changing lifestyles
गर्भधारणेच्या वेळी महिलांना मधुमेहाचा धोका
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Bad weather in Mumbai Measures against pollution Mumbai print news
मुंबईत निवडणुकीपर्यंत प्रदूषणाचा त्रास; मनुष्यबळाअभावी पालिकेची यंत्रणा हतबल
stomach cancer marathi news
पोटदुखीकडे करू नका दुर्लक्ष!
Carrot is beneficial for body how to make gajar ki kanji recipe in marathi
हिवाळ्यात सगळ्यात भारी, निरोगी, आणि चवदार गाजर कांजी! पिढ्यानपिढ्या बनवली जाणारी खास रेसिपी
what is the reason that Sea fish became expensive
मासे परवडत नाहीत, मत्स्याहारींनी करायचे तरी काय?
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?

मधुमेहात ‘ही’ ५ फळं खाणे टाळा!

माणसाला निरोगी ठेवण्यात फळांचा मोठा वाटा असतो. फळांमध्ये असलेले फायबर पचनशक्ती वाढवून व्यक्तीला अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करते. असे असूनही, मधुमेह असलेल्या व्यक्तीने स्वत:साठी फळे निवडताना काही विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. चला जाणून घेऊया कोणती फळे आहेत, जी मधुमेहाच्या रुग्णांनी खाऊ नयेत.

आणखी वाचा : Fertility Diet: महिलांनी प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी आहारात करा ‘या’ सुपरफूड्सचा समावेश

१. चेरी नकोत

चेरी खायला अनेकांना आवडतात, म्हणून ती आईस्क्रीम आणि केकमध्ये जास्त वापरली जातात. पण, अनेकांना माहीत नाही की, एक कप चेरीमध्ये सुमारे २० ग्रॅम साखर असते. त्यामुळे साखर असलेल्या रुग्णांनी-मधुमेही रुग्णांनी चेरी खाणे टाळावे.

२. आंबा टाळा

साखरेच्या रुग्णांना गोड पदार्थ खाण्यास मनाई आहे किंवा खाणे टाळण्यास सांगितले जाते. मधुमेहाच्या रुग्णाने आंब्याचे सेवन करू नये, कारण एक कप आंब्यामध्ये सुमारे २३ ग्रॅम साखर असते, त्यामुळे हे फळ मधुमेहींसाठी त्रासदायक ठरू शकते.

३. अननस टाळा

अननसात साखरेचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे मधुमेही रुग्णांना अननसाचा ज्युस पिण्यास मनाई आहे. एक कप अननसाच्या रसामध्ये १४ ग्रॅम साखर असते, त्यामुळे ते टाळले पाहिजे. फार थोड्या प्रमाणात अननस खाऊ शकता, ज्युस नकोच.

४. टरबूज

टरबूज खाण्यास स्वादिष्ट तर लागतेच शिवाय शरीरातील पाण्याची कमतरताही पूर्ण करते. आरोग्यासाठी फायदेशीर असूनही मधुमेहींनी टरबूज खाणे टाळावे. हे रक्तातील साखरेची पातळी वाढवण्याचे काम करते. मधुमेहाच्या रुग्णांनी टरबूज खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.

५. केळी

मधुमेहाच्या रुग्णांसाठी केळी देखील हानिकारक ठरू शकते. त्यात साखर आणि कर्बोदकांचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे रक्तातील साखर वाढू शकते. त्यामुळे मधुमेहामध्ये केळीचे सेवन टाळावे.

अश्याप्रकारे आपण फळांची निवड करतांना वरिल ५ फळं खाण्यात टाळली तर नक्कीच आपल्या प्रकृतीला याचा फायदा होऊ शकतो.