गाजर केवळ लाल किंवा केशरी नसून काळ्या किंवा जांभळ्या रंगाचेही असते. काळ्या गाजरला देशी गाजर असेही म्हणतात आणि ते शरिरासाठी खूप फायदेशीर आहे. जांभळ्या गाजरांची चव केशरी गाजरांपेक्षा चांगली असते. याशिवाय त्याचा गोडवाही चांगला आहे. काळे गाजर खाल्ल्यानंतर बराच वेळ तोंडात त्याची छान चव राहते.

गाजर ही अतिशय पौष्टिक भाजी मानली जाते. केशरी, लाल आणि जांभळ्या गाजरांचे अनेक प्रकार आहेत. पण जांभळे गाजर हे सर्व गाजरांमध्ये सर्वात पौष्टिक मानले जाते. जांभळ्या गाजरांमध्ये भरपूर जीवनसत्त्वे असतात. विशेषत: कमी दृष्टीचा त्रास असलेल्यांसाठी जांभळे गाजर वरदान आहे. जांभळ्या गाजरमध्ये अनेक प्रकारचे पौष्टिक घटक असतात जे संपूर्ण शरीराला डिटॉक्स करण्याचे काम करतात.

Nisargalipi Fascinating World of Aquatic Plants
निसर्गलिपी : पाणवनस्पतींची मोहक दुनिया
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
Pune, respiratory disorders, humidity, asthma, allergies, fungal growth, health experts, Sassoon Hospital, health news
पावसाळ्यातील ओलसर हवेमुळे आजारांना निमंत्रण! जाणून घ्या कशी घ्यावी काळजी…
Weight Lose Tips
झटपट वजन कमी करायचंय? सकाळी उठल्या-उठल्या करा ‘या’ ५ गोष्टी; महिनाभरात कमी होईल वजन, दिसाल फिट
benefits of alu during monsoon season
Health Special: पावसाळ्यातला अळू किती पोषक?
boiled water during monsoon
Health Special: पावसाळ्यात कढवून आटवलेले पाणीच का प्यावे?
Sitopaladi benefits uses for cold and cough Ayurveda herb monsoon viral illness
पावसाळ्यात सर्दी-खोकल्यामुळे वैतागला आहात? सितोपलादी ठरतेय प्रभावी, जाणून घ्या या आयुर्वेदिक औषधाचे फायदे
food inflation india
देशात अन्नधान्याच्या किमती कमी होणार? कोणते घटक निर्णायक ठरणार?

गाजरात मुबलक प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात जे शरीरातील जळजळ आणि वेदना कमी करण्यास मदत करतात. जांभळे गाजर रक्त शुद्ध करण्याचे काम करते. याशिवाय यामध्ये फायबर, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, मँगनीज, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन बी आणि इतर अनेक घटक असतात. पोषणतज्ञ प्रिया भरमा यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना यासंर्भात सविस्तर माहिती दिली आहे.

जांभळ्या गाजरचे फायदे

शरीर डिटॉक्स करते

हेल्थलाइनच्या अहवालानुसार, जांभळ्या गाजरांमध्ये पॉलीफेनॉल अँटीऑक्सिडंट असते.जे शरीरातील विष काढून टाकण्याचे काम करते.

हृदयासाठी फायदेशीर

या गाजराच्या सेवनानं सांधेदुखी आणि हृदयाच्या स्नायूंची सूज कमी होते. जांभळे गाजर हृदयासाठी फायदेशीर आहे.

पोटाच्या आजारात फायदेशीर

पोटाच्या अनेक आजारांनी त्रस्त असलेल्या लोकांनी जांभळे गाजर खावे. कोलायटिसच्या रुग्णांना सूज येते. त्यामुळे त्यांनी जांभळे गाजर खावेत.

हेही वाचा >> Tulsi Face Pack: पिंपल्स, काळया डागांनी चेहरा खराब दिसतोय? तुळशीच्या पानांचे हे ४ फेसमास्क वापरा

कर्करोग विरोधी गुणधर्म

जांभळ्या रंगाच्या गाजरांमध्ये कर्करोगविरोधी गुणधर्म असतात. संशोधनात असे आढळून आले आहे की, जांभळ्या रंगाचे गाजर स्तन, यकृत, त्वचा, रक्ताच्या कर्करोगावर खूप फायदेशीर आहेत.

पचनासाठी फायदेशीर

काळ्या गाजरामध्ये भरपूर फायबर असतात, ज्यामुळे पाचन तंत्राला चालना मिळते. काळे गाजर बद्धकोष्ठता, गॅस, पोट फुगणे, छातीत जळजळ, अस्वस्थता, अतिसार यांसारखे आजार बरे करते.