Backward Walking Benefits : चालणे आपल्या आरोग्यासाठी चांगले असते, हे तु्म्हाला माहिती असेल. त्यामुळे नियमित १० हजार पावले चालावीत, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो पण तुम्ही कधी उलट चालण्याचा प्रयत्न केला आहे का? तुम्हाला उलट चालण्यामुळे कोणता फायदा होतो. तुम्हाला माहिती आहे का उलट चालण्यामुळे फक्त एक नाही तर अनेक फायदे होतात. योग अभ्यासक मृणालिनी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन उलट चालण्याचे फायदे सांगितले आहे. आज आपण त्याविषयीच सविस्तर जाणून घेऊ या.
योग मृणालिनी यांनी त्यांच्या व्हिडीओमध्ये उलट कसे चालायचे, हे सांगितले आहे. त्याचबरोबर या व्हिडीओमध्ये उलट चालण्याचे फायदे सुद्धा सांगितले आहे. हे फायदे पुढील प्रमाणे –
१.गुडघे व पायाच्या मागच्या स्नायूंची लवचिकता वाढते.
२. शरीराचा तोल आणि संतुलन सुधारण्यास मदत होते.
३. पाठदुखी आणि कंबरदुखीवर फायदेशीर ठरते.
४. लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते.
५. शरीराबद्दल अधिक जागरुकता निर्माण होते.
yogamarathi_ या त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन मृणालिनी यांनी हा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “सरळ चालण्याबरोबरच उलट चालल्याने आपल्या शरीर व मनाला अधिक फायदे मिळतात यामुळे आपले मन आणि शरीर यांच्यात चांगले संतुलन निर्माण होते.परंतु उलट चालताना खड्डे, माणसे, प्राणी किंवा इतर वस्तू, वाहने मागे नाहीत याची काळजी घ्या. ज्यांना शरीर असंतुलनाची समस्या, पडण्याची अतीव भीती, चक्कर किंवा व्हर्टिगोचा त्रास आहे त्यांनी मदतीशिवाय उलट चालण्याचा प्रयत्न करू नये.”
हेही वाचा : Breast Cancer : स्तनाच्या कर्करोगाविषयी हे आठ गैरसमज तुम्हालाही आहेत का? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात…
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “आम्ही उद्यापासून उलट चालण्याचा प्रयत्न करणार” तर एका युजरने लिहिलेय, “खरंच उलट चालण्याचा खूप फायदा होतो.” आणखी एका युजरने लिहिलेय, “पायातले टाचे आणि पंज्यावर उलट चाला” अनेक युजर्सनी हा व्हिडीओ खूप आवडला आहे. काही युजर्सनी अशीच नवनवीन माहिती देण्याची विनंती योग अभ्यासक मृणालिनी यांना केली आहे.