ट्रॅव्हल मॅगझिन कॉन्ड्यूटने २०२१ च्या रीडर्स चॉईस अवॉर्ड्सची यादी जाहीर केली आहे. यामध्ये आशिया आणि भारतासह अनेक देशांतील सर्वोत्तम हॉटेल्स आणि रिसॉर्ट्सची नावे या यादीमध्ये जाहीर करण्यात आली आहेत. चला जाणून घेऊया भारतातील सर्वोत्तम हॉटेल्सच्या यादीमध्ये कोणत्या हॉटेल्सचा समावेश आहे.
या यादीमध्ये जयपूरचा रामगड पॅलेस या यादीत ९३.४६ स्कोअरसह दहाव्या स्थानावर आहे. हे हॉटेल दिसायला एखाद्या राजा-महाराजांच्या हवेलीसारखे दिसते. आलिशान खोल्यांशिवाय, शाही अतिथीगृहे आणि उत्कृष्ट लॉजेस देखील आहेत. जयपूरमधील लग्नाचे ठिकाण आणि व्यावसायिक कार्यक्रमांसाठी हे सर्वात मस्त ठिकाण आहे. त्यांच्या या हॉटेलच्या गार्डन व्ह्यू रूममध्ये रात्रीच्या मुक्कामाचे भाडे सुमारे ३१,००० रुपयांपासून सुरू होते.
उदयपूरच्या ओबेरॉय-उदयविलासला या हॉटेलचे यादीत नववे स्थान मिळाले आहे. या रॉयल क्लास हॉटेलचा स्कोअर ९५.०७ आहे. हे हॉटेल पिचोला तलावाच्या काठावर बांधलेले असून त्यांचे ३० एकर पर्यंत पसरलेले हिरवेगार परिसर, लक्झरी स्विमिंग पूल, स्पा आणि सुंदर लेक व्ह्यू हे हॉटेलच्या सौंदर्यात भर घालतात. या हॉटेलच्या प्रीमियम रूममध्ये एका रात्रीच्या मुक्कामाचे भाडे सुमारे ३३,००० रुपये आहे.
मुंबईतील ताज पॅलेस हे हॉटेल यादीत आठव्या स्थानावर आहे. ज्याचा स्कोअर ९६.६८ आहे. हॉटेलमध्ये ९ प्रतिष्ठित रेस्टॉरंट्स आणि बार आहेत. या हॉटेलच्या आलिशान खोल्यांमध्ये तुम्हाला अद्भुत असे समुद्री दृश्य दाखवण्यात आले आहेत. त्यांच्या या खोल्यांमध्ये राहिल्यानंतर तुम्हाला त्यांच्या लक्झरी क्लासचा अंदाज येईल. या हॉटेलमध्ये एका रात्रीच्या मुक्कामासाठी तुम्हाला किमान १६,००० रुपये द्यावे लागतील.
प्रसिद्ध हॉटेल्सच्या यादीत दिल्लीच्या ताज पॅलेसचेही नाव आहे. ताज पॅलेसचा स्कोअर ९८.०६ आहे. या हॉटेलच्या सुपर लक्झरी डायनिंग व्यतिरिक्त तुम्हाला येथे राहण्यासाठी सर्व सुविधांनी सुसज्ज सुपीरियर, डिलक्स आणि लक्झरी रूम मिळतील. या हॉटेलमध्ये एक रात्रीच्या मुक्कामाचे भाडे सुमारे ६,००० रुपये आहे.
सहाव्या स्थानावर जैसलमेरचे सूर्यगढ हॉटेल आहे. या हॉटेलचा स्कोअर यादीत ९८.२९ देण्यात आला आहे. सूर्यगढ हॉटेल त्यांच्या अनोख्या इमारतीमुळे खूप प्रसिद्ध आहे. हे हॉटेल डेस्टिनेशन वेडिंगच्या बाबतीतही देशात आणि जगात प्रसिद्ध आहे. किल्ल्याप्रमाणे बांधलेल्या सूर्यगढ या हॉटेलने अनेक सेलिब्रिटींचे स्वागत केले आहे. हॉटेलमध्ये एका रात्रीच्या मुक्कामाचे भाडे १२,५०० रुपये आहे.
जयपूरच्या राजमहाल पॅलेस रासला यादीत पाचवे स्थान मिळाले आहे. या हॉटेलचा स्कोअर ९८.२९ आहे. या हॉटेलच्या आलिशान खोल्या, सुंदर बाग आणि शाही पद्धतीने तयार केलेलं स्विमिंग पूल हे या हॉटेलची खाशीयत आहे. या रॉयल क्लास हॉटेलमध्ये एका दिवसाच्या मुक्कामाचे भाडे सुमारे ४५,००० रुपये आहे.
दिल्लीचे लोधी हॉटेल यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. एका पॉश ठिकाणी स्थित, या हॉटेलचा स्कोअर ९८.३२ आहे. लोधी गार्डन जवळ बांधलेले हे हॉटेल त्याच्या आलिशान मालमत्तेसाठी खूप प्रसिद्ध आहे. येथे तुम्हाला शहरातील सर्वोत्तम डायनिंग सीन पाहायला मिळतील. या हॉटेलमध्ये एका रात्रीच्या मुक्कामाचे सुरुवातीचे भाडे सुमारे १५,००० रुपये आहे.
दिल्लीतील ओबेरॉय हॉटेल या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. ओबेरॉय हॉटेल ९८.४१ च्या स्कोअरसह भारतातील तिसरे सर्वात आलिशान हॉटेल बनले आहे. या प्रसिद्ध हॉटेलमध्ये लक्झरी रूम, सुंदर बागांसह अनेक विशेष सुविधा उपलब्ध आहेत. त्यांच्या प्रीमियम रूममध्ये एका दिवसाच्या मुक्कामाचे भाडे सुमारे २१,००० रुपये आहे.
दुसऱ्या स्थानावर उदयपूर (राजस्थान) मधील ताज लेक पॅलेस हॉटेल आहे. हे हॉटेल ९८.४१ च्या स्कोअरसह दुसऱ्या स्थानावर आहे. उदयपूरचे हे शाही हॉटेल एका तलावाच्या मध्यभागी बांधले गेले आहे. या हॉटेलचे पॅलेस, लक्झरी आणि रॉयल बेडरूममध्ये सरोवराचे अद्भुत दृश्ये पाहायला मिळतील. या हॉटेलमध्ये एका दिवसाच्या मुक्कामासाठी तुम्हाला सुमारे ४०,००० रुपये मोजावे लागतील.
या यादीत नवी दिल्लीतील लीला पॅलेस अव्वल आहे. लीला पॅलेसला ९८.४१ चा स्कोअर देण्यात आला आहे. लीला पॅलेस हे हॉटेल त्यांच्या ग्रँड डिलक्स आणि प्रीमियर रूमसाठी प्रसिद्ध आहे. या हॉटेलच्या ग्रँड डिलक्स रूममध्ये एका दिवसाच्या मुक्कामाचे भाडे सुमारे ११,००० रुपये आहे.
भारतातील सर्वोत्तम हॉटेल्सच्या या यादीमध्ये ताज फतेह प्रकाश पॅलेस (उदयपूर) ११ व्या, राश जोधपूर १२ व्या, उम्मेद भवन पॅलेस (जोधपूर) १३ व्या, ओबेरॉय अमरविलास (आग्रा) १४ व्या आणि जेडब्ल्यू मॅरियट (मुंबई) १५ व्या क्रमांकावर आहे.