गोल्डन बॉय नीरज चोप्रा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. नीरज चोप्रा हा खेळांव्यतिरिक्त, टीव्ही शो, अभिनय आणि आता फॅशनच्या जगातही आपल पाऊल टाकल्याचं दिसायला लागल आहे. चर्चेत असलेला नीरज चोप्रा काही दिवसांपासून एका मॅगझीनचे फोटोशूट करताना दिसत आहे.
आता नीरजने आणखी एक नवे फोटोशूट केले आहे. त्याने ‘द मॅन’ या नवीन मॅगझीनसाठी लेटेस्ट फोटोशूट केले आहे. सूट, ट्रेंच कोट आणि स्टायलिश ग्लासेसमध्ये दिसणारा नीरज मोठ्या मॉडेल्सना टक्कर देत आहे. तर एकीकडे मॅगझीनने इंस्टाग्रामवर नीरज चोप्राचे नवीन फोटोशूट शेअर करत नीरज चोप्रा ‘हा सुपरमॉडेल आहे की सुपरस्टार?’ असे कॅप्शन दिलं आहे. तसेच ऑक्टोबर महिन्यात येणार्‍या मॅगझीनच्या कव्हर पेजवर भारताचा गोल्डन बॉय, क्रीडा क्षेत्रात प्रत्येकाच्या हृदयात स्थान निर्माण करणारा नीरज चोप्रा पाहायला मिळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी

नीरज चोप्राने या मॅगझीनच्या फोटोशूटसाठी रेमंड सूट आणि ट्रेन्चकोट घातला आहे. यासोबतच त्याने टायटन्स एज मॅकेनिकल घड्याळही घातले आहे. ह्या संपूर्ण लूकमध्ये नीरज एकदम वेगळा दिसत आहे.

याआधी नीरजने प्रसिद्ध डिझायनर रोहित बालच्या आउटफिट्समध्ये शानदार फोटोशूट केले होते. या फोटोशूटचे फोटो नीरजने त्याच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलवर शेअर केले आहेत. नीरजने अगदी पारंपारिक पोशाखात हे खास फोटोशूट केले आहे. कुर्ता आणि शेरवानीमधल्या लुकमध्ये नीरज लोकांना इम्प्रेस करत आहे. ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकल्यापासून नीरज प्रत्येकाची एक वेगळीच पसंत बनला आहे.

इंडिया टुडे स्पाइस मॅगझीनच्या कव्हर पेजसाठी नीरज चोप्राने त्याचे पहिले फोटोशूट केले. तसेच या फोटोशूटसाठी नीरज चोप्राला एडवर्ड लालरेम्पिया यांनी स्टाईल केले होते.

जांभळ्या-काळ्या रंगाच्या स्वेटशर्टमध्ये नीरजचा हा लूक लोकांना खूप आवडला.