आपल्याकडे जवळपास प्रत्येक भारतीय घरामध्ये वर्षानुवर्षे ‘कम्फर्ट फूड’ म्हणून ज्या पदार्थाकडे पाहिलं जातं तो पदार्थ आहे ‘खिचडी’. तुम्हाला अगदी झटपट होणारा आणि एखादा पौष्टिक पदार्थ बनवायचा असेल तर खिचडीपेक्षा चांगला पर्याय काय असू शकतो? तांदूळ, विविध डाळी, काही भाज्या आणि विशिष्ट मसाल्यांचा एकत्रित वापर करून पारंपारिक पद्धतीने बनवली जाणारी ही खिचडी अत्यंत एक आदर्श हेल्थी पर्याय मानला जातो. तुम्हाला माहितीच असेल कि खिचडी हा आपला राष्ट्रीय पदार्थ आहे. गरमागरम खिचडी आणि त्यावर एक चमचा तूप तुमच्या शरीराला सर्व आवश्यक पोषणतत्त्व पुरवतात. दरम्यान, आपण खिचडीच्या पारंपारिक रेसिपीसह विविध प्रयोग देखील करू शकतो. आज आम्ही तुम्हाला हेच ५ प्रकार सांगणार आहोत.

डाळ खिचडी

पारंपरिक पद्धतीने बनणाऱ्या खिचडीमध्ये तांदळासोबत कोणत्याही प्रकारची डाळ वापरणं हे पौष्टिक ठरतं. म्हणून याला दालखिचडी असंही म्हणतात. यासाठी तुम्ही तूर डाळ, मूग डाळ किंवा चणा डाळ असे कोणतेही पर्याय निवडू शकता. सर्व प्रकारच्या डाळींमध्ये प्रथिनं, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि फॅट्स सारख्या पोषक घटकांचा समावेश असतो. डाळीतील प्रथिनं ही तुमच्या पोटाला जास्त काळ तृप्त ठेवू शकतात. त्याचसोबत ते आपल्या स्नायूंच्या वाढीस मदत करतात. डाळींमध्ये असलेल्या फायबरच्या मुबलक प्रमाणामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होते. डाळ खिचडीच्या एका सर्व्हिंगमध्ये फक्त २०३ कॅलरीज असतात. मधुमेह आणि हृदयाच्या रुग्णांसाठी हा पदार्थ सर्वोत्तम मानला जातो.

Lucknow NGO helps underprivileged children make Sabyasachi-inspired clothes; the designer reacts
झोपडपट्टीतील मुला-मुलींनी तयार केला सब्यसाची-प्रेरित ब्रायडल कलेक्शन! स्वत:च मॉडेलिंग करत केले हटके फोटोशूट, पाहा Video Viral
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
black leopard maharashtra
Video: महाराष्ट्रात वाढताहेत काळे बिबट…
people perform Rangoli Art showcasing Indian culture in America
अमेरिकेत तरुणांनी काढली भारतीय संस्कृती दर्शवणारी रांगोळी; लोक पाहतच राहिले, VIDEO होतोय व्हायरल
last show of Vastra Haran in new set was held today in Thane
नव्या संचातील ‘वस्त्रहरण’चा शेवटचा प्रयोग आज ठाण्यात, नेत्यांनाही भुरळ
Puneri kaka dance video uncle aunty dance video goes viral on social media
VIDEO: पुणेकर काकांचा नाद नाय! चंद्रा गाण्यावर केला खतरनाक डान्स; नेटकरी म्हणतात “आयुष्य असं जगता आलं पाहिजे”
Marathi Actor Siddharth Chandekar Special Post share for amey wagh on his birthday
“जीभेवर व्हेज, मनात नॉनव्हेज…”, सिद्धार्थ चांदेकरने अमेय वाघला वाढदिवसाच्या दिल्या हटके शुभेच्छा; म्हणाला…

दलिया खिचडी

बल्गर गहू ज्याला भारतामध्ये सामान्यतः दलिया म्हणून ओळखलं जातं. या दलियापासून देखील खिचडी बनवली जाते. दलियामध्ये फोलेट, व्हिटॅमिन बी ६, नियासिन, तांबे, मॅंगनीज, मॅग्नेशियम आणि लोह यांसारख्या अनेक घटकांचे फायदे असतात. यात सामान्यतः कॅलरीज कमी असतात. म्हणून वजन कमी करण्यासाठी देखील हा पदार्थ अनुकूल मानला जातो. याशिवाय, दलिया हे आतड्यांतील निरोगी जीवाणूंसाठी पोषक असतं. याद्वारे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या देखील वापरू शकता.

ओट्सची खिचडी

पौष्टिक अन्नपदार्थांमधील पर्याय म्हणून तुम्हाला ओट्सची खिचडी हा पर्याय देखील नक्की आवडेल. ओट्स आणि भाज्यांपासून बनवलेला हा अत्यंत स्वादिष्ट आणि हेल्थी पदार्थ आहे. ओट्स खिचडीचा एक बाऊल तुम्हाला मुबलक प्रमाणात मॅंगनीज, प्रथिनं, फायबर, फॉस्फरस आणि लोह यांसारख्या घटकांपासून फायदे मिळवून देऊ शकतो. तर ओट्समध्ये कॅलरीज आणि फॅट्स देखील कमी असतात. त्यामुळे, आपलं वजन कमी करण्यासाठी लोक सर्रास ओट्स खाताना दिसतात.

मक्याची खिचडी

काही मसाले आणि डाळींसह मका वापरून देखील तुम्ही स्वादिष्ट खिचडी बनवू शकता. मुबलक प्रमाणात फायबर असलेले पदार्थ तुमचं पोट व्यवस्थित भरतात. त्यामुळे, दिवसभर सतत होणारी भुकेची जाणीव किंवा सतत काहीतरी खात राहण्याची होतं नाही. त्यात प्रथिनांचं प्रमाण १० ते १५ टक्के असतं. मॅंगनीज, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि झिंक यांसारख्या पोषक घटकांचा यात समावेश असतो. मक्याच्या नियमित सेवनाने डोळ्यांचं आरोग्य देखील उत्तम राहतं. त्याचसोबाबत यामुळे हृदयाचं आरोग्य देखील सुधारू शकते. जर तुम्हाला तुमची मक्याची खिचडी आणखी अधिक पौष्टिक बनवायची असेल तर तुम्ही त्यात गाजर, मटार आणि बीन्स असे काही पर्याय ट्राय करू शकता.

बाजरीची खिचडी

राजस्थानमध्ये बाजरीची खिचडी देखील खूप लोकप्रिय आहे. या प्रकारच्या बाजरीमध्ये प्रथिनं, फायबर, मॅग्नेशियम, लोह आणि कॅल्शियमसारखे विविध पोषक घटक असतात. या पदार्थामध्ये अपवादात्मकपणे कॅलरीजचं प्रमाण कमी आणि फायबरचं प्रमाण जास्त असतं. ज्यामुळे हा पदार्थ वजन कमी करण्यास अनुकूल ठरतो. बाजरीच्या खिचडीचा एक बाऊल हा तुमच्या पोटाला जास्त काळ तृप्त ठेवू शकतो. तुमची रोजची कॅलरी कमी करू शकतो. बाजरीच्या दररोज केल्या जाणाऱ्या सेवनाने टाइप २ मधुमेह, अनेक प्रकारचे कर्करोग होण्याचा धोका कमी होतो.