उन्हाळा गेल्यानंतर एकदा काय पावसाळा सुरु झाला की सगळ्यांना आनंद होतो. परंतु याच वेळी अनेक समस्या देखील निर्माण होतात. कारण ओलाव्यामुळे अनेक आजार पसरू लागतात. पावसाळ्यात अनेकांना फूड पॉइजन, अतिसार, संसर्ग, सर्दी आणि ताप सारखे अनेक आजार होतात. त्यात भर म्हणजे करोना संसर्गामुळे जास्त भीती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत कोणते पदार्थ खाल्ले पाहिजे ज्यामुळे आपली रोग प्रतिकारशक्ती वाढेल हे माहित असणे महत्वाचे आहे. आज आपण पावसाळ्यात कोणत्या पदार्थांचे सेवन केले पाहिजे जेणे करून पावसाळ्यात होणाऱ्या आजारांपासून संरक्षण होईल ते जाणून घेऊया…
हळदीचे दूध
हळद स्वयंपाकघरातील सगळ्यात महत्वाच्या मसाल्यांपैकी एक आहे. हळदीचे सेवन केल्याने नैसर्गिकरित्या आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते. हळदीचा उपयोग आपण डाळीत आणि भाजीत करतो. परंतु झोपण्यापूर्वी तुम्ही दररोज हळदीचे दूध प्यायला हवे. हळदीत एंटीसेप्टिक, अँटीवायरल, अँटीफंगल, अँटीबैक्टीरियल, अँटी-मायक्रोबियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत.
लिंबूचा रस
लिंबात व्हिटॅमिन सीचे प्रमाण जास्त आहे. एवढंच नाही तर लिंबूच्या रसाचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. लिंबूच्या पदार्थांचे सेवन केल्याने अन्न पचनास मदत होते. याशिवाय लिंबाचे सेवन केल्यास आपली हाडे मजबूत होतात. डाळ, कोशिंबीर किंवा भाज्यांमध्ये लिंबाचा रस घालून त्याचे सेवन करा.
आणखी वाचा : पीठ मळताना ही ट्रीक नक्की वापरा, पोळी फुलल्याशिवाय राहणार नाही
चहा
आले, लवंग, दालचिनी, वेलची, तुळशीची पाने आणि काळी मिरीसारख्या मसाल्याची चहा तुमची रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. या सगळ्याचा वापर करून तयार केलेल्या चहामुळे नैसर्गिक पद्धतीने रोग प्रतिकारशक्ती वाढते. वेलची आणि लवंगमुळे बऱ्याच आजारांपासून आपले संरक्षण होते. काळी मिरीचे सेवन केले तर आपले सर्दी आणि तापपासून संरक्षण होते.
सुका मेवा
खजूर, अक्रोड आणि बदामचे सेवन केल्याचा फायदा होतो. कारण यामध्ये व्हिटॅमिन्सचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते.
आणखी वाचा : किसून की ठेचून? आल्याची कडक चहा बनवण्याची योग्य पद्धत
लसूण
लसूण खाल्याचे बरेच फायदे आहेत. लसूणचे सेवन केल्याने सर्दी-तापापासून आपले संरक्षण होते. यासोबत आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते. एका संशोधनात समोर आले आहे की, दररोज लसूण खाल्याने आपल्या शरीरात टी-सेल्सची संख्या वाढते, यामुळे आपली रोग प्रतिकार शक्ती वाढते.
आले
आले एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे ज्यात प्रतिजैविक, एंटीसेप्टिक, अँटी-मायक्रोबियल आणि एंटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. आल्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे सर्दी आणि खोकला, घसा खवखवणे, पावसाळ्यात शरीर दुखणे यासारखे सर्व आजार बरे होतात. चहाशिवाय तुम्ही याचा वापर दूध, भाज्या, करी आणि पुलावमध्ये देखील करू शकता.
आणखी वाचा : रात्रीच्या जेवणात भात योग्य की पोळी?; जाणून घ्या कसा असावा रात्रीचा आहार
कारले
कारल्यात व्हिटॅमिन सी आणि अँटीवायरल असतात. काही लोक कारलं कडू असल्याने त्याचे सेवन करत नाही. मात्र, कारल्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे पुढच्यावेळी कारल्याची चव न पाहता त्याच्या फायद्यांच्या विचार करत कारल्याते सेवन करा.