Health benefits from Fennel seeds carom seeds water: बडीशेप व ओवा या दोन्ही गोष्टी आपल्या भारतीयांच्या किचनमध्ये नेहमीच सापडतात. जेवणानंतर अनेकांना बडीशेप खाण्याची सवय असते. पण तुम्हाला माहीत आहे का की, तुमच्या अन्नपदार्थाला विशिष्ट चवीची जोड देणाऱ्या या ओवा व बडीशेप यांचे आरोग्याला अनेक फायदे आहेत. या दोन औषधी वनस्पतींचे सेवन करण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे या दोन घटकांसह तयार केलेले पाणी. ओवा व बडीशेप यांचे पाणी जेवल्यानंतर प्यायल्याने त्याचे आरोग्याला विविध फायदे होतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बडीशेप व ओव्याचे पाणी पचनास मदत करू शकते, प्रतिकारशक्ती वाढवू शकते, श्वसनाशी संबंधित आरोग्य सुधारू शकते. तसेच ते वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करते आणि जळजळ कमी करते. या पेयाचे पाच महत्त्वाचे आरोग्यदायी फायदे आहेत, ते आपण आज जाणून घेणार आहोत.

१. अन्नपचनास मदत (Digestive aid)

स्निग्ध आणि पचनास जड असे पदार्थ खाल्ल्यानंतर ब्लोटिंग होणे व जळजळ होणे यांसारखे त्रास अगदी सामान्य आहेत. अशा वेळेस हे मॅजिक ड्रिंक मदतीला येते. ओवा त्याच्या पाचक गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहे, तसेच तो अपचन, ब्लोटिंग व गॅस सारख्या समस्यांवर मात करण्यास मदत करू शकतो. त्यात बडीशेप मिसळल्यास हे पेय अन्नपचनास मदत करू शकते.

हेही वाचा… पावसाळ्यात सर्दी-खोकल्यामुळे वैतागला आहात? सितोपलादी ठरतेय प्रभावी, जाणून घ्या या आयुर्वेदिक औषधाचे फायदे

२. चमकदार त्वचा (Glowing Skin)

ओवा-बडीशेपमध्ये अँटिऑक्सिडंट्सचे गुणधर्म आहेत, जे तुम्हाला चमकदार, टवटवीत व निरोगी त्वचा मिळविण्यास मदत करतात. त्यातील अँटिऑक्सिडंट्स त्वचेला तरुण ठेवण्यास आणि फ्री रॅडिकल्सचा प्रभाव कमी करण्यास मदत करतात.

३. श्वसन आरोग्य (Respiratory health)

ओव्यामध्ये प्रतिजैविक (antimicrobial) गुणधर्म आहेत, जे रोगप्रतिकार शक्तीला समर्थन देण्यास आणि ती वाढवण्यास मदत करतात. जेव्हा तुम्ही आजारी पडता तेव्हा याची तुम्हाला जास्त गरज असते. हे दोन्ही घटक श्वसन आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. त्याचा आरोग्यासाठी जास्तीत जास्त फायदा करून घ्यायचा असेल, तर ओवा आणि आले एकत्र करून, त्याचे पाणी प्या.

४. चयापचय जलद होण्यास मदत (Faster metabolism)

बडीशेप आणि ओव्यामध्ये उष्णता वाढविण्याचे गुणधर्म आहेत; जे विशेषतः तुमचे चयापचय जलद होण्यासाठी मदत करतात, तसेच तुम्ही नुकत्याच खाल्लेल्या अन्नातून आवश्यक पोषक द्रव्ये शोषण्यासही मदत करतात. म्हणूनच जेवणानंतर हे निरोगी पेय पिणे नेहमीच फायदेशीर ठरते.

५. वजन कमी होणे (Weight Loss)

ओवा व बडीशेप यांचे पाणी प्यायल्याने वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. हे पेय तुमचे चयापचय जलद करून, कॅलरी बर्न करण्यासदेखील मदत करू शकते. ओवा आणि बडीशेप मिळून बनविलेले कोमट पाणी प्यायल्याने जळजळ कमी होण्यास मदत होते. कारण- त्यात दाहकविरोधी गुणधर्म असतात.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health benefits from fennel seeds carom seeds water know about owa and badishep magic drink dvr