आजीबाईच्या बटव्यातला एक महत्त्वाचा घटक म्हणजे ओवा. कोणतीही किरकोळ शारीरिक तक्रार असो किंवा एखाद्या पदार्थाची चव वाढवणं असो. ओवा खाण्याचे अनेक फायदे आहेत. साधारणपणे पोट दुखत असेल तेव्हाच ओवा खाल्ला जातो असं एक समज आहे.मात्र, पोटदुखी व्यतिरिक्त अन्य अनेक शारीरिक तक्रारींमध्ये ओवा फायदेशीर ठरतो. त्यामुळे ओवा खाण्याचे फायदे कोणते ते पाहुयात.
१.ओव्यामुळे दम्याचा त्रास कमी होतो.
२. दातदुखी कमी होते.
३ मासिक पाळीचा त्रास कमी होतो.
४. ओव्याचं पाणी प्यायल्यामुळे जुलाब थांबतात.
५. तोंडाची दुर्गंधी कमी होते.
६. मुळव्याधीचा त्रास कमी होतो.
७. तापामध्ये फायदेशीर ठरतो.
८. मायग्रेनचा त्रास असल्यास ओवा गरम करुन त्याचा वास घ्यावा किंवा ओव्याचा लेप डोक्यावर लावावा.
९. पांढरे केस कमी होतात.
१०. जंताचा त्रास कमी होतो.
११.मधुमेहावर नियंत्रण राहते.
१२. मूतखडा असल्यास दररोज ओवा खावा
१३. वात विकार कमी होतात.
१४. कानदुखी बरी होते.
१५. दातदुखीमध्ये आराम मिळतो.
१६. वजन कमी होते.
(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)