बहुतांश घरात सकाळी नाश्त्यात केळ्यांचा समावेश असतो. लहान मुलांचे तर हे आवडते फळ असते. केळ्यांमध्ये भरपूर पोषक तत्व आणि जीवनसत्व आढळतात. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने केळं हे उत्तम फळ आहे. केळ्यांमध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि फायबर उपलब्ध असते. त्यामुळे केळी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. तसेच केळी खाल्ल्याने शरीरातील ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते. अशाप्रकारे केळी खाण्याचे अनेक फायदे आहेत. परंतु हिवाळ्यात होणाऱ्या वातावरणातील बदलामध्ये केळी खाल्ल्यास त्यामुळे सर्दी, खोकला असे आजार होतील, अशी अनेकजणांना शंका असते. हिवाळ्यात केळी खाल्ल्याने आरोग्यावर काय परिणाम होतो जाणून घ्या.
केळी खाल्ल्याने आरोग्यावर होणारे परिणाम
- केळ्यांमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशिअम आढळते, जे शरीरातील रक्तप्रवाह वाढवण्यासाठी फायदेशीर मानले जाते. तसेच यामुळे पेशींना योग्य प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होतो, हे त्वचेचा ग्लो वाढवण्यासाठी फायदेशीर मानले जाते.
- त्वचा नैसर्गिकरित्या अधिक मऊ होण्यासाठी कोलेजन हे प्रोटीन मदत करते, केळी खाल्ल्याने शरीरातील कोलेजनचे प्रमाण वाढण्यास मदत होते.
- केळ्यांमध्ये आढळणाऱ्या मॅग्नेशियम, विटामिन सी, मॅंगनीज या पोषकतत्वांमुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत मिळते.
(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)