जेवणात हिरव्या मटारच्या सेवनाचे अनेक फायदे आहेत. थंडीच्या मोसमात बाजारात मटार मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो. मटार-पनीर, मटार-पुलाव, आलुमटार, मटाराचे कटलेट यासारखे विविध खाण्याचे स्वादिष्ट प्रकार मटारापासून बनवता येतात. लो कॅलरी आणि अनेक पौष्टिक तत्वे असलेल्या मटाराचे अनेक फायदे आहेत. वजन कमी करण्याचा गुणधर्म असलेल्या मटाराचे लठ्ठ व्यक्तिंनी अवश्य सेवन करावे. मटारातील तत्वे कॉलेस्ट्रॉलची मात्रा कमी ठेवण्यास मदत करतात. यात मोठ्या प्रमाणावर अढळून येणारे अँटीऑक्सिडेंट्स ब्लड वेसल आणि आर्टरिजला ब्लॉक होण्यापसून परावृत्त करतात. मटारचे सुप प्यायल्याने रक्तदाब कमी ठेवण्यास मदत होते. मटारामध्ये असलेली फायबरची अधिक मात्रा बध्दकोष्ठतेवर गुणकारी आहे.

Story img Loader