पुरणाची पोळी असो किंवा कोणताही गोड पदार्थ त्यात चिमुटभर जायफळाची पूड घातली की पदार्थाची चव चांगलीच वाढते. तसंच त्या पदार्थाचा सुवासदेखील घरभर पसरतो. त्यामुळे अनेक घरांमध्ये गृहिणी गोडाच्या पदार्थामध्ये जायफळ आवर्जुन घालतात. परंतु, जायफळ केवळ गोडाच्याच पदार्थांसाठीच वापरला जात नसून त्याचे अन्यदेखील फायदे आहेत. जायफळामुळे अनेक शारीरिक तक्रारी दूर होतात. त्यामुळे जायफळ खाण्याचे फायदे कोणते ते जाणून घेऊयात.

१. पचनक्रिया सुरळीत होते.

२. आतड्यांच्या तक्रारी दूर होतात.

३. कफविकारामध्ये उपयोगी.

४.तोंडाची दुर्गंधी दूर होते.

५. भूक वाढते.

६.जुलाब, पोटात मुरडा येणे या समस्यांवर गुणकारी

७. शांत झोप लागते.

८. गोडाचे पदार्थ पचण्यास मदत होते.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Story img Loader